आंबेनळी घाटात अपघात ३२ जणांचा दुर्देवी मृत्यु

आंबेनळी घाटात अपघात

पुणे :आंबेनळी घाटात अपघात ३२ जणांचा दुर्देवी मृत्यु

पोलादपूरच्या आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालंय. तर एकजणाने बसमधून आधीच उडी मारल्यानं तो बचावल्याची माहिती मिळतेय. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे एकूण ३४ कर्मचारी सहलीसाठी विद्यापीठाच्या बसमधून निघाले होते.

आंबेनळी घाटात अपघात
आंबेनळी घाटात अपघात

महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यानं हे सर्वजण महाबळेश्वरला निघाले होते. सकाळी साडेदहा वाजता या कर्मचाऱ्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र, आंबेनळी घाटात चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस थेट ८०० फूट दरीत कोसळली. साधारण ५०० फुटावर ही बस अडकली असून, बसचा अक्षरश: चेंदामेंदा झालाय आणि मृतदेह इतस्थत: पसरले आहेत.

वाचा इतर माहिती:

चार कोटीहुन अधिक लोकांनी पाहिलेलं कोळी गीत

 

मोदींनी दत्तक घेतलेल्या 4 गावात 1 रुपयाही निधी खर्च नाही

मोदींनी दत्तक घेतलेल्या 4 गावात 1 रुपयाही निधी खर्च नाही

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांसद आदर्शग्राम योजनेत वाराणसी मंतदारसंघातील चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारपैकी एकाही गावात विकासाकामासाठी 1 रुपयांचाही खर्च करण्यात आला नाही. जिल्हा ग्रामविकास प्राधिकरणाकडून माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. प्राधिकरणाचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ‘विकास वेडा झाल्याचे’ हेच खरे सत्य असल्याचे म्हटले आहे.कन्नौज येथील रहिवासी अनुज वर्मा यांनी माहिती अधिकाराचा वापर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांबाबत माहिती मागवली होती. वर्मा यांच्या या विनंती अर्जाला जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाने 30 जून रोजी पत्र पाठवून माहिती दिली. मोदींनी वाराणसीतील जयापूर, नागेपूर, ककरहिया आणि डोमरी ही चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारही गावांमध्ये गेल्या 4 वर्षात एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. विशेष म्हणजे या गावात झालेला विकास हा सरकारी योजना आणि कंपनींच्या सीएसआरमधून करण्यात आला आहे. तर काही संस्थांनीही मदत करुन गावच्या विकासात हातभार लावला आहे.

"<yoastmark

याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ‘आपण दत्तक घेतलेल्या एकाही गावात खासदार निधीतून 1 रुपयाही खर्च केला नाही. आपल्या संकल्पनेतून साकारलेली सांसद आदर्शग्राम योजना हाही एक जुमलाच’ असल्याचे सुरजेवाला यांनी मोदींनी उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्विट करुन मोदींवर हल्लाबोल केला. मोदी सरकार आरटीआयला विरोध का करते, हे आम्हाला चांगलच माहित आहे. पंतप्रधान मोदींबाबतचे काही वास्तव यातून बाहेर निघते, जसे की स्वत:च्या प्रचारासाठी 400 कोटींचा खर्च करणे. पण, वाराणसीत दत्तक घेतलेल्या गावांसाठी एक रुपयाही न खर्च करणे, अशा शब्दात चतुर्वेदी यांनी मोदींना ट्विट केले आहे.

RTI
RTI

 

Vivek Shinde यांना KARVY कडून पुरस्कार

*Vivek Shinde विवेक शिंदे यांना KARVY कडून पुरस्कार*
पुणे १९ जुलै २०१८ :
KARVY या देशातील दर्जेदार वित्त संस्थेकडून विवेक शिंदे यांच्या अर्थ व वित्त सेवा क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन विशेष गौरवण्यात आले .
त्यांचा रोख ५००००० व स्मरण चिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
ही बातमी समजताच त्यांचा मित्र परिवार , देशविदेशातील खातेदार यांनी खास संपर्क करून अभिनंदन केले.
एक तपाहून ही अधिक या क्षेत्रात कार्य केल्यानंतर त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन एक पोच पावती मिळाली आहे.
विवेक शिंदे म्हणतात हे यश त्यांच्यावर लोकांनी ठेवलेल्या विश्वासाने शक्य झाले आणि ही सेवेची घोडदौड अशीच सुरू राहील .
याकामी सम्राट जाधव व अमित पवार यांचे विशेष योगदान लाभले.
यावेळी सम्राट जाधव म्हणाले की भारताचा समावेश जगाच्या ट्रिलियन डॉलर क्लब मध्ये होत असताना शेयार बाजार हा देशाचा दर्शक असून या क्षेत्रातील कामगिरीत विवेक शिंदे यांची भरीव हिस्सा राहील तर अमित पवार म्हणाले विवेक शिंदे यांचे यश हे त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रम व या क्षेत्रातील ज्ञान यामुळे आहे, भारत आर्थिक महासत्ता बनवण्याच्या या अविरत यज्ञात सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आवाहन व दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. सकाळ चे मधुकर ठाकर यांनी विवेक शिंदे यांच्यात बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचे व्यक्त करून अभिनंदन केले. आम्री के ( डिब्लू इंन टी यु एस ए) यांनीही हे यश विशेष असल्याचे व्यक्त केले.
डॉ. मलिक (खजिनदार, डेमॉक्रॅटिक पार्टी अमेरिका) यांनी विशेष अभिनंदन केले ते म्हणाले भारताच्या प्रगतीस आवश्यक गोष्टी यात सर्वतोपरी सहाय्य करू. डॉ.प्रमोद किर्दत(संशोधक डॉ. सेल चे अध्यक्ष) यांनी विवेक शिंदे यांचे कार्यास शुभेच्छा दिल्या.सपना धर्मांनी, आय टंडन,अनिल शाह, सुन सराफ, क्षत्रिय (एसेपी) व इतर यांनी शुभेच्छा दिल्या.

“हिमा दास” ला मिळणार हा बहुमान

Hima das

“हिमा दास” ला मिळणार हा बहुमान

भारतीय अॅथेलॅटिक्ससाठी गुरुवारचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस ठरला. वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला. IAAF वर्ल्ड अंडर २० अॅथेलॅटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत तिने ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करत स्पर्धा जिंकली.

हिमा दास
हिमा दास

या विजयानंतर देशभरात तिच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. आसाममधील धिंग येथे तिच्या गावी लोकांनी विजयोत्सव साजरा केला. आता तिच्या या ऐतिहासिक विजयाला सन्मानाची जोड मिळणार आहे. हिमा दास हिला लवकरच आसाम राज्याच्या क्रीडा विभागाचे सदिच्छादूत होण्याचा बहुमान प्राप्त होणार आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या संदर्भातील घोषणा केली आणि तिला शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यस्तरीय कार्यक्रमा दरम्यान हिमाचा सत्कार करण्यात येईल आणि तिला रोख रकमेचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल असेही सोनोवाल यांनी सांगितले आहे. दरम्यान, आसाम अॅथेलॅटिक्स संघटनेकडून हिमाला २ लाखांचे रोख बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

हिमा दास
हिमा दास

‘आसामच्या कन्येने (हिमा) अत्यंत दुर्मिळ असे यश मिळवले आहे. तिने प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. तिचे अभिनंदन!’, असे मत मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले आहे.

आसामचे राज्यपाल प्रा. जगदीश मुखी यांनीही हिमाला शुभेच्छा दिल्या. इतर युवा धावपटू आणि खेळाडूंसाठी हिमाचा विजय हा प्रेरणेचा स्रोत आहे. कठीण प्रसंगावर मात करून आयुष्यात एक उंची गाठता येते हे तिने मिळवलेल्या विजयामुळे सिद्ध झाले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

माउलींच्या पालखीत अश्वाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन: वारकऱ्यां मध्ये हळहळ

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजाच्या पालख्या पुणे शहरात कालपासून मुक्कामासाठी असून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत असणाऱ्या जोडीतील एक पांढऱ्या रंगाचा अश्व हिरा याचे रास्ता पेठेतील रास्तेवाडा येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली.मृत्युमुखी पडलेल्या अश्वाचे वय १२ ते १३ वर्षांचे होते. पालखी प्रस्थान दिवशी हा अश्व श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली (बेळगांव) गावावरुन माऊलीच्या सेवेत दाखल झाला होता.गेल्या आठ वर्षापासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता. वारीच्या वाटेवरच अश्वाने अखेरचा श्वास घेतला. ही वार्ता पसरताच वारक-यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संत तुकाराम महाराजाची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्याचे काल सायंकाळच्या सुमारास पुणे शहरात आगमन झाले होते. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे संत तुकाराम महाराजांची पालखी भवानी पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिराच्या मुक्कामी ठिकाणी मार्गस्थ झाले. यातील ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचा पांढऱ्या रंगाचा अश्व हिरा यास रास्ता पेठेतील रास्तेवाडा येथे विश्रांतीसाठी घेऊन जाण्यात आले. मात्र, आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हिरा या अश्वास ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जागीच निधन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे वारकरी भाविकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पालखी सोहळा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन अश्वाचे वारीसाठी त्वरीत आगमन होणार आहे.


धोनी भाउंना वाढदिवसाच्या आगळया वेगळ्या शुभेच्छा.

*महेंद्र सिंग धोनी जन्मसोहळा*


७ जुलै ,
😍भारताची आण ,बाण आणि शान ,आम्हा सर्वांची जान, आमच्या गळ्यातील ताईत😘 ….ज्यासाठी आम्ही कसोटी सामना पण बघत होतो….🏏भारतासाठी पोतीभरून  कप जिंकून देणारा…. 🥉🥈🥇🏆🎖 …..निस्वार्थ पणे खेळणारा…शतक  जरी झालं तरी कधीही दंगा न करणारा……😁ढीगभर कंपन्यांचा BRAND AMBASEDOR.

जी ह्यांच्या नावाने बोंबलतात त्यांना बॅटनेच उत्तर देणारा….😡टीम चा कॅप्टन हे पद सोडून नुसता एक खेळाडू म्हणून खेळणारा (याला वाघाच काळीज लागतं) 💪💪…😔सगळ्या प्रकारचे कप जिंकून देणारा जगातील एकमेव वाघ …😎घरातच बाईक शोरूम काढेल ईतक्या गाड्यांचा मालक..😁तिन्ही
ऋतु मध्ये कायम COOL असलेला..😝 प्रकाशाच्या वेगाच्या तिप्पट स्पीडने स्टंपींग  करणारा एकमेव 5G OPERATOR 😜


.. 😎5-6 NO. ला बॅटींगला येऊनही 50 च्या वर AVG.असलेला….😇सगळ्या  बाॅलर्स चा बाप …भारतीय टीमचा माजी कॅप्टन(अजुन ह्योच आहे सोडा).. 😄असा आमचा लाडका , अखंड क्रिकेट जगताचा देव , भल्याभल्याना मैदानावर घाम फोडायला लावणारा , आपल्या बॅटिंग ने चाहत्यांचे मन मोहित करून सोडणारा , आम्हा तरुण मुलांचे प्रेरणा स्थान , साक्षी वहिनींची जान 😛😜😍, *मा. श्री. श्री. महेंद्र सिंह धोनी साहेब* 7⃣(कॅप्टन कुल…माही…MSD….)7⃣याला वाढदिवसाच्या २०१९ च्या world cup ला winning sixer मारू पर्यंत मन भरून हार्दिक शुभेच्छा …..😘😘😎😇🙌🙌💪💪
शुभेच्छुक :- अखिल भारतीय “तुम्ही यॉर्कर बॉल टाका मी सिक्स मारतो” संघटना , अखिल भारतीय ” बॉल हातात आल्या आल्या throw टाका रे “संघटना , अखिल भारतीय “सगळे cup आमचे आहेत रे “संघटना …

झटपट बातम्या : World Wide News.

*🧐 _वृत्तांत दिवसभराचा_ 🧐*

👨🏼‍🏫 मुंबई : अंधेरी पुल कोसळताना ब्रेक लावून हजारो लोकांचे जीव वाचवणार्‍या मोटरमनला रेल्‍वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडून पाच लाखांच्या बक्षीसांची घोषणा

https://youtu.be/VT2A2D0gV6Q

👨🏼‍🏫 अंधेरी पूल दुर्घटना : १२ तासांनंतर धावली पहिली अंधेरी-चर्चगेट लोकल, हार्बर मार्गही सुरू.

 

👨🏼‍🏫 भारतीय वंशाचे न्यायाधीश अमूल थापर यांची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मूख्य खंडपीठामध्ये निवड होण्याची शक्यता

👨🏼‍🏫 मुंबई: विरार रेल्वे स्थानकावर शॉर्ट सर्किटमुळे लोकलला आग लागली

👨🏼‍🏫 विंचुर प्रकाश राज्य महामार्गावरील विरगाव फाट्यावर नाशिक-नंदुरबार या शिवशाही बस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही

👨🏼‍🏫 नाशिक : मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा पसरवणाऱ्या युवकाविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

👨🏼‍🏫 लातूर : चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

👨🏼‍🏫 मुंबई : वाहतूक सुरळीत होण्यासाठी उद्याचा दिवस उजाडण्याची चिन्हं

👨🏼‍🏫 नागपूर : आमदार निवासातील रूम नंबर ४३ मध्ये मृतदेह सापडला, मृत विनोद अग्रवाल मुंबई अंधेरी पुर्वचे आमदार रमेश लटके यांचे खासगी सचिव

👨🏼‍🏫 मुंबई : अंधेरी दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्‍वेकडून हेल्‍पलाईन नंबर जारी…
अंधेरीसाठी ०२२६७६३००५४, चर्चगेट ०२२६७६२२५४०, बोरवली ०२२६७६३४०५३ तसेच मुंबई मध्यसाठी ०२२६७६४४२५७ यावर संपर्क करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

👨🏼‍🏫 सांगली : बिळूर (ता. जत) दारुच्या दुकानास भगदाड पाडून ९५ हजारची दारुची चोरी

👨🏼‍🏫 मुंबई : अंधेरीतील पादचारी पुलाचा भाग कोसळल्‍याने, पुलावरून दोघे जण जात असताना पडल्याने ते जखमी झाले

👨🏼‍🏫 मुसळधार पावसामुळे ठाण्यात घराची भिंत कोसळून एक ठार, तीन जखमी

👨🏼‍🏫 सातार्‍यातील कोयना भागात पहाटेपासून मुसळधार पाऊस

👨🏼‍🏫 नवी मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जनजीवन विस्‍कळीत

👨🏼‍🏫 पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात अझमगडचा दौरा करणार

👨🏼‍🏫 गृहमंत्री राजनाथ सिंह उद्यापासून दोन दिवस काश्मीर दौर्‍यावर

👨🏼‍🏫 FIFA2018 : जपानला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

दिल्ली : एकाच कुटुंबातील अकरा जणांनी घेतली फाशी.

दिल्ली : दिल्ली मधुन नुकतीच एक खळबळजनक बातमी आली आहे.
चक्क मोक्ष मिळावा म्हणुन अंधश्रदद्धे पोटी एकाच कुटूंबातील अकरा जणांनी आपल्या राहत्या घरी फाशी घेतली आहे.
विशेष म्हणजे फाशी कशा पद्धतीने घ्यावी याची रितसर नोंद ही डायरी मध्ये केलेली आहे.
फाशी मोक्ष मिळावा या अंधश्रध्दे मुळे घेतली आहे की एकाच रात्रीत पूर्ण पणे कुटुंब संपवण्याचा कुणी कट केला आहे हे अजुन स्पष्ट झालेल नाहि. परंतु पंधरा दिवसा पुर्वीच या कुटुंबातील एका मुलीचा विवाह हि पार पडला होता आणि त्यानंतर त्या सर्वांनी अस पाउल का उचलल असाव हे समजण अवघडच आहे.
अधिक सविस्तर बातमी खाली दिलेल्या लिंक मध्ये आपण पाहु शकता.पण आपणा सर्वाना आमच्या कडुन नम्र विनंती आहेकुठल्याही अंधश्रद्धाना बळी पडु नका व आपला जीव गमावु नका.
जीवन अनमोल आहे.

मुंबई : अंधेरी मध्ये ब्रीज कोसळला.

⭕फ्लॅश – मुंबई अंधेरी जवळ रेल्वे पुलाचा काही भाग कोसळला पश्चिम रेल्वे वाहतूक ठप्प अंधेरी कडून विरार बाजूला पुलाचा भाग कोसळुन स्टेशनच्या शेडवर पडला परिणामी अंधेरी हून विरार दिशेकंडील वाहतूक ठप्प झाली आहे.

@ गेल्या काहि दिवसां पासुन मुंबई मध्ये घटना सत्र चालुच आहे. मागील आठवड्यात घाटकोपर मध्ये विमान क्रॅश झाले होतेमुंबई साठी पावसाळा सुखाचा नाहि असच आपण म्हणु शकतो.

@ शक्यतो पावसाळ्यात सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण गरजेच आहे.

@ जगातील सर्व घडामोडीं साठी सब्स्क्राईब करा. फोलोव करा आपल पेज व वेबसाईट.