सिल्वेस्टर स्टेलोन शुन्यातुन विश्व निर्माण करणारा अभिनेता

Sylvester Stallone : बेघर परिस्थिती ते जगप्रसिद्ध सिने नायक,
अभिनेता आणि श्रीमंत व्यक्तिमत्व सिल्वेस्टर स्टेलोन

प्रेरणादायी सत्य घटनांवर आधारित जीवनगाथा
ही कथा वाचूनही तुमचे रक्त सळसळले नाही तर ते रक्त नसून पाणी आहे.आयुष्यामधील प्रचंड दुख संकट आणि दारिद्र्यापासून सुख समृद्धीचे साम्राज्य उभे केले.सिल्वेस्टर स्टेलोन, जगप्रसिद्ध सुपरस्टार हॉलीवूड अभिनेता, २०१६ साली नमूद केलेली संपत्ती ४ बिलियन डॉलर म्हणजे भारतीय २४० खरब रुपये इतकी आहे. हि झाली सिल्वेस्टर स्टेलोन ची वर्तमान परिस्थिती.

भूतकाळात सिल्वेस्टर स्टेलोन काही चांदीचा चमचा घेवून जन्माला नव्हता आला. त्याने आयुष्याच्या प्रत्येक भागात संघर्ष केला. तो इतक्या आर्थिक अडचणीत होता कि त्याला त्याच्या बायकोचे दागिने हे चोरून विकावे लागले. परिस्थिती इतकी खालावत गेली कि तो शेवटी बेघर झाला. ३ दिवस तो न्यू योर्क च्या बस स्टेशन वर झोपला होता. परिस्थिती इतकी बिकट होती कि न तो घर भाडे भरू शकत होता आणि नाही जेवण विकत घेवू शकत होता.

sylvester stallone
sylvester stallone

आश्चर्याची गोष्ट हि होती कि ह्या परिस्थितीची परिसीमा गाठली तेव्हा गाठली जेव्हा तो त्याच्या कुत्रायालाही खाऊ घालू शकत नव्हता, त्यावेळेस दारूच्या दुकानाजवळ तो कुणाही अनोळखी व्यक्तीला कुत्रा विकायला तयार झाला होता. शेवटी त्याने तो कुत्रा १७०० रुपयांना विकला आणि रडत रडत तो तिथून निघून गेला.

२ आठवड्यानंतर जेव्हा सिल्वेस्टर स्टेलोन मुहोम्मद अली विरुद्ध चक वेपनर ह्यांचा बॉक्सिंग चा सामना बघितला होता, त्यानंतर त्याला रॉकी ह्या इतिहासातील प्रसिद्ध सिनेमाची कथा लिहायचे प्रोस्ताहन भेटले. त्याने २० तासातच सिनेमाची स्क्रिप्ट लिहून काढले. त्यानंतर जेव्हा सिल्वेस्टर स्टेलोन जेव्हा स्क्रिप्ट विकायला गेला होता तेव्हा त्याला १,२५,००० डॉलर (८५ लाख रुपये) इतकी ऑफरहि भेटत होती. पण त्याची एक अट होती कि त्याला त्या सिनेमामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करायचे होते.

पण प्रत्येक स्टुडीओ त्याला नाकारत होता कारण त्यांना मुख्य अभिनेता म्हणजेच त्या वेळचा प्रसिद्ध कलाकार घ्यायचा होता. ते त्याला म्हणत असत कि “तू दिसतोही जोकर सारखा आणि बोलतोही जोकर सारखा.” मग तो तिकडून आपली स्क्रिप्ट घेवून निघून यायचा. काही आठवड्यानंतर स्टुडीओ ने परत १,७०,००,००० रुपयांची ऑफर दिली सिल्वेस्टर ने तो ऑफरहि नाकारली. त्यानंतर त्यांनी २,३८,००,००० ची ऑफर दिली आणि तीही नाकारली गेली. त्याला त्या सिनेमामध्ये मुख्य अभिनेता म्हणूनच काम पाहिजेच होता.

sylvester stallone
sylvester stallone

शेवटी त्या स्टुडीओ ने स्क्रिप्ट साठी २४ लाख दिले आणि सिल्वेस्टर स्टेलोन ला मुख्य नायकाची भूमिकाहि दिली. बाकीचा इतिहास हा तुम्हाला माहितच आहे. तुम्हाला काय वाटते कि त्याने हे २४ लाख भेटल्यावर काय विकत घेतले असेल? जो कुत्रा त्याने विकला होता तो. हो, स्टेलोन आपल्या कुत्र्यावर खूप प्रेम करत होता. स्टेलोन ३ दिवस त्या दारूच्या दुकानाच्या बाहेर ज्या माणसाला कुत्रा विकला होता त्याला शोधत थांबला होता.

शेवटी तिसर्या दिवशी तो मनुष्य त्याच्या कुत्र्यासोबत येताना त्याला दिसला. त्याने त्या मनुष्याला तो कुत्रा का विकला हे कारणही समजून सांगितले आणि आपला कुत्रा परत मागितला, त्या मनुष्याने स्पष्ट नकार दिला. स्टेलोन ने त्याला ७००० रुपये देवू केले तेही त्या मनुष्याने नाकारले. ३४ हजार देवू केले तेही नाकारण्यात आले, ६८ हजार देवू केले तेही नाकारण्यात आले.

तुमचा विश्वास नाही बसणार पण शेवटी स्टेलोनने त्याला चक्क १० लाख २० हजार रुपये देवू केले त्याच कुत्र्यासाठी जो त्याने संकटात असताना फक्त १७०० ला विकला होता आणि स्टेलोनने आपला कुत्रा परत मिळवला.

तोच स्टेलोन जो रस्त्यावर झोपायला मजबूर झाला होता, ज्याने आपला कुत्रा फक्त त्याला खायला घालू शकत नाही म्हणून विकला होता तो आजच्या घडीला ह्या पृथ्वीतलावर इतिहासातील सर्वकृष्ट अभिनेता आणि एक श्रीमंत व्यक्ती म्हणून वावरत आहे.बिकट परिस्थिती खूप वाईट असते. खरच खूप वाईट असते. कधी तुम्हाला स्वप्न पडले होते का? अद्भुत स्वप्न? पण तुम्ही इतक्या बिकट परिस्थितीत असतात कि त्यावर तुम्ही अमलबजावणी करू शकत नाही? ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला खूप शुद्र समजत आहात? स्वतःला कमी लेखत आहात?

आयुष्य खूप कठीण आहे. संधी अशी काय तुमच्या बाजूने निघून जाते कि तुम्ही कोणीच नाही आहात. लोकांना तुम्ही उत्पादनासारखे पाहिजे आहात, ना कि तुम्ही. जग खूप निष्ठुर आहे. जर तुम्ही प्रसिद्ध, श्रीमंत किंवा तुमची ओळख नसेल तर तुम्ही बिकट परिस्थितीत आहात.तुमच्या तोंडावर दरवाजे बंद केले जातील. लोक तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळवतील, आणि तुमच्या आशा ह्या पायदळी तुडवतील. तुम्हाला कसे तरी धक्का देत देत पुढे जात जायचे आहे आणि तरीही काही नाही घडणार.आणि मग तुमच्या आशा ह्या मावळल्या जातील. तुम्ही कोलमडून गेला असाल. पूर्णपणे कोलमडून गेला असाल. तुम्हाला जगण्यासाठी मिळेल ते काम करावे लागेल. तुम्हाला कदाचित पोटभर तर सोडाच पण एकवेळचे अन्न देखील मिळणार नाही. आणि हो कदाचित तुम्हाला रस्त्यावर झोपावेही लागेल.

तुमच्या स्वप्नांना कधीच म्हणजे कधीच संपू देवू नका. काहीही घडत गेले तरी स्वप्न बघने सोडू नका. तुमची आशा संपली असेल तरीही स्वप्न बघत रहा.

त्यांनी पाठ फिरवली तरीही स्वप्न बघत रहा.

त्यांनी दरवाजा बंद केला तरीही स्वप्न बघत राहा.

sylvester stallone
sylvester stallone

तुम्ही सोडून कुणालाच माहिती नाही कि तुमची क्षमता काय आहे ते. तुम्ही काय आहात आणि कोण आहात हे सामान्य लोक तुमच्या कपड्यांवरून म्हणजेच बाहेरील पेहरावावरून ओळखतील. पण कृपया करून आपली लढाई थांबवू नका, इतिहासात आपली जागा बनवण्यासाठी लढाई करा. आपल्या प्रतिष्ठेसाठी लढाई करा. कधी म्हणजे कधीच हार माणू नका.

भले तुमच्या अंगावर एकही कपडा नसू देत, भले मग तुम्ही रस्त्यावरील कुत्र्यांसोबत झोपत असाल, हे ठीक आहे, पण जो पर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही संपला नाही आहात, माझ्यावर विश्वास ठेवा.

सतत लढाई करत रहा. सतत तुमची स्वप्न आणि आशा ह्या जिवंत ठेवा. श्रेष्ठतेकडे वाटचाल सुरु ठेवा. प्रतिष्ठेकडे वाटचाल सुरु ठेवा.

अश्या आयुष्यात चमत्कार घडवणाऱ्या मराठी व्यक्तीमत्वानसोबत माझा दररोज चा संपर्क येत असतो.

सिल्वेस्टर स्टेलोन करू शकतो तर तुम्हीही करू शकता.
मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता.
जगामध्ये इतर कोणी करू शकते तर तुम्हीही करू शकता.

लेखक – सनी शेख.

 

मराठा क्रांती मोर्चातील तडफदार तरुणी पुजा मोरे

पुजा मोरे

मराठा क्रांती मोर्चात भाषण केलेल्या बीडच्या या तरुणीबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

*बीड*-
पुजा नाव तिचं.तलवाड्याजवळच असलेल्या मीरगावची रहीवाशी ती. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढले त्या वर्षी तिचा जन्म झाला. अशोक सखाराम मोरे असे तिच्या वडीलांचे नाव. दात घासयलाही घरची माती नाही एवढी हालाखीची परिस्थिती. त्यामुळे तिच्या जन्माच्याही आधी वडील कामाधंद्यानिमित्त औरंगाबादला रहायला गेले. तिथं मिळेल ते काम केलं. पुढे त्यांचे बंधू राजाराम मोरे हेही त्यांच्याकडे गेले.या दोघांनी तिथं खूप कष्ट उपसली. एखाद्या हिन्दी पिक्चरचीच जणू त्यांची स्टोरी. त्या कष्टातून त्यांनी गावाकडं 30 एकर जमीन खरेदी केली. लोकांची अडली-नडली कामं केली. त्यांच्या या कामाची दखल म्हणून औरंगाबाच्या लोकांनी मोरे कुटुंबांना ऐवढं प्रेम दिलं की, महानगर पालिकेच्या विद्यमान महापौरांनाही(2015) मग राजाराम मोरे यांच्या पत्नी ज्योती यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर चितपट केलं. आता मोरे कुटुंबिय गारखेडा परिसराचे नगरसेवक म्हणून ओळखले जातात. अशी त्यांच्या घराण्याची राजकीय ओळख. स्वकर्तृत्वाची. मोरे कुटुंबातली पुजा सर्वांची लाडकी. लाडकी म्हणून खूप काही लाडावून ठेवली अशातला भाग नाही. पुजाचं शिक्षण औरंगाबादच्याच सभु विद्यालयात झालं.

मराठा
मराठा

12 वी नंतर तिनं सिव्हिल इंजिनिअरिंग ही फिल्ड निवडली. औरंगाबादच्याच पीईएस कॉलेजात तिचं शेवटचं वर्ष सुरुयं. बालवाडीत घातल्यापासून ती स्टेजवर भाषणाला उभी राहते. त्यामुळे सहाजिकच वर्क्तृत्वावर तिची भारी पकड. आपल्याकडच्या अनेक आमदारांना दहावीत जेवढे एकूण गूण होते तितकी तिला बक्षीसं मिळालीत. राजकारण, समाजकारण कशावरही सांगा ती फाड्फाड् बोलते. चळवळीत सक्रीय असणं हा तिचा पिंड. एकदा तर ‘तंबाखू मुक्त महाराष्ट्र’ या कॅम्पेनसाठी ती औरंगाबादच्या संत तुकाराम नाट्यगृहात भाषणासाठी उभी राहीली. तिनं असं काही भाषण केलं की सभागृहात टाळ्याच टाळ्या. तिचं भाषण ऐकून कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्याने पुजाच्या घरचा संपूर्ण पत्ताच काढला. पत्ता काढणारं दुसरं-तिसरं कोणी नाही तर खुद्द महाराष्ट्रात ताई म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सुप्रीयाताई होत्या. पुजाच्या काकी जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या त्यावेळी सहाजिकच मीरगावच्या लोकांनी त्यांच्या सत्काराचं आयोजन केलं. त्यावेळी पुजा त्यांच्याच सोबत होती. माजी मंत्री बदामराव पंडितांच्या उपस्थितीत हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. इथे पुजाला भाषण करण्याची संधी मिळाली. वर्क्तृत्वाची दैवी देणगी लाभलेली पुजा भाषणामुळं अख्ख्या गावाच्या कौतुकाचा विषय झाली. त्यावेळी कुणीतरी तिला म्हटलं निवडणूक लढविती का? तिच्या वडीलांनी क्षणाचाही विलंब न करता हो म्हणून सांगितलं. गावच्या सरपंच भाऊसाहेब माखले यांनी लागलीच बदामराव पंडित मित्र मंडळाची संभाव्य उमेदवार म्हणून परिचय द्यायला सुरुवात केली. जेव्हा उमेदवाराच्या परिचय बैठकीचा कार्यक्रम झाला त्याहीवेळी पुजा असं फाडफाड बोलली की, ती बोलत असताना एकाचाही मोबाईल वाजला नाही. म्हणजे इतकी शांतता होती. (अलिकडे टाचणी पडेल एवढी शांतता म्हणायचं झालं तरी मोबाईचा आवाज वगळूनच बोलावं लागतं.) तिथंच बदामराव पंडितांनी पुजाची उमेदवारी फायनल केली. अंतरवली गणातून तीने ‘धनुष्य बाण’ या निशाणीवर निवडणूक लढविली. त्यात ती निवडूनही आली. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची पंचायत समीती सदस्य म्हणून तिचं नाव पुढे आलंय.

मराठा
मराठा

*आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चासाठी महाराष्ट्रातून कोट्यावधी मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या मराठा बांधवांसमोर बोलण्यासाठी आयोजकांच्यावतीने पाच मुली संबोधीत करणार आहेत. त्यात पुजा हीची निवड करण्यात आलीये. कालापासूनच ती विविध वाहीन्यांवर मराठा समाजाची महत्वाची बाजू मांडत आहे. महत्वाचं म्हणजे मोर्चा कव्हर करण्यासाठी देश-विदेशातील संपूर्ण मीडिया मुंबईत दाखल झालेला आहे. मुळात इंग्लिशवर प्रभूत्व असल्याने पुजाने मराठा समाजाची बाजू देश-विदेशातील बांधवांपर्यंत पोहोचवलीयं.*

*तिची संपूर्ण माहिती यासाठी की आज क्रांती दिन. या क्रांती दिना दिवशी मराठ्यांनी मुंबई काबीज केली. मुंबई काबीज करण्यासाठी लीड करण्याची संधी बीडच्या भगिनीला मिळाली.

सोनाली कुलकर्णी: एक गुणवंत आणि सुंदर अभिनेत्री

सोनाली कुलकर्णी हि मराठी चित्रपट सृष्टी मधील एक गुणवंत आणि सुंदर अभिनेत्री आहे. जाणुन घेउया तीच्या बद्द्ल काही खास गोष्टी फक्त योगिराज फिल्म क्रिएशन्स वर.

सोनाली मनोहर कुलकर्णी:

(जन्मतारीख : १८ मे, १९८८) ही अभिनेत्री असून ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करते. कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर, सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कार चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला.

Sonalee kulkarni
Sonalee kulkarni

ती मुळची पुण्याची आहे. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ ह्या लावणीनृत्यासाठी साठी ओळखली जाते. [१] ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने क्षणभर विश्रांतीअजिंठा(चित्रपट) आणि झपाटलेला २ अशा चित्रपटांमध्ये काम केले. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता. या चित्रपटासाठी तिला झी गौरव पुरस्कार च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले. तिने ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी, ममता हिची भूमिका केली. तसेच अजय देवगण याच्या सिंघम २ ह्या चित्रपटात देखील सोनाली ने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. 

आयुष्य आणि कारकीर्द संपादन :

सुरुवातीची काही वर्षे (१९८८-२००६)संपादन करा

मनोहर आणि सविंदर कुलकर्णी या दांपत्याच्या पोटी, १८ मे १९८८ रोजी, खडकी , पुणे येथील लष्करी छावणीमध्ये सोनालीचा जन्म झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले आहे. तिच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD (सेन्ट्रल आॅर्डनन्स डेपो)) येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पु्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. [४]पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

Sonalee

तिला अतुल हा लहान भाऊ असून तोही चित्रपटक्षेत्रात कार्यरत आहे.