आटपाडी नाईट्स Movie Review

पुन्हा पुन्हा अनुभवावी अशी आटपाडी नाईट्स लैंगिक शिक्षण, त्या संदर्भातून येणारे अनेक विषय, गैरसमजुती त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या या संदर्भात आजही समाजामध्ये मोकळेपणाने बोलले जात नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने पुढारलेल्या एकविसाव्या शतकातही शहरी भागातही यासंदर्भात उघडपणे मत व्यक्त केली जात नाही. तर ग्रामीण भागात तर याबद्दल बोलणे म्हणजे पाप समजले जाते. परंतु हीच गोष्ट दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी अतिशय सहज आणि सहजसुंदरपणे आटपाडी नाईट चित्रपटातून मांडले आहे. मराठी चित्रपटात अभावानेच दिसणारा असा नवीन प्रयोग अनुभवण्यासाठी आटपाडी नाईट्स पुन्हा पुन्हा पहावा असा चित्रपट आहे.

आटपाडी गावात वसंतराव खाटमोडे उर्फ वशा हा आपल्या मित्रांबरोबर गावात राहणारा सर्वसाधारण मुलगा. त्यालाही इतरांप्रमाणे प्रेमात पडावे आपलेही लग्न व्हावे अशी इच्छा परंतु एकूणच आपली दुर्बल शरीर यष्टी आणि भिडस्त स्वभावामुळे स्वतःहून यासंदर्भात पाऊल टाकणे त्याला जमत नाही आठ मुलींना पाहून लग्नासाठी आठही मुलींचे नकार त्यांनी पचवले आहेत. अखेर नवव्या प्रयत्नांमध्ये त्याची गाठ जुळते. परंतु दुर्बल शरीर असल्यामुळे लग्नानंतरच्या गोष्टी वशाला जमतील का असाच गावात बोभाटा उठतो आणि त्यामुळे या गोष्टी आपल्याला जमल्याच पाहिजे या हट्टाने पेटून उठलेला वशा नंतर लग्नानंतरच्या गोष्टी करण्यासाठी काय करतो आणि त्याचा त्याच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यावर कसा परिणाम होतो हे या चित्रपटांमध्ये अतिशय तरलपणे मांडण्यात आले आहे. अभिनेता प्रणव रावणाने आणि अभिनेत्री सायली संजीव यांनी अतिशय समजूतदारपणे काम केले आहे. गावातला ठसकेबाज पणा त्यांनी आपल्या पात्रातून उमटविला आहे त्यामध्ये सर्वात कमाल केली आहे ती दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी. गावातील रूढी-परंपरा अतिशय साधेपणाने लोकांसमोर मांडून त्यांनी हा नाजूक विषय प्रभावीपणे मांडला आहे यामध्ये कोणत्याही अश्लील संवाद किंवा दृश्यांची भरणा केलेला नाही तरीही हा विषय प्रेक्षकांच्या काळजाला जाऊन भिडतो. त्याचबरोबर चटपटीत संवाद आणि खुसखुशीत पात्र यामुळे चित्रपट मनोरंजक होतो. लैंगिक शिक्षण हा विषय वाटतो तितका चित्रपटाच्या माध्यमातून मांडणे सोपे नाही लेखक-दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी त्याला मनोरंजनाचा तडका देत प्रभावीपणे प्रभावीपणे विषय मांडण्यात यश मिळवले यश मिळवले आहे कलादिग्दर्शक संदिप इनामके यांनी गावातील चित्रण अतिशय साधेपणाने आणि तितक्यात नेमकेपणाने उभे करण्यामध्ये बाजी मारली आहे. चित्रपटातील गाणी आणि विशेषतः लेखन प्रभावी झाले आहे त्यामुळे चित्रपटाचा विषय थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

चित्रपटाचा विषय नेमका मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे अनावश्यक पात्र संवाद आणि घटनांची यामध्ये घुसवली नसल्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. आवश्यक त्या ठिकाणी चित्रपटाचा शेवट आल्यामुळे जो संदेश घेऊन बाहेर पडणे दिग्दर्शकाला अपेक्षित आहे ते नेमके साधले जाते. लैंगिक शिक्षणासारखे नाजूक विषय तितक्याच प्रभावीपणे आणि मनोरंजक पद्धतीने मांडलेल्या आटपाडी नाइट्स हा चित्रपट एकदा नव्हे तर अनेकदा अनुभवण्याची गोष्ट आहे असे प्रेक्षकांना नक्कीच वाटते आणि हेच दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या टीमचे यश आहे.

योगेश बारस्कर
पत्रकार सिने समीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *