एकटेपणा हा शाप की पाप प्रशाली घरत

एकटेपणा

एकटेपणा आज प्रेक्षकांनी अफाट गर्दी केली होती नाटकहॉल मध्ये. नाटक पाहणारे प्रेक्षक वेळेअगोदरच हॉलमध्ये पोहचलेले.. नाटकाचा पडदा केव्हा एकदा वर जातो ही आतुरता प्रेक्षकांच्या नजरेत जाणवत होती..प्रत्येकजण आपल्याला जागा मिळेल तिथे बसत होत.. नाटकाचं नाव होतं

एकटेपणा हा शाप की पाप

त्यातील कलाकार राकेश हा कलाकारांचं असा होता की, बॉडीगार्ड ते शिवरायांचीभूमिके पर्यंत तो कोणतीही भुमिका रंगमंच्यावर अफळातुन पणे सादर करणारा कलाकार होता।। आणि आजच्या नाटकाचा कलाकार राकेश असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी त्यांच्या नावावरुनच झाली होती.

आज राकेश नाटकाच्या मुडमध्ये नव्हताच.त्याला आज खुपच एकटेपणा जाणवत होता..पण नाही बोलुन चालणार ही नव्हतं..प्रेक्षकांच मन दुखावान त्याला कधी जमलंच नाही.. आणि नाटक आताच सुरू झालं होतं तो नाटकाच्या शेवटी फक्त एक गाणं बोलणार होता..बाकीचे पात्र करणारे कलाकार रंगमच्यावर आपली पात्र सादर करत होते..राकेशला आज तितकं काही नाटकात काम नसल्यामुळे तो जरा साध्या पोषकात होता..तिकडे नाटक सुरु ही झालं होतं. राकेश आज खुपच आठवणींच्या गर्दीत हरवला होता.. कारण आज त्यांची एकुलती एक लेक भुमी नाताळच्या सुट्टीला घरी आली होती ती होस्टेलवर परत जाणार होती..त्याचं पुर्ण लक्ष घराकडेच लागलं होतं. राकेश आरश्यात स्वतःला पाहत आरश्याला म्हणाला।।
आज आरसा पुन्हा माझ्याशी खोटा वागतो मनात असह्य वेदना असुनही चेहऱ्यावर आनंद दाखवतो.

नक्की आरसा खोटा की, माझं मन खोटं ह्या विचाराने तो खुर्चीत बसतो..आणि त्यांच्या डोळ्यात भुतकाळ दिसु लागतो.
तो भुतकाळात हरवतो. तोही दिवस त्याला आठवतो ज्या दिवशी त्याच्या आणि सेविकाच्या झालेल्या प्रेमाच्या आणाभाका आज सप्तपदीत जोडल्या गेल्या..त्यांचा प्रेम आज जिंकलं ह्यांचा आनंदच राकेशला खुप झाला होता..दोघेही राजाराणीसारखं संसार करु लागले..आणि त्यांच्या संसाररूपी वेलीवर एक गोंडस कन्यारत्न आलं..त्या परीच नाव भुमी..भुमी खेळायला, बागडायला लागली. घराच गोकुळ झालं..आणि एक दिवस अचानक बाबा ह्या जगातुन निघुन गेले..नियतीच्या नियमानुसार जो जन्माला आलाय तो जाणारच.. असं समजुन दुःख पचवत सगळे पुन्हा सावरण्याचा मार्गावर लागले.

आणि एक दिवस…नियतीचा फेरा उलटा पडला की,काय नि सेविकाच्या छातीत दुखून आलं.राकेश तिला घेऊन हॉस्पिटला गेला. तिच्या चेकअप नंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली..
कारण तिच्या रिपोर्ट मध्ये तिच्या काळजाला होल होता..हे ऐकून राकेशच्या डोळ्यासमोर अंधेरी आली..पुन्हा पुन्हा तो डॉक्टरांना विचारत होता. माझ्या सेविका काही झालेलं नाही.. ती बरी आहे..डॉक्टर त्याला सावरत म्हणाले आता तुला तिच्यासाठी का होईना सावरायला हवं राकेश.. जे सत्य आहे ते तुला स्वीकारायलाच हवं.. राकेशला आता त्यांची ही पावलं जड वाटु लागली..तो जड अंतकरनाने सेविकाजवळ गेला. तिला पाहुन खोटं हसु ओठावर आणत म्हणाला सेविका my darling तु oke आहेस..घरी चल भुमी आपली वाट पाहत असेल..माझ्या परिराणीला आज खुप खाऊ घेऊन जायचं..माझं पिल्लु ही तुझ्यासारखच लबाड झालाय..अस सांगत राकेशने सेविकाच्या हात पकडत तिला उठवलं.

सेविका आजपासून राकेशला ओळखत नव्हती.. त्याचे डोळेच तिला सांगुन गेले की, तरी माझ्याबाबतीत घडलंय.. पण तिला राकेशला विचारून त्याला त्रास आणखी त्रास दयायचा नव्हता..ती समजुन ही न समजल्यासारखी करत राकेशला बोलली चल लवकर आपलं पिल्लु वाट पाहत असेल..ते दोघेही गाडीवरुन घरी जायला निघाले.. राकेश तिला समजावत होता सेविका तु एकदम oke आहेस ग।। पण तुला रोज झोपताना गोळ्या घ्याव्या लागतील। सेविका त्याला सांगते ,का राकेश अस???

एकटेपणा
एकटेपणा

तु तर सांगतो मी ठीक आहे ना।।राकेश तिला गाडीच्या आरश्यातुन बघत सांगतो.. अरे सेविका तु बरीच आहेस माझ्या राणी,, पण परत माझ्या सेविकाच्या छातीतीत दुखायला नको म्हणुन ग गोळ्या घेत जा.. सेविका सगळं समजुन होती.. ती बोललीहो का राकेश।। इतकं प्रेम करतो तु माझ्यावर.. ये वेडा हा प्रश्न झाला का ग सेविका तु माझी होण्यासाठी मी किती काय केलं ग..आणि आज तुला हा प्रश्न पडावा.. अरे राकेश सहज विचारलं.पण राकेश मी कधी गोळी विसरली खायची तर..।।राकेश मधेच बोलतो ये वेडाबाई मी कसं विसरू देईन तुला.. मी रोज माझ्या हाताने देईन तुला गोळी.असं बोलता बोलता ते कधी घराजवळ आले समजलं ही नाही..भुमी धावतच गाडीजवळ आली दोघेही तिच्या हाताला पकडून आत घेऊन गेले..राकेश रोज सेविकाला न विसरता गोळी दयायचा.

सेविका रोज सांगायची बस कर राकेश मला काही होत नाही..।।का रोज रोज गोळी देतो.. राकेश तिचा हात हातात घेऊन सांगायचं ही गोळी तुला काही झालं म्हणुन नाही तर काही होऊच नाही म्हणुन देतो ग।। सेविका आता समजुन गेलीच होती की, तिला काहीतरी झालंय।। तिने एक दिवस राकेश नसताना रिपोर्ट शोधुन काढले।। ते रिपोर्ट बघुन ती हादरली कारण तिच्या हृदयाला होल होता.. आता तिचे जास्त दिवस राहिले नव्हते. जे दिवस काढले तेही गोळ्याच्या जीवावरच होत्या.. संध्याकाळी राकेश घरी आला आज ती मस्त जेवण बनुन बसली होती..राकेशला पाणी देत ती म्हणाली राकेश उद्या माझं काही झालं तर तु दुसरं लग्न करशील का???? राकेश पाण्याचा ग्लास ठेवत म्हणाला “सेविका”।।।। गप्प बस।। काहीही बोलते..अरे सहज विचारलं।। तुला समजत का तु काय विचारते?? तुझ्याशिवाय राहणं हे शक्य तरी आहे का?? असं म्हणत तिला जवळ घेत तो म्हणाला तुला कधीच काही होणार नाही.. सेविका त्यांच्या आणखी जवळ जात म्हणाली राकेश मला माहित झालंय माझ्या हृदयाला होल आहे.. मी रिपोर्ट बघितलेत.. राकेश गांगुरुन गेला की, हे रिपोर्ट हिला सापडले कसे??

एकटेपणा
एकटेपणा

तरी तो स्वतःला सावरत म्हणाला अग वेडे तो होल होता पण आता तु oke झालेस।। राकेश तुझ्या डोळ्यात मी रोज पाहते तु माझ्याशी खोटं बोलतो.आता राकेश समजुन चुकला हिला सगळं खरं माहीत झालंय.तिला जवळ घेत तो म्हणाला सेविका तुला काहीही होणार नाही.आणि त्याच विचारात ते रात्री न जेवताच झोपी गेले.दिवसा मागुन दिवस गेले सेविकाच शरीर आता गोळ्यांना स्वीकारत नव्हतं.इतकी ती थकली.आणि एक दिवस सेविकाने ह्या जगाचा निरोप घेतला.भुमीसारख्या पिल्लाला सोडुन ती आता निघुन गेली होती.राकेशला तर जगणं नको वाटायचं पण आई आणि भुमीसाठी तो खोटं अवसान आणुन जगायचा.आणि एक दिवस नियती पुन्हा त्याच्याच घराजवळ आली नि उलट्या पावलांनी चालत गेली की काय, नि त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आला.आता राकेशला आकाशपातळ एक झालं. सगळं संपलं होतं.भुमिकडे बघत तो सावरू पहात होतो.पण आज तो पुरता पुरता हरला होता.नशिबापुढे रडावं की,हसावं ह्या विचारात तो पडला.

एकटा एकटा भुमीला काय सांभाळणार म्हणुन राकेशने भुमीला होस्टेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला त्यात भुमीला बोलता ही येत नव्हतं.आईबाबा होऊ पाहणारा राकेश भुमीच्या बाबा हा शब्द ऐकण्यास तरसत होता.भुमीच्या थेरपी खर्च आणि तीच बाकी आयुष्य सुखात राहावं म्हणून राकेशने स्वतःच्या सुखांचा परिपुर्ण त्याग केला होता.तिच्यासाठी तिला जॉब आणि नाटक करणचं होत.

भुमीला होस्टेलवर जड अंतकरणाने ठेऊन तो आपल्या नाटकाच्या कामात व्यस्त राहत होतो..
भुमी नाताळच्या सुट्टीला घरी आली होती ती उद्या जाणार म्हणुन त्याच लक्ष रंगमंचाकडे नव्हतं.. तो फक्त भुमी जाणार ह्या विचारातच होता तोच रंगमंच्यावरून राकेशला कोणी तरी आवाज दिला।। राकेश स्वतःला सावरत पुन्हा आरश्यात बघत रंगमच्यावर गेला.. तोच एकच आवाज दुमदुमला

राकेश। राकेश। राकेश।।
राकेश ने माईक हातात घेतला।।
तो आज स्टेजवर गोंधळला होता.
तो गाणं विसरला की, काय असं सगळ्याना वाटत होतं..
पण आलेला आवंढा गिळत राकेश बोलला..
एकटेपणा शाप की पाप

देवा तु असा कसा रे
माझेच नशीब लिहिण्यास गेलास।।
कलमात शाई भरण्यास विसरलास।।।

हजारोंच्या गर्दीतला माणुस मी आहे एकटा रे।।
रंगमांच्यावरची कला संपली की, लोक एकमेका सांगतात..
वाजवा टाळ्या रे।।

ह्या टाक्यांच्या कडकडाटात
माझ्या हृदयाचा आक्रोश नाही
ऐकायला येत का रे।।
हजारोंच्या गर्दीत असूनही
देवा मी एकटा रे।।

देवा।। देवा।। देवा।।
तुच सांग हा
एकटेपणा शाप की पाप
कधी संपेल हा वनवास..

समजुन तर मी ही आहे
चित्तेवरचं ह्याचा शेवट..
तरीही आज
मी हजारोंच्या गर्दीत असुनही
जगतो एकटं…
देवा सांग ना
एकटेपणा शाप की,पाप

नाटकाचा पडदा पडला।। टाळ्यांच्या कडकडात राकेश भानावर येत। डोळे पुसतच त्यांनी घरची वाट धरली…

ही सत्य घटना आहे।।
ह्यातील पात्र ही सत्य घटनेतील नावानेच मांडलेत।।।
🖋 प्रशाली घरत🖋

Other Articles : 

सौंदर्या मागे वासनेचा डाव 

सौंदर्यामागे वासनेचा डाव

✒सौंदर्यामागे वासनेचा डाव

आज सकाळपासुन ती खुप खुष दिसत होती. चेहऱ्यावरचा आनंद लपविण्याचा तिचा प्रयत्न चालू होता.पण मैत्रिणीच्या नजरेने ते बरोबर हेरलं होत. आणि न राहूनच सई बोलली आज कुणीतरी खुप खुष दिसत. पोर्णिमाने लाजुनच आपला चेहरा लपविला.  सई पौर्णिमाजवळ गेली अन हळूच कानात पुटपुटली . ‘कोणी साहेब बरेच खुष करुन गेलेत वाटत रात्री’ पौर्णिमा तिच्या कडे बघुन लाजली.आणि गालातल्या गालात हसून रूममध्ये गेली.सौंदर्यामागे वासनेचा डाव

रुममधल्या आरश्यात आपला चेहरा न्याहळत  खुर्चीत बसली.गालावरची केसांची बट कानामागे करत पुन्हा आपला चेहरा आरश्यात बघत राहिली. परत कानामागची बट गालावर घेत रोज छातीवरून खाली येणारा पदर आज परत परत सावरत होती.आज हा देह कोणा एकाच्या मालकीचा होईल म्हणून पुर्ण शरीर झाकत होती.

बाळाच्या रडण्याने ती भानावर आली. आरश्यातील तिची नजर बाळाच्या झोळीवर गेली.गालावर सोडलेली केसांची बट कानामागे घेत ती बाळाच्या झोळी जवळ गेली. आणि बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे बघत झोळीला झोका दिला.झोक्याचा  हेलकवा लागताच बाळाने पुन्हा डोळे बंद केले. पुन्हा एकदा तिने बाळाकडे नजरेचा कटाक्ष टाकत जवळच्या भिंतीला टेकून बसली.

Saundrya mage vasnecha dav
Saundrya mage vasnecha dav

पौर्णिमा आज भुतकाळात गेली. कोठीवर येऊन पौर्णिमाला जवळ जवळ पाच वर्षे झाली होती. पण पौर्णिमाला कधी तिचा भुतकाळ आठवला नाही. आज तिचा 25 वर्षाचा भुतकाळ तिच्या बंद डोळ्यात नाचु लागला.

गावभर मजुरी करणारा तिचा बाप आणि पाटलाच्या वाड्यावर दिवसभर राबणारी तिची माय तिला आठवली.आठ वर्षे लग्नाला होऊन पण पोटाला मुल नसल्याने शेंदूर फासलेल्या दगडापासुन,तर लोकांनी सांगितलेल्या भगत बुवांकडे नवस केले होते.लग्नाला दहा वर्षे झाली नी गोड बातमी समजली. आणि पोर्णिमच्या रात्री लख्ख प्रकाशात जशी एखादी चांदणी,लख्ख चमकावी इतकी सुंदर मुलगी त्यांना झाली. सौंदर्याला  नजर लागेल इतकी रूपवान दिसणारी.तिच्या बापाने मुलीच नाव पौर्णिमा ठेवलं.

संसाराच्या वेलीवर आलेल्या फुलला जपण्यासाठी तिची माय घरातच राहत होती. आणि लेकीला डॉक्टर करायची म्हणून तिचा बाप गावभर मजुरीवर जायचा.. एक दिवस काळाचा महिमा पालटला आणि पौर्णिमेला वर्ष नाही होत तर तिचा बाप कामावर असतानाच काळाने त्यांच्यावर  घाला घातला. पोर्णिमच्या आईला तर आकाश पाताळावर कोळल्यासारखं झालं.. आज तिला तिची हंबरडा फोडणारी माय आठवली…

बापाच प्रेत घरात येताच ‘धनी’ म्हणुन गावाच्या बाहेर पर्यत आवाज जाईल इतक्या जोराने हंबरडा फोडलेली माय , पोरीला डॉक्टर करणार होता  ना धनी  त्याच्या प्रेताला  हलवून हलवून  ‘धनी परत या’ म्हणून रडणारी  माय ।। आज तिला दिसु लागली होती.

बापाला स्मशानात नेताना आणि भिरभिरत्या नजरेने तिची माय पौर्णिमेला जवळ घेऊन रडत होती. बापाच्या चितेला आग लावली गेली. चितेचा वानवा पेटला.. आणि थेट त्याचा धूर आकाशापर्यंत पोहचला.. आणि तिथुनच सुरू झाला तिच्या माईचा आणि तिच्या ‘जीवनाचा  संघर्षमय प्रवास’

तिची माय आता परत पाटलाच्या वाड्यावर कामावर जाऊ लागली. पाटलाची मुलगी पौर्णिमा पेक्क्षा थोडी लहानच होती. आईच्या बरोबर पाटलाच्या वाड्यावर जाणारी पोर्णिमा आईच्या मागे मागे फिरत पाटलाच्या पोरीचे होणारे लाड बघायची. तीच उरलं सुरलेलं दुध बिस्कीट ती खायची..पाटलाच्या पोरींचे फेकायला दिलेले कपडे ती  घरी घेऊन घालून फुटलेल्या आरश्यात परत परत बघत  आईला विचारायची ‘ आई मी पण दिसते का ग पाटलाच्या पोरीसारखी परी’ तिची आई तीला जवळ घेत सांगायची पोर्णिमा तु तर कोणत्या परी पेक्ष्या कमी नाय..तुला शिकुन मोठं डाक्टर व्हायच आहे.. मग तुला कोणी पण राजकुमार भेटल ..तेव्हा पौर्णिमेला राजकुमार कोण असतो माहीत नव्हतं. मग ती आईला विचारायाची आई राजकुमार कोण असतो ग ? आणि आई एकच सांगायची की आता तुला माहीत नाही मोठी झालीस की,माहीत होईल. आता झोप सकाळी लवकर उठाव लागेल..(सौंदर्यामागे वासनेचा डाव)

राजकुमार नक्की असतो तरी कोण? हा विचार करत पौर्णिमा झोपी  जायची.

एक दिवस अशीच तिची माय कामावर गेली असता पाटलाची बायको आणि मुलगी बाहेर गेली होती.. पाटील एकटाच घरात असताना पाटलाची वासनी नजर तिच्या मायवर जात होती.. त्याची ती नजर चुकवत तिची माय काम करत होती. काहींना काही तिच्याजवळ मागुन,पाटील तिच्या आईच्या शारीरावरून नजर फिरवत होता..खुप दिवसाने पाटलाची  मुलगी घरात नसल्याने पौर्णिमा तिच्या खेळण्याशी खेळत होती.  तिची आई किचन कडे गेली तोच पाटील ही आईच्या मागे गेला.. किचन मधुन तिच्या आईचा परत परत आवाज होता , सोडा मला नाही तर मी मालकिण बाईला सांगन. पण कधी खेळण्यातील घोड्यावर  न बसलेली पौर्णिमा तिकडे लक्ष न देता घोड्यावर बसुन खेळत होती.. आणि थोड्याच वेळात आईच्या किंकाळण्याचा आवाज आला म्हणुन पौर्णिमा किचन कडे धावली.. तिच्या आईच्या साडीला आग लागली होती. पाटील बाजूला उभाच राहून हे पाहत होता.. पौर्णिमा एकदम आईजवळ जाऊ लागली तोच पाटलांनी तिला हात पकडून लांब केलं.. ‘तुझी आई गेली’ तिची आई जिवाच्या आकांताने पौर्णिमा कडे  बघून ह्याने मला पेटवली सांगत होती.. आणि रडणाऱ्या पौर्णिमा कडे बघत मी नाही, मी नाही सांगत होता..

आई पुर्ण पेटली होती आणि पाटलांनी पोर्णिमाला सांगितलं तु कोणाला सांगितलंस तर तुला पण असच करेन .घाबरलेल्या पोर्णिमाने आज पर्यंत कोणालाच सांगितल नव्हतं.. आईबापाला पोरकी झालेली पौर्णिमा पाटलाकडेच राहू लागली..

त्याच्या मुलीची लहानसहान कामे करू लागली.. आता पौर्णिमा जशी जशी मोठी होऊ लागली तशी सगळीच काम करू लागली..पाटलाची मुलगी शाळेतून आली की तीच दप्तर ठेवण, जेवण देणं तिची सगळीच काम पौर्णिमा करु लागली..

आता पौर्णिमेला विसाव वर्ष पूर्ण झालं होतं.. ती दिवसेंदिवस रूपवान दिसत होती.. पाटलाच्या मुलीला कधी कधी तिच्या सौंदर्याचा राग ह्यायचा ..

बापासमान असलेल्या पाटलाची नजर तिच्यावर जायची .. तिला सगळ्याचा कंटाळा येत होता.. अशातच एक दिवस कोणी तरी पाटलाच्या वाड्यावर कोणी पाहुणा आला होता.. त्याची नजर पौर्णिमावर गेली आणि पाटला कडून तिची माहिती काढली… जाता जाता पाटलाला सांगुण गेला की 20हजार देईन सौदा पक्का का?

पाटलांनी मानेनेच हो केलं. आणि तो पाहुणा निघून गेला. बायकोला ही पाटलांनी समजावलं की पौर्णिमाला देऊन.. वीस हजार मिळतील पोर्णिमाने हे ऐकलं होत पण ती काही विचारू शकत नव्हती..

नक्की कसला सौदा झाला हा विचार करत पौर्णिमा झोपी गेली..

सकाळ होताच तो पाहुणा परत आला नी पाटलाच्या हातावर  वीस हजार रुपये देऊन कुठे आहे ती विचारू लागला. पाटलाची बायको पोर्णिमेचे कपडे पिशवीत भरत सांगत होती की आज पासुन तु  ह्यांच्याकडे राहायचं.. पौर्णिमाने  विचारलं का? पाटलीन बाई म्हणाली, आम्ही तरी किती पोसु तुला आणि तिची पिशवी हातात देत ती तिला बाहेर घेऊन आली.. पौर्णिमा गोधलेली होती. नक्की काय होत तिला कळत नव्हतं ती त्यांच्यासोबत जात नसतानाही ही जबरदस्ती तिला पाठवल जात होतं.. पाटलांनी तिच्याकडे पाहत एकच सांगितलं तुझ्या आईच काय झालं होतं आठवत का तुला? की आज तुला आठवण करून देऊ. शेवटी तो भयाण प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला नी गाडीत बसली.

आज पाहिल्यादा ती इतक्या चांगल्या गाडीत बसली होती. गाडी चालु झाली.

वाऱ्याची एक झुळुक तिच्या अंगाला स्पर्शून गेली.

गाडी चालवणाऱ्या पाहुण्यांची नजर आरश्यातून तिच्यावर पडत होती.. ती अजूनच अंग चोरून बसत होती.. आपण कुठे चाललोय हे विचारण्याची पोर्णिमाची हिम्मत नव्हती..

मग पाहुण्यांनीच आरश्यात बघुन सांगितलं की, घाबरु नकोस तुला आता चंदेरी दुनियेत घेऊन जातोय.. तरी पौर्णिमा गप्पच।।।

आणि गाडी वळण घेत घेत एका गल्लीतुन आत गेली. आणि एका अस्तव्यस्त चारपाच रूमच्या समोर उभी राहिली.

खुप सुंदर सुंदर मुली तिथे फिरत होत्या . कोणाचा पदर खाली येत होता तर कोणाची साडी नको तितकी वर खोचलेली. पाहुण्यानी  गाडीचा दरवाजा उघडला आणि पोर्णिमाला बाहेर येणास सांगितलं..

पौर्णिमा बाहेर येताच कोणीतरी बाई बाहेर आली.. ती  पौर्णिमेला केसापासुन पायापर्यंत न्याहळत बोलली ” वा क्या माल हें”

आणि पौर्णिमेला आत नेत तिच्या समोर पाण्याचा ग्लास पकडत म्हणाली “खुप सुंदर दिसतेस पोरी” !

संध्याकाळ होत चालली होती तरी पौर्णिमा एक शब्द ही बोलली नव्हती.. कोणी साहेबी पोशाकात,तर कोणी पिउन तर कोणी सिगारेटचे धुर सोडत पुरुष येत होते.. एक नटूनथटून येणाऱ्या मुलीकडे बघत पौर्णिमाने तिला विचारलं इथे कोण कोण राहत हे सगळेच का? ती मुलगी न बघताच म्हणाली,तु तयार हो सगळं समजेल तुला हळुहळु..

आणि ती निघून गेली.. पौर्णिमा बसूनच होती तोच ती पाणी देणारी बाई आत आली आणि पटपट तयार हो सांगत होती.. कुठे जायच आहे का?अस विचारून पौर्णिमा जागेवर  बसुन होती ..

त्या बाईचा पारा चढला तशी पौर्णिमा उठली आणि लगबगीने आरश्याजवळ जाऊन विस्कटलेले केस नीट करू लागली.. तिला बाहेर नेल..बाहेर खुप पुरुषयांचा घोळका होता..

सगळ्याच नजरा प्रत्येक नटलेल्या मुलींकडे जात होत्या..

पण प्रत्येकाच्या नजरेत फक्त पौर्णिमा भरली 100,200,500, तिच्यावर अशी बोलणी होत 1000 आली.

आणि तिला घेऊन येणारा पाहुणा त्या बाईला सांगत होता की,. आजची पहिली रात्र मला दे ना अक्का हिच्या सोबत आणि त्या बाईची चवतलेली नजर त्या पाहुण्यांवर पडली . तसा तो मागे झाला.. आणि 1000 ची बोलणी लावणाऱ्या माणसाबरोबर पौर्णिमेला आत जायला सांगितलं.. पौर्णिमा अजून गोधळून जात होती.

पण विचारण्याची हिम्मत नव्हती होत .आणि ती आत गेली  दरवाज्याची कडी लावली गेली… आणि तिच्या सौंदर्याची कळी आज एका वासनी मर्दानगीने कुचकरली.. शांत होऊन उठलेला तो माणूस तिच्या उगड्या शरीराकडे बघत आज1000 रुपये सार्थकी लागले सांगून निघुन गेला.. आणि बाहेर येणाची हिंमत नसलेली पौर्णिमा खाटेवरच रडत रडत अंग टाकून राहिली.. रात्रीच्या थकव्याने सकाळी तिला कधी झोप लागली समजलच नाही.. आणि कोणी तरी हात लावुन तिला उठवत होत तशी जागी होऊन पहाते तर एक मुलगी तिला उठायला सांगत होती.. तशी ती उठून बसली.

ती मुलगी बोलली माझं नाव सई . पौर्णिमा अस्ताव्यस्त कपडे नीट करत तीला विचारते हे रात्री आलेले परत आज ही येतील का ? सई पटकन उठून बोलली हो.. ‘रोज नवीन नवीन’येतील.

आणि आवरून घे सांगून निघुन गेली. दुखणाऱ्या अंगाला खाटेवर झटका देत ती उठून बसली.. आणि आवरून घेतल..जवळ जवळ तीन वर्षे लोटली.. पौर्णिमा आई झाली.. कोणाचं आहे, कोण असेल ह्याचा बाप अस रोज तिला तीच मन विचारायचं त्यात रडणाऱ्या बाळाला बघत अक्का राग राग करायची..तिला ओरडून ओरडून सांगायची कोणाजवळ करून ह्याला जन्म दिलास? हे ऐकून ऐकून आणि रोज येणाऱ गिहृइक आणि बाळाच्या रडण्याचा त्रास तिला असह्य होत होता..

रात्रीच असच एक गिहृइक साहेबी कापडात आणि सुटाबुटात आलं होत. पहिल्यादीच आलेलं दिसत होतं..पौर्णिमाच्या मादक आदेकडे  बघत रात्रीचे वाटतील तितके देईन..

पौर्णिमा त्यांच्या बरोबर आत गेली .. तोच बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर आला .. तीच मन त्या आवजाने बेचैन झालं.. ती पटकन आवरा साहेब बाळ रडत सांगुन खाटेकडे गेली.. तिच्या मनाची  अवस्था त्यांनी ओळखली . तिच्या हाताला पकडून ते म्हणाले तु खुप रूपवान आहेस बाळाला घे जा ..उद्या परत येईन,तेव्हा तुला नी तुझ्या बाळाला कायम घेऊन जाईन..

ती साहेबांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली ‘खरच साहेब’आणि साहेब  मानेनेच हो करत निघून गेला..”हाच असेल का माझा राजकुमार आईने सांगितलेला”  हा हाच असणार ती पटकन हसत बाळाच्या रडण्याने भूतकाळातुन बाहेर आली.. आज बाळाने रडू नये म्हणुन त्याला पटकन झोळीतून काडून घेतलं त्याला दुध पाजत कधी रात्र होते वाट पाहत होती.

जशी जशी रात्र होत होती तशी ती लाजरीमुजरी होत होती परत परत आरश्याजवळ जाऊन पदर नीट करत होती. आज साडी जास्तच जमिनीवर लोळेल इतकी खाली नेसली होती.. बाळाकडे बघत पुन्हा पाजू का म्हणजे  रडणार नाही हा विचार करत होती.. गिर्हाईकांची येण सुरू झालं होतं..  बाळाला झोका देत बाहेर नजर टाकत होती.. साहेब म्हणजे आईने सांगितलेला राजकुमार कधी येईल म्हणून परत परत खिडकीतून बाहेर नजर टाकत होती.. परत परत तिला अक्का आवाज देत होती पण पौर्णिमा बाळ जाग आहे म्हणून खोट बोलत होती.. अक्काचा पारा चढत होता पण साहेब येतील की नाही म्हणुन तिचा जीव कासावीस होत होता.. तोच कोणी तरी आलं..  या साहेब  अक्काचा आवाज पौर्णिमाच्या कानावर पडताच ती खिडकीतून आधाश्यासारखी बघु लागली.. माझ्या  आईने सांगितलेला राजकुमारच आहे म्हणुन बाळाच्या अंगावरच नीट करत . बाळाच्या गालावर गोड पापी देत .आपल्याला राजकुमार घेऊन जाईल.. साडी सारखी  करत ती बाहेर गेली साहेबाची नजर तिच्यावर पडताच ती लाजली..पोर्णिमाकडे पाहतच तो अक्काला पाहिजेत तितके पैसे सांगून आत येऊ लागला.. पौर्णिमा मनात विचार करत होती,आज का बोलणी केली. आज तर मला नि माझ्या बाळाला घेऊन जाणार आहेत ना?? पण काही न बोलता ती आत गेली.. ती आज कालच्यापेक्ष्या सुंदर दिसते .. सांगुन साहेब तिला लाजवत होते. आणि अजुन अजुन तिच्या चेहऱ्यावरची लाली चढत होती..आणि आज जणु काही पाहिल्या रात्रीचा आनंद घेत हाच तो राजकुमार मनात विचार करत होती..

वासना
सौंदर्या मागे वासनेचा डाव

शांत झालेला त्याचा तो मर्दानी देह तिच्यापासून दुर झाला . अंगावरचे कपडे घालत खुप खुष केलस सांगत होता.. तु खरच पोर्णिमेच्या रात्री चमकणारी चांदणी आहेस.. तशी ती लाजुनच उठली आणि बाजुला पडलेली साडी घालत साहेबांच्या समोर जाऊन उभी राहिली.. त्याच्याकडे   लाजरा कटाक्ष टाकत साहेब तुम्ही माझे राजकुमार.. लहानपणी माझ्या आईने सांगितलेला राजकुमार मोठी झाल्यावर समजला कोण असत ते. त्याचा तिने घेतलेला हात त्यांनी जोरात हिसकावून टाकला आणि रागाने म्हणाला ,कोण राजकुमार?????  पौर्णिमाच मन भरून आल आणि ती म्हणाली,तुम्ही ।। तुम्ही आज मला नी बाळाला घेऊन जाणार ना..

तोच तो लांब होऊन म्हणाला,रात्री सांगितलेलं विसर..कोठीवर काम करणारी बाई तु .. तुझा कोणी राजकुमार नसेलच.. इथे येणारे फक्त आपली वासना शांत करण्यासाठी येतात.. तु कितीही सुंदर असली तरी घरी नेणारा कोणी राजकुमार येणार नाही इथे ही कोठी आहे कोठी,कोण्या राजकुमारिचा राजवाडा नाही की, कोणी तुला घेऊन जाणारा राजकुमार येणार इथे…. तु सुंदर आहेस पण वासनेने भरलेल्या शरीराची आग विझवणारी तु कोठेवाली आहेस…तिने त्याचा  हात हातात घेत ला,साहेब हे तुम्ही खोटं बोलता ना ?? त्यांनी तिच्या हाताला जोरात हिसका देत दरवाज्याकडे जात सांगितलं ‘तुझा कोणी राजकुमार नाही’ आणि  दरवाज्या नको तितक्या जोरात बंद करून निघून गेला..त्याच्या पाटमोऱ्या जाणाऱ्या शरीराकडे बघत ती म्हणाली ‘नसेल कधी माझा राजकुमार’  खांद्यावरून खाली आलेल्या पदराला तिला नीट करावासा वाटला नव्हता .. तिला एकच आठवत राहील वासनेने भरलेल्या शरीराची आग शांत करणारी तु, तुझा कोणी राजकुमार नसेल ।।।।।

विस्कटलेली साडी घेऊनच ती बाळाकड निघून गेली।।

 

🌺✒अनामिक✒🌺

।।प्रशाली घरत।।

आयुष्य तिच्या शिवाय पूर्ण नाही आई

Aai var marathi kavita

Marathi kavita

आयुष्य तिच्या शिवाय पूर्ण नाही💐
जन्मदाता आईला अमूल्य वाटते
तिच्या बाळाचे पाहिले हसू
किती अस्मरणीय क्षण
असतो तो नाही का…???

त्याच्या त्या खेळण्या बागडण्यात
जणू ती तीच बालपणच जगत असते
आणि त्याच्या पडण्याने इजा तिला होत असते
वेगळीच माया असते आईची नाही का…???

त्याचे ते बोबडे बोल किती गमतीदार असतात
आणि ही भाषा त्याची फक्त आईला कळते
अडचणीच्या वेळी तीच त्याला सावरते
किती प्रेमळ असते आई नाही का…???

 marathi kavita aai
marathi kavita aai

त्याच ते धावत येऊन तिला बिलंघण
तिच्या हाती बोट ठेऊन फेरफटका मारणं
किती आगळा वेगळा अनुभव
असतो तो नाही का…???

पण आता या सगळ्या गोष्टींच
विस्मरण झालय त्याला
तिला मिळणार थोडसं सु:ख
पण पाहवत नाही त्याला,

 marathi kavita aai
marathi kavita aai

त्याच्या समोर तो आणि
आहे त्याच आयुष्य
तो तिला दुःखी ठेऊन फक्त
स्वतःच सु:ख पाही
त्याला कोण समजवणार
आयुष्य तिच्या शिवाय पूर्ण नाही…
आयुष्य तिच्या शिवाय पूर्ण नाही…
✍देवेंद्र आंबेकर
(7350545939)

आमच्या इतर कविताही वाचा:

नको जाउस प्रिये

जालीम झाल्या राती प्रिये : मराठी कविता

वेड्या मना : मराठी कविता

ghe kushit marathi song

marathi poem paus

Marathi poem paus

marathi poem paus latest marathi poem

आला आला पाऊस आला

पाऊस आला मला भेटण्याला

आला आला पाऊस आला

मला भेटण्याला….

मेघ गरजले धाय मोकळून

आभाळातल्या दगडी लोटून

हिरवे डोंगर आले अंगणी

सुसाट वारा फिरे रिंगणी

दाही दिशांना लोटून आला

मला भेटण्याला….||१||.

आला आला पाऊस आला मला भेटण्याला

Marathi poem paus
Marathi poem paus

हे तुम्हाला आवडेल : स्वप्नाच्या पलीकडे एक काटेरी वाट

          आठमाहीची प्रतीक्षा संपली

          आज देहाने कस्तुरी सांडली

          इथे तिथे मी चिर फाटलेली

          स्पर्शाने तुझ्या आज सांधली

          सुवास माझा घेऊन आला

          मला भेटण्याला…..||२|| आला आला…पाऊस आला मला भेटण्याला

हि कविता तुम्हाला आवडेल : बघ ना 

येण्याने तप्त श्र्वास उडवले

तृप्तीने अमृत आत जिरवले

कुजबुज बीजांची पडली कानी

आनंदाने सारे गाती गाणी

हिरवे जन्म देण्या आला

मला भेटण्याला…….||३||आला आला…पाऊस आला मला भेटण्याला

दर्द भरी कविता : मोहब्बत का जनाजा

या विश्वाला ओढ तयाची

तुझ्या न् माझ्या मिलनाची

तुझ्या विना ही सृष्टी अपुरी

अर्धांगिनी मी तुझी अधूरी

सर्वाआनंद जुळवून आला

मला भेटण्याला…..||४||

आला आला पाऊस आला

मला भेटण्याला…….

दुसरी कविता  : नावाची शेती 

नावाची शेती

भुमी फाडीतं फोडीतं

चाले नांगर वाडीतं

दाणा जन्मघ्याया पुन्हा

गाडी मातीच्या ओटीतं

 

कूस उजवी उजवी

हळू उसवून माती

दिसे हिरवेगार मनं

हसे डुलणारी पाती

 

रोपे टोचिता टोचिता

हाती चिखल मातीत

खत घाली भावनांचे

येई पालवी जोमात

 

पीकं निंदता कापता

ताठ लक्ष्मीच्या ठायी

उभ्या जगाचा पोशिंदा

लवे दहावेळा पायी

 

जरी हरी घरभरी

बारमाही गाळी घाम

तरी मिळे पोटापुरी

उरे काहीनाही दाम

 

असे शेती त्याचे नाम

असे शेती त्याचे नाम

कवी : भालचंद्र पाटील 

जर तुमच्याकडे स्वता: लिहिलेल्या कविता असतील तर आम्हाला नक्की पाठवा आपण त्या आपल्या वेबसाईट वर आणि युटूब वर ऑडीओ  स्वरूपात त्याचबरोबर लेखी स्वरूपात प्रदर्शित करू.कविता या स्वरचित असाव्यात पुढील नंबर वर आपण कविता पाठवू शकता त्याच बरोबर आपला युटूब च्यानेल सब्स्क्राइब करा सर्व कविता ऐकण्यासाठी  ९६६५३७३७३९

नवीन मराठी वेब सिरीज साठी आम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छे प्रमाणे पैसे पाठवून आम्हाला मदत करू शकता.वेबसाईट वरील सर्व कविता,चित्रपट ,मनोरंजन,देश विदेशातील घडामोडी जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा आणि मिळवा सगळ्यात आधी नोटिफिकेशन.

you will like to read,because our containt is unique,however people are trying to read best containt,but they dont findon web portal,because its not possible to get it on website.

फिल्म ग्रुप कसा असावा.

फिल्म ग्रुप

फिल्म ग्रुप कसा असावा.

2016 नंतर अचानक कलाकार,निर्माते,स्व घोषित दिग्दर्शक संस्था,मंच,यांची संख्य। कॅन्सर प्रमाने वाढली आहे खरे तर हा अतिरेक आहे नियमा प्रमाने गरजे पेक्षा जास्त पुरवठा झाला तर किंमत राहत नाही,प्रत्यकाने आपला ग्रुप काढला आहे,प्रथम मेंबर आपल्या मित्राना ऍड करतो नंतर ग्रुप चॅट साठी इतर ग्रुप वर लिंक शेअर करतो,परिणाम दुसरे लोकांना अगदी सोपे होते ग्रुप मध्ये येणे त्याला तर,तंमता नसते कोणता मेसेज कधी फॉरवड करायचा उदा. एक मॅसेज ग्रुप वर आला होता,एक फिल्म पूर्ण झाली शेवट,चा सिन झाल्यानंतर ती हिरोइन घरी जात असताना अतिशय दुर्दैवी घटना घडली एक्सिडेंट झाला अनि तिचा मृत्यू झाला त्या फिल्म ला रिलीज करण्यासाठी काही मदत हवी आहे अशी पोस्ट फिरत होती सोबत त्या हिरोईन चा फोटो जोडला होता,एका मेंबर ने त्या मुलीचे डिटेल माझ्या पर्सनल नं वर पाठवा आम्हाला अमच्या नविन प्रोजेक्ट साठी हेरॉईन हवी आहे,पूर्ण पोस्ट न वाचता प्रतीक्रीया देने यौग्य अ।हे का,ग्रुप एडमीन यांनी ग्रुप चें नियोजन कारावे नियम कर।वे,जे ग्रुप चे नाव असेल त्याच एक्टिव्हिटी ग्रुप मध्ये झाल्या पाहिजे,जातीयवादी अफवा,राजकीय अश्या पोस्ट ग्रुप मध्ये यायला नको आपल्या मुळे ग्रुप ऍडमीन ला त्रास होऊ शकतो,कुठलिही पोस्ट फॉरवर्ड करताना आपण स्वतःला विचारायला हवे मी पोस्ट करतो आहे.

फिल्म ग्रुप
फिल्म ग्रुप

हे योग्य आहे का,काही लोक स्वतःची इतकी मार्केटिंग करतात भरपूर फोटो टाकतात ग्रुप मधील लोकांना आता कळा यला लागले आहे मी,मी,म्हणून मोठेपणा सिद्ध होत नसतो त्याला कर्तुत्व ची जोड लागते एखाद्याचा मॅसेज कळला नाही तर ग्रुप वर रिप्लाय देऊ नका,आपले अज्ञान उघडे पडते पर्सनल मेसेज करा,काही दिवस झाले ग्रुप एडमीन नियम फॉलो करायला सांगत आहे,तरीपण नवनिर्वाचित कलाकार,निर्माते दिग्दर्शक चूका करत आहे,जर आपल्याला कोणता मॅसेज कधी टाकायचा हे जर कळत नसेल तर आपण कसे काय यशस्वी होणार ,एक राजकीय ग्रुप चे महाराष्ट्रभर जाळे पसरले आहे मंत्री,उदोजक,व्यपारी,युवा नेते,अत्यंत शिस्त पूर्वक ग्रुप चालवत आहे तेच आपण कसे वागतो एक जिवंत उदा,श्री देवी चे अत्यतं दुर्देवी निधन झाले त्याच्या पोस्ट फिरू लागल्या टब बाथ,दारू,पद्मश्री ,यावर जोक्स करू लागले सदमा पहिल्या वर आपल्या ला कळेल एक 12 वर्षा च्या लहान मुली चे भावना विश्व जिवंत करून ते साकार करणे वाटते तेवढे सोपे नाही दिवस रात्र,तीन,तीन,शिप मध्ये काम करणे फार अवघड आहे.

फिल्म ग्रुप
फिल्म ग्रुप

अपल्याला तर एक शिप मध्ये सुद्दा काम मिळत नाही आपण श्री देवीला पदमश्री का दिली हे बोलणे यौग्य नाही,निदान तिचा अंत्यविधी तरी पूर्ण होऊ द्यायला हवा होता ,ती आपल्या जाती ची म्हणजे कलाकार जाती ची होती हे विसरले,ग्रुप असा करा की प्रत्येक कलाकार या ग्रुप मध्ये समिल होण्या करीता उत्सूक असला पाहीजे संडे ला ग्रुप सु संवाद असला पाहिजे,इतरांना काम मिळाले पाहीजे काही नाही समजले तर ग्रुप वर बोलू नका आपले अज्ञान उघडे पडते पर्सनल मेसेज करावे मेंबर ने सुद्दा इगो बाजुला ठेऊन विचारांची देवाण घेवाण कारवी,एक मेकांना मदत करा ग्रुप वर सिनियर लोक आहेत त्यांचा अपमान होईल असे वागू नका ।।

सनी शेख ,
निर्माता दिग्दर्शक,इन्व्हेस्टर

वाचा इतर  माहिती :

Manto Official Trailer Nawazuddin Siddiqui Nandita Das 21st September 2018

सिल्वेस्टर स्टेलोन शुन्यातुन विश्व निर्माण करणारा अभिनेता

मराठी चित्रपट सृष्टी नफ्यात कि तोट्यात

sairat

मराठी सिनेसृष्ठी खरंच नफ्यामध्ये आहे का ???
सैराट चित्रपटाने ११० कोटींचा टप्पा गाठल्यामुळे मराठी सिनेसृष्ठीचा भाव वधारला आहे. अनेकानेक चित्रपट निर्माते मराठीत येऊ पहात आहेत. पण उद्योग म्हंटलं कि नफा-तोट्याचं मुल्यांकन करणं आलंच. कारण कोणताही व्यावसायिक नफा असल्याशिवाय कोणत्याही व्यवसायात हात घालत नाही. मग वर्षाकाठी १०० चित्रपट बनविणारी मराठी सिनेसृष्ठी खरंच नफ्यामध्ये आहे का ? हा प्रश्न कोणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. त्या संदर्भातील काही आकडेवारीचा आढावा आपण या लेखात घेऊया.

PIMPLE MARATHI MOVIE
PIMPLE MARATHI MOVIE

दशमी क्रिएशन LLPचे नितीन वैद्य यांनी गोळा केलेल्या माहिती नुसार २००५ ते २०१५ या दहा वर्षात एकूण ९८५ Films सेन्सर बोर्डाकडे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गेले.ज्यातील फक्त ५६१ चित्रपट प्रदर्शित होऊ शकले.ते ५६१ चित्रपट बनविण्यासाठी, त्यांची जाहिरात करण्यासाठी आणि ते चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आलेला एकूण खर्च होता, ६०३ कोटी रुपये. त्या ५६१ चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं होतं, ४४० कोटी रुपये. म्हणजे जितके पैसे निमात्यांनी चित्रपट बनविण्यासाठी ओतले, त्याच्यापेक्षा १६६ कोटी रुपयांचा कमी व्यवसाय झाला. बरं हे सगळे ४४० कोटी रुपये निर्मात्यांना मिळत नाहीत, निर्मात्यांना त्यातले फक्त ३५ टक्के मिळतात. ४४० कोटी रुपयांमधले ३५ टक्के म्हणजे, १५४ कोटी रुपये. याचाच अर्थ ६०३ कोटी रुपये खर्च करून निमात्यांना फक्त १५४ कोटी रुपये परत मिळाले. म्हणजेच मराठी सिनेसृष्ठी २००५ ते २०१५ या १० वर्षांमध्ये ७४% नुकसानीत होती.यातील १५ ते २० % नुकसान निर्मात्यांनी मिळालेले अनुदान, satellite हक्क, संगीत हक्क आणि Digital हक्क विकून भरून काढले असावे. पण याने मराठी सिनेसृष्ठी नफ्यात येत नाही.

आता मराठी चित्रपटांचा व्यवसाय कमी होण्यामागची कारणे शोधायची झालीच तर,अनेक तज्ञ लोकांच्या मते चित्रपटांची वाढत असलेली संख्या याला बहुतांशी कारणीभूत आहे. २०१७ या एकाच वर्षी १०० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात हिंदी चित्रपटांशी हि मराठी चित्रपटांना स्पर्धा करावी लागते.अशा वातावरणात मराठी चित्रपटांचा व्यवसाय होणं फार कठीण होऊन बसतं.

Koti-Marathi-Movie
Koti-Marathi-Movie

भारतीय सिनेसृष्ठी जी १४२ अब्ज रुपयांची आहे,तिथे बजेटनुसार हिंदी चित्रपटांचा वाटा ५१ % आहे तर तेलगु आणि तमिळ भाषिक चित्रपटांचा वाटा ३० % इतका आहे.उरलेल्या १९ % मध्ये इतर प्रादेशिक भाषांचे चित्रपट येतात.याचा अर्थ तेलगु-तमिळ चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटावर अतिशय कमी खर्च केला जातो. त्यामुळे चित्रपटातील भव्यतेला मराठी प्रेक्षक मुकतात आणि ते चित्रपटाकडे पाठ फिरवतात. चित्रपट पाहायला येणाऱ्यांची संख्या रोडावल्यामुळे हि चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. PVRचे CEO अजय बिजली यांनी दिलेल्या अहवालातून असं समोर येतं कि, भारतात २०१३ साली ३४ कोटी लोक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेले आणि २०१७ मध्ये चित्रपट पाहायला जाणाऱ्यांची संख्या कमी होऊन ती २७.५० कोटी इतकी झाली. हि आकडेवारी पूर्ण भारतीय सिनेसृष्ठीतील चित्रपटांसाठीची जरी असली तरी यावरून आपल्या लक्षात येतं कि, भारतात किती झपाट्याने प्रेक्षकसंख्या कमी होत आहे. आणि ह्याला कारण आहे नव्याने येऊ घातलेल्या Netflix, Hostar सारख्या इंटरनेट मनोरंजन सेवा. ज्यावर तुम्हाला दर्जेदार कलाकृती तर पाहायला मिळतातच, त्याचसोबत आपल्या वेळेनुसार, आपल्या सोयीनुसार सेवेचा उपभोग घेण्याचं स्वातंत्र हि मिळतं.

Dhaap Marathi Movie
Dhaap Marathi Movie

तात्पर्य काय तर मराठी सिनेसृष्ठीमध्ये एका-दुसऱ्या चित्रपटाचं यश पाहून, कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता पैसे गुंतवणाऱ्या निर्मात्यांसाठी या आधीचा काळ तर कठीण होताच पण येणारा भविष्यकाळ हि प्रचंड संघर्षमय असणार आहे.

लेखकसनी शेख (दिग्दर्शक)

 

 

Read Other Articles :

Yamla Pagla Deewana Phir se Movie Trailer and Cast

सिल्वेस्टर स्टेलोन शुन्यातुन विश्व निर्माण करणारा अभिनेता

 

स्वप्नांच्या पलीकडे एक काटेरी वाट : कॉलेज डेज

College days

!! स्वप्नांच्या पलीकडे _एक काटेरी वाट ..!!

कॉलेज के वो दिन याद आते है
कमीने दोस्तो कि याद,
अकेले में बोहोत रुलाती हे,
काश आ जाते वो दिन वापस,
साला दोस्तो से जादा,
उस बेवफा कि याद बोह्त सताती है !”
“कॉलेज…!” असं एकदा बोललं तरी डोळ्या समोरून भर भर पुस्तकाची पान उलटावी तसे ते सोनेरी क्षण उलटायला सुरुवात होते.कट्ट्यावर मित्रांसोबत चहा घेण,लेक्चर ला लास्ट बेंच वर बसणं,आणि जिच्यावर जीवापाड प्रेम करूनहि जी भाव देत नाही तिच्याकडे सोंबडित पाहणं हे सगळ काही नवीन नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असे चढ उतार येतच राहतात.मग अशा एकतर्फी प्रेमासाठी एकच गाणं सुचतं “पत्थर के सनम मैने तुझको मोह्ब्ब्त का खुदा माना”.

College days
College days

हे सगळ काही कॉलेज लाईफ मध्ये होत.आता कॉलेज संपल कुणी एम.एस.सी तर कुणी एम.बी.ए करत.मी मात्र माझ्या ध्येयपुर्ती साठी अजून धडपडतोय.लहान असताना कुणीही आपल्याला विचारत बाळा तुला मोठ झाल्यावर काय व्हायचंय ? माझ उत्तर ठरलेलं असायचं मला मोठा अभिनेता व्हायचयं.असं उत्तर ऐकल्यावर साहजिकच आहे कि समोरचा हसून निघून जाणार किंवा आपल्याला वेडा ठरवणार.अशा वेळी खूप वाईट वाटायचं.गावी बारावी झाल्यावर बी.एस.सी करण्यासाठी मी पुण्यात आलो.पुण्यात माझ कुणीच नव्हत.हळू हळू मित्र झाले.आणि आमच नात सख्या भावांसारख घट्ट झाल.पुण्यात आलो तेव्हा रहायची सोय नवती,भाड द्यायला पैसे हि नव्हते तेजस,अमर,कुलदीप आणि मी आमची मैत्री इतकी घट्ट झाली होती कि कॉलेज मध्ये आम्हाला सगळेच ओळखायचे.पुण्यात आलो तेव्हा तेजस सोबत त्याच्या रूम वर मी एक वर्ष फुकटच राहिलो.आणि तोच माझ्या साठी मोठा आधार होता.बी.एस.सी.झाल्यावर मी मुंबईला गेलो कारण अभिनयासाठी तिकडेच जाव लागत असं मी ऐकल होत,तिथ गेल्यावर समजल इथे पावलो पावली आपल्याला फसवणारी आणि लुबाडणारी माणस खूप आहेत,मी दीड महिन्यातच परत आलो.जॉब सुरु केला,त्याच बरोबर लघुपट तयार करण्यास सुरुवात केली,आणि नाटकांमध्ये हि काम चालूच असत,पण Struggle मात्र संपल नाही,

“Struggle करून करून डोळ्यात पाणी येत,
मग कुणीतरी अलगत मैत्रीचा हाथ पुढे करत,
अपेक्षा दुसरी काहीच नसते,
फक्त शेवटपर्यंत आधाराची गरज असते.”

College days
College days

कधी कधी एक वेळ खायचीही भ्रांत पडते.अशा कठीण परिस्थितीतही मला साथ आहे ती माझ्या आईची ती गावीच असते,पण तिच फक्त एकच वाक्य मला या परिस्थीशि झुंज देण्यास ताकद देतो.“तूला जे आवडत तेच कर “आयुष्यात यशाच शिखर गाठायचं असेल तर पैशाच्या भांडवला पेक्षा आपल्या माणसांनी दिलेलं शब्दांच भांडवल खूप मोठ असत”.कविता,चारोळ्या,अभिनय आणि चित्रपट कथा लिहीण हा माझा छंद.कुणी एका बिस्नेसमन ला मी भेटलो मी तयार केलेला लघुपट त्याला दाखवला आणि मी एक कॉलेज लाईफ वर लिहिलेली स्क्रिप्ट त्याला ऐकवली.त्याला माझा अभिनय आणि कथा हि आवडली सगळ तयार झाल.पण त्याच नशीब खराब म्हणव कि माझ हेच समजेना त्याला त्याच्या बिसनेस मध्ये कोटींचा लॉस झाला.आणि हाती आलेल काम अजून लांबणीवर गेल. बर या आशेवर मी जॉब हि सोडला.सगळीच पंचायत झाली.तरी हि मी हरणारा नाही हे क्षेत्रच असं आहे,ज्यांना कुणाला या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्याने हि तयारी ठेवावीच याच काय कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी वारंवार अपयश पचवण्याची शक्ती ठेवा एक दिवस यश नक्कीच मिळेल.जाता जाता सगळ्या वाचकांसाठी एक छानशी चारोळी,

“डोळ्यांसमोरून जरी तू आज दूर असलीस ,
तरी हृदयात तुझी जागा अजून तशीच आहे ,
स्वप्नात जरी फक्त तू असलीस तरी आता ,
स्वप्नांच्या पलीकडे एक काटेरी वाट आहे “

College days
College days

©® योगेश बबन गाडगे.

बघ ना : मराठी कविता

🌹बघ ना….🌹

बघ ना एकदा कोवळे हसुन माझ्यासाठी,
गुलाबाच्या पाकळ्या फुलवुन बघ ना
तुझ्या कोवळ्या ओठी…!!

लांब लांब तुझ्या केसात,
गजरा माळवुन बघ ना
एकदा माझ्यासाठी,
नकार तु मला रोजच दे,
पण एकदा खोट खोट हो म्हणना,
आपल्या संसाराची स्वप्न पहाण्यासाठी..!!

©® योगेश बबन गाडगे.💏

तुझ्या वाचून : चारोळी

सांजवेळी आज वात जळते आहे,
साथ दिली दिवा होउन तुझ्यासाठी,
फक्त दाहच मला जाणवतो आहे,
संपली तु वात केव्हाच
अंधार तुझ्यावाचुन आता मला कळतो आहे.
©® योगेश बबन गाडगे.