Loading...
!!……हातभार……!!
विसरून विसरून तिला विसरायची किती..?
तिच्या आठवणींची आग लागलीय काळजात
सांगा विझवायची कशी…? !! १ !!
पावसाच्या सरी बरसतात वरून
मग डोळ्यातल पाणी जात हळूच लपुन
सांगा मग आसवांची किंमत तिला कळणार कुठ्न..!! २ !!
मी ओढा कि नाला कि समुद्र
या मोठेपणाला काहीच किंमत नाही
तुझी आठवण येता सगळेच होते ग क्षुद्र..!! ३ !!
तू तुझ्या धुंदीत मी माझ्या धुंदीत
आयुष्यभर असाच राहील का तिरस्कार
आठवणींच्या या ओझ्याला लावतेस का थोडा हातभार…!! ४ !!
©® योगेश बबन गाडगे.
Loading...