मन उधान वाऱ्याचे : आठवणी शाळेतल्या.

0
705
Loading...

मन उधान वाऱ्याचे

पावसाळा आला कि शाळा सुरु होण्याची,
लगबग सुरु होते.आता रस्त्याने चालताना,
पाठीवर मोठी मोठी वजनाची दप्तर घेउन चालणारी मुल दिसतात.
आणि मग ते लहान पण आठवत.शाळेच्या पहिल्या दिवशी पहिला
बेंच पकडायची उत्सुकता सगळ्यानाच असते.आमचा मात्र कायम शेवटचा बेंच ठरलेला असायचा.मग घाई व्हायची
ती नवीन वह्या आणि पुस्तक घेण्याची.
नवीन वह्या आणि पुस्तक म्हटल कि,
सर्वाना एक गोष्ट नक्की आठवेल.

त्या वहिच किंवा पुस्तकाच मधल पान
काढुन कर करीत पानांचा वास घ्यायचा.
आजहि एखादि नवीन वहि घेतली
तर आपण हे गुपचुप करतोच.
लहान होतो ते खुप छान होत.
एकादि गोष्ट मिळाली नाहि कि,
मोठ्याने रडता यायच.
आणि आता मोठे झालो आहोत.
तर मनमोकळे पणाने रडता येत नाहि.
कधी कधी आस्चर्य वाटत कि,
लोक म्हणतात,”लहान पण देगा देवा ”
लहान पण देगा.आणि माझ्या मधे
लहाण पण आहे तर लोक हसत म्हणतात,
” तु बच्चु आहेस.”

यात मनाला लागण्या सारख काहि नाहिये.
मला असच रहायला आवडत.
मन मोकळे पणान
आता पुन्हा लहान होता येणार नाहि.
पण तस वागता येत.
हो ते तस थोड पहाणाय्राला विचित्र
वाटेल.पण मला वाटत “Mature” म्हणुन
शहानपणाचा कळस घेउन मिरवण्या पेक्षा,
एकदा लहान होउन पहाच.गल्ली तल्या छोट्या
मुलांबरोबर एकदा निंगोरचा,
गोट्या खेळुन पहा.अभिमान प्रत्येकाला
असावा पण गर्व कधीच नसावा.
कारण खुर्ची वर बसलेला माणुस कधीहि पडु शकतो
पण जमिनी वर बसलेला माणुस कधीच पडत नाहि.
” दोन शब्द ते काय मी लिहिणार ,
वाचणाऱ्याच्या काळजाला भिडनार ,
प्रेम ते प्रेम असच रहाणार.
कधी पहाट तर कधी रात्र होणार ”

-©® योगेश बबन गाडगे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here