Loading...
एक स्वप्न तीच ….!!
एक स्वप्न होत तुझ्या सोबत लग्न कराव,
सात फेरया मारून आयुष्य भर बंधनात अडकाव
तुझ कधी काही दुखलं,खुपलं
तर तुला प्रेमाने माझ्या मिठीत झोपवाव.
माझ्या आई वडिलांना सोडून तुझ्या घरी याव
तुझ्या आई वडिलांवर माझ्या आई वडिलांसारख प्रेम कराव
बाबांच्या काठीचा आधार व्हावं,
आईच्या हातात आजी म्हणार आपल गोंडस बाळ द्याव
एक स्वप्नं होत,
आता आपण जसे पावसात भिजतो,
तसच आपल्या गोड संसारात भिजावं
लुटू लुटू पावल टाकत आपल्या बळान
आपल्या आई बाबा म्हणाव.
एक स्वप्न होत,
तुझ्या मिठीत तू मला घ्याव
दिवसभर काम करून थकलीस का बस एकदा विचारव,
पण तू फक्त स्वप्न दाखवलीस आणि अर्ध्यावर सोडून गेलास
आणि मी अजूनही त्या स्वप्नात जगतेय वेड्यासारखी…….
– ©® योगेश बबन गाडगे.
Loading...