सुशांतसिंह प्रकरण: सीबीआय येताच ईडी ‘बॅकफूटवर’

Sushant Singh

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने ईडी मनी लॉन्डरिंग’प्रकरणी होत असलेली संबंधितांची चौकशी थांबवली आहे.सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने शुक्रवारपासून तपास सुरू केला. शनिवारी व रविवारी सुशांतच्या घराच्या सखोल तपासणीसह त्याच्या सहकाऱ्यांची कसून चौकशी केली. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांचेही जबाब नोंदविण्यात आले. परंतु अद्याप मुख्य संशयित असलेल्या रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलेला नाही.

सुशांतसिंह
सुशांतसिंह

रिया व तिचा भाऊ शौविक यांना समन्स पाठविणार असल्याची चर्चा दोनबदिवसांपासून आहे. त्यातच ईडीने सीबीआय येण्याआधी रिया व तिच्या कुटुंबीयांची २०-२० तास चौकशी केली. परंतु सीबीआय येताच ईडीने संबंधितांची चौकशी थांबवली आहे. यामुळेच संभ्रम निर्माण झाला आहे. सीबीआयकडून रिया व तिचे वडील इंद्रजित यांना कुठल्याही क्षणी समन्स पाठवला जाईल, असे सांगितले जात आहे. सीबीआयच्या विशेष पथकाने अंधेरीतील वॉटरस्टोन रीसॉर्टलाही भेट दिली. मृत्यूपूर्वी दोन महिने सुशांत या रीसॉर्टमध्ये थांबला होता. तेथे त्याने आध्यात्मिक धडे घेतले होते, असे सांगितले जाते. या रीसॉर्टमधील कर्मचाऱ्यांची पथकाने चौकशी केली. शवविच्छेदनावर वेळेची नोंद नाही सुशांतसिंह राजपूतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन त्याच्या घरापासून दूर असलेल्या कूपर रुग्णालयात झाले होते. त्यामध्ये सुशांतचा गुदमरून मृत्यू झाल्याचे नमूद आहे. परंतु या शवविच्छेदनावर मृत्यूच्या वेळेची नोंद नाही. तसेच शवविच्छेदनाआधी कोरोना चाचणीही करण्यात आली नाही. याबाबत सीबीआयच्या पथकाने डॉक्टरांची चौकशी केली आहे.

आटपाडी नाईट्स Movie Review

पुन्हा पुन्हा अनुभवावी अशी आटपाडी नाईट्स लैंगिक शिक्षण, त्या संदर्भातून येणारे अनेक विषय, गैरसमजुती त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या या संदर्भात आजही समाजामध्ये मोकळेपणाने बोलले जात नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने पुढारलेल्या एकविसाव्या शतकातही शहरी भागातही यासंदर्भात उघडपणे मत व्यक्त केली जात नाही. तर ग्रामीण भागात तर याबद्दल बोलणे म्हणजे पाप समजले जाते. परंतु हीच गोष्ट दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी अतिशय सहज आणि सहजसुंदरपणे आटपाडी नाईट चित्रपटातून मांडले आहे. मराठी चित्रपटात अभावानेच दिसणारा असा नवीन प्रयोग अनुभवण्यासाठी आटपाडी नाईट्स पुन्हा पुन्हा पहावा असा चित्रपट आहे.

आटपाडी गावात वसंतराव खाटमोडे उर्फ वशा हा आपल्या मित्रांबरोबर गावात राहणारा सर्वसाधारण मुलगा. त्यालाही इतरांप्रमाणे प्रेमात पडावे आपलेही लग्न व्हावे अशी इच्छा परंतु एकूणच आपली दुर्बल शरीर यष्टी आणि भिडस्त स्वभावामुळे स्वतःहून यासंदर्भात पाऊल टाकणे त्याला जमत नाही आठ मुलींना पाहून लग्नासाठी आठही मुलींचे नकार त्यांनी पचवले आहेत. अखेर नवव्या प्रयत्नांमध्ये त्याची गाठ जुळते. परंतु दुर्बल शरीर असल्यामुळे लग्नानंतरच्या गोष्टी वशाला जमतील का असाच गावात बोभाटा उठतो आणि त्यामुळे या गोष्टी आपल्याला जमल्याच पाहिजे या हट्टाने पेटून उठलेला वशा नंतर लग्नानंतरच्या गोष्टी करण्यासाठी काय करतो आणि त्याचा त्याच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यावर कसा परिणाम होतो हे या चित्रपटांमध्ये अतिशय तरलपणे मांडण्यात आले आहे. अभिनेता प्रणव रावणाने आणि अभिनेत्री सायली संजीव यांनी अतिशय समजूतदारपणे काम केले आहे. गावातला ठसकेबाज पणा त्यांनी आपल्या पात्रातून उमटविला आहे त्यामध्ये सर्वात कमाल केली आहे ती दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी. गावातील रूढी-परंपरा अतिशय साधेपणाने लोकांसमोर मांडून त्यांनी हा नाजूक विषय प्रभावीपणे मांडला आहे यामध्ये कोणत्याही अश्लील संवाद किंवा दृश्यांची भरणा केलेला नाही तरीही हा विषय प्रेक्षकांच्या काळजाला जाऊन भिडतो. त्याचबरोबर चटपटीत संवाद आणि खुसखुशीत पात्र यामुळे चित्रपट मनोरंजक होतो. लैंगिक शिक्षण हा विषय वाटतो तितका चित्रपटाच्या माध्यमातून मांडणे सोपे नाही लेखक-दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी त्याला मनोरंजनाचा तडका देत प्रभावीपणे प्रभावीपणे विषय मांडण्यात यश मिळवले यश मिळवले आहे कलादिग्दर्शक संदिप इनामके यांनी गावातील चित्रण अतिशय साधेपणाने आणि तितक्यात नेमकेपणाने उभे करण्यामध्ये बाजी मारली आहे. चित्रपटातील गाणी आणि विशेषतः लेखन प्रभावी झाले आहे त्यामुळे चित्रपटाचा विषय थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

चित्रपटाचा विषय नेमका मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे अनावश्यक पात्र संवाद आणि घटनांची यामध्ये घुसवली नसल्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. आवश्यक त्या ठिकाणी चित्रपटाचा शेवट आल्यामुळे जो संदेश घेऊन बाहेर पडणे दिग्दर्शकाला अपेक्षित आहे ते नेमके साधले जाते. लैंगिक शिक्षणासारखे नाजूक विषय तितक्याच प्रभावीपणे आणि मनोरंजक पद्धतीने मांडलेल्या आटपाडी नाइट्स हा चित्रपट एकदा नव्हे तर अनेकदा अनुभवण्याची गोष्ट आहे असे प्रेक्षकांना नक्कीच वाटते आणि हेच दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या टीमचे यश आहे.

योगेश बारस्कर
पत्रकार सिने समीक्षक

वशाट,फड,भैरु ची १२ व्या प्रतिबिंब नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये बाजी

Phad maharashtrian folk art

12 Th Pratibimb National Short Film Festival,Ahmednagar.
“Best Director- Yogesh Baban Gadage.”

“Best Film – Vashat-The Cannibal.”

Vashat
Vashat-The Cannibal

गेली सहा वर्ष चित्रपट सृष्टी मध्ये धडपडतोय,या स्पर्धेच्या युगात स्वत:ला अपडेट हि करतोय जस जमेल तस आणि जे येइल ते काम प्रामाणिक पणे करायच. हा एक फंडा माझ्या टिम चा आहे.
आम्ही नक्कीच कुठे काहि शिकलेलो नाही पण अनुभवाने आणि संघर्षाने आम्हाला खुप काही शिकवल आहे.अनुभव,चुक आणि झालेल्या चुका सुधरवणे हाच खरा आमचा गुरु आहे.
याच फळ हि आम्हाला मिळाल.१२ व्या प्रतिबिंब नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हल मध्ये “वशाट” या दिग्दर्शन केलेल्या फिल्म ला “बेस्ट फिल्म” आणि “बेस्ट डायरेक्टर” हे पुरस्कार मिळाले.

Phad maharashtrian folk art
Phad maharashtrian folk art

खर सांगायच तर तेच तेच विषय पुन्हा रंगवून आपली मराठी चित्रपट सृष्टी काळी पडली आहे. मराठी सिनेमा हा जगात गाजावा हि प्रामाणिक इच्छा पण ” वशाट ” आपल्या भारतीय मराठी सिने सृष्टीला पचेल अस वाटत नाही. अजुन किती दिवस आपण तेच तेच घासणार आहोत माहित नाहि.
प्रतिबिंब ची सर्व टिम तिथला स्टाफ फारच अप्रतिम आणि मेहनती आहेत.वशाट चे निर्माते अनुप ढेकणे आणि डॉ.संतोष पोटे यांचे हि अभिनंदन.डॉ.संतोष पोटे सारखे हौशी,उत्साही,आणि सिनेमा सृष्टी मधील अभ्यास असलेले निर्माते मराठी सृष्टीला लाभले तर खुप प्रयोगशील काम करता येइल.
परिक्षक म्हणून “६३ वा राष्ट्रीय पुरस्कार विजेते “औषध” या लघुपटाचे दिग्दर्शक अमोल देशमुख आणि “फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ” मधुन सिनेमेटोग्राफि केलेले व भारती विद्यापीठ मध्ये असिस्टंट सिनेमेटोग्राफी प्रोफेसर म्हणुन कार्यरत असणारे सचिन सोनवणे,लाभले. खऱ्या अर्थाने ” वशाट ” परिक्षकाना पचल कारण हे फक्त अभ्यासु आणि मराठी सिनेमाकडे वेगळे पणाने बघणाऱ्यानाच पचु शकत.त्यांनी आमच्या मेहनतीला न्याय मिळवुन दिला त्या बद्दल त्यांचे आभार.
वशाट व्यतिरीक्त स्पर्धे मध्ये अनेक चांगले चांगले लघुपट आणि माहितीपट पहायला मिळाले.
*माहिती पटा मध्ये धनंजय खैरनार दिग्दर्शित “फड” ला उत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला.
त्याच बरोबर,पॅंप्लेट,मांजा,मौन,ताजमहाल,
पिपाण्या,प्रॉंन्स,अलर्टबा,द- ड्रेनेज, विकल,असे लघुपट पहाण्यासारखे होते.

स्टुडंट्स कॅटेगरी मध्येमानसी देवधर दिग्दर्शित “भैरु”या लघुपटाला बेस्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला.

हे झाल महोत्सवा विषयी आता मला माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानलेच पाहिजेत. दिग्दर्शक म्हणून सिनेमाची सांगड घालताना सिनेमेटोग्राफर हा तितकाच हुशार असावा लागतो आणि श्रीनिवास गायकवाड च्या रुपात तो मला मिळालेला आहे.इतक्यात काय आम्हि माना टाकणार नाहि. मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा लख लख चंदेरी दुनिया बनवायच आमच स्वप्न आहे आणि ते आम्ही सगळे मिळुन पूर्ण करु.
वशाट मधील सर्व टेक्निकल टिम चे व कलाकारांचे मनापासुन खुप खुप आभार.

©® योगेश बबन गाडगे.

लेखक – दिग्दर्शक – अभिनेता.

वेब सिरीज चाहत्यांनो, ‘या’ 6 टीव्ही सिरीज नक्की बघाच

💁‍♂ वेब सिरीज चाहत्यांनो, ‘या’ 6 टीव्ही सिरीज नक्की बघाच.

लोकांमध्ये वेब सिरीजची लोकप्रियता कमालीची वाढते आहे. यामध्ये नेटफ्लिक्सवरील भारतीय वेब सिरीज ‘सॅक्रेड गेम्स’ चांगलीच गाजते आहे. चला तर आज अशाच काही आणखी आणि तेवढ्याच ताकदीच्या वेब सिरीज बाबत जाणून घेऊयात..

1) *Narcos*: ही सिरीज जगातील सर्वात मोठा ड्रग डीलर आणि स्मगलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या Pablo Escobar ह्या कोलंबियन गुन्हेगारावर आधारित आहे. Pablo Escobar ह्याची कहाणी अतिशय रंजक आहे.

Narcos
Narcos

2) *Godfather* : ही वेबसिरीज आज पर्यंतची सर्वात लोकप्रिय क्राईम वेब सिरीज पैकी एक आहे. ह्यामध्ये एक वृद्ध पिता आहे ज्याला त्याचा गुन्हेगारीचा धंदा आपल्या मुलाला सोपवायचा आहे.

Godfather
Godfather

3) *Breaking Bad* : या सिरीजमध्ये एक हायस्कूल केमिस्ट्री शिक्षक दाखविण्यात आला आहे. मध्यमवर्गीय माणूस जीवन जगण्यासाठी आपल्या जीवाचा किती आटापिटा करतो हे दाखविण्यात आले आहे.

Breaking Bad

4) *Fargo* : हा क्राईम ड्रामा आपल्याला 1979 सालच्या South Dakotaमध्ये घेऊन जातो जिथे एक तरुण पोलीस अधिकारी Lou Solverson जो एका स्थानिक गुन्हेगारी टोळी आणि मोठ्या सिंडीकेट जमावटोळी यांचा तपास करताना दिसतो.

Fargo
Fargo

5) *No Country for Old Men*: ही एक ऑस्कर विनिंग फिल्म आहे. जी आपल्याला अगदी खिळवून ठेवते. ही देखील एक क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे.

No country for old men
No country for old men

6) *Game Of Thrones* : जॉर्ज आर आर मार्टिन यांच्या कादंबरी रूपातील पुस्तकाच्या कथेवर या सिरीजचे कथानक बेतले आहे. युरोपातील मिथकांचा आधार घेऊन गुंफण्यात आलेल्या या कथेत काही रॉयल फॅमिलीजचे एका सर्वोच्च सिंहासनासाठीचे युद्ध दाखवण्यात आले आहे.

Game of thrones
Game of thrones

वाचा इतर माहिती :

Sacred Games वादाच्या भोवऱ्यात Netflix वरील जबरदस्त Web Series

धाप [dhaap] चित्रपटाला इटली मध्ये मानाचा तुरा.

dhaap yogiraj film creations
(Dhaap)धाप चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि खर तर वाट पाहुन कंटाळलेल्या असं म्हणायला हरकत नाही. अडचणी आता किती सांगत बसु सिनेमा येईल तेव्हां येईल फायनान्स मिळेल तेव्हां मिळेल पण आनंदाची बातमी म्हणजे आपल्या चित्रपटाच इटली येथे “San Mauro Film Festival 2018 Official selection होऊन Semi Final पर्यंत मजल मारली आहे. आता आपल्या कष्टाच्या फळा मध्ये अजून एका फळाची भर पडली आहे.
* San Mauro Film festival Official Selection& semi finalist 25 May 2018,Italy
 
Total Selections:
 
* “9 Th Nashik International Film Festival 2017 “मध्ये चार

नामांकन.

dhaap yogiraj film creations
dhaap yogiraj film creations
1.Best social issue Film “Dhaap”
2. Best Debute Director: Yogesh Baban Gadge.
3. Best Debute Actor :Yogesh Baban Gadge
4. Best supporting Actress : Seema Kulkarni
…………………………………………………………..
* 7 Th Dadasaheb Phalke International Film Festival 2017 Delhi”
1. Festival Special Mention Award “Dhaap “
…………………………………………………………..
*Official selection for calcutta international cult film festival 2017
…………………………………………………………………………………………………………..
* San Mauro Film festival Official Selection& semi finalist 25 May 2018,Italy
…………………………………………………………………………………………………………..
Artists: Yogesh Gadge, Kiran Shejal, Milind Jadhav, Seema Kulkarni, Madhav Abhyankar, Sunil Godbole Nana, Ketan Pawar, Bhagyashree Desai, Prem Narsale, Ankush Mandekar…
 
Pramod More, Deepak Talekar, Prasad Kulkarni, Shashank Patil, Madhu Kulkarni, Firoj, Arjun Lonari, Gaju Bhilare, Balkrishna Bhilare, Adinath Gadekar, Shubham Auti, Chetan Giri, Sachin Gawali, Dolas Kaka, Manoj Chaudhari, Nilesh Bagade, Nilesh Panchal, Aniket Paigude, Chandu Kurhade & all Dhap team n artists…
 
Director / Writer / Lyricist – Yogesh Gadge
Music Director – Ashish Hadawale
Sarvesh Muni.
Singers – Adarsh Shinde, Dyaneshwar Meshram, Shankar Mahadevan, Ashish Kulkarni.
Producer – Yogesh Gadge & Atul Jagtap.
Co producer : Abhijit Pawar
Banner – Yogiraj Film Creations.
DOP – Shrinivas Gaikwad
Editor – Ajmal Sabu.
Still Photographer – Vishnu Rongate & Pratik.
Make up – Karan Thatte
Related article :

Gracy Singh ने केले “बी” ग्रेड चित्रपटात काम

Aamir Khaan ची को ॲक्ट्रेस Gracy Singh ने केले “बी” ग्रेड चित्रपटात काम,ग्रेसी चा आज वाढदिवस.

  • पुणे :अभिनेत्री ग्रेसी सिंह हिचा आज (२० जुलै) वाढदिवस.२० जुलै १९८० रोजी दिल्लीत ग्रेसीचा जन्म झाला. ग्रेसीचे वडिल स्वर्ण सिंह एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत आणि आई वरजिंदर कौर शिक्षक होती. ग्रेसीने डॉक्टर वा इंजिनिअर बनावे, अशी तिच्या पालकांची इच्छा होती़ पण ग्र्रेसीला मॉडेलिंगमध्ये रस होता.
    तुम्हाला माहित नसेल पण चित्रपटांत येण्याआधी ग्रेसीने काही मालिकांमध्ये काम केले. झी टीव्हीवरील ‘अमानत’मध्ये तिने घरून पळून जाणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती.
Gracy singh
Gracy singh
Gracy singh
Gracy singh

२००१ मध्ये ग्रेसीला आमिर खानच्या अपोझिट ब्रेक मिळाला. ‘लगान’ या गाजलेल्या चित्रपटात ग्रेसी लीड रोलमध्ये दिसली. या चित्रपटाला आॅस्करच्या विदेशी भाषा श्रेणीत नॉमिनेशन मिळाले होते. ‘लगान’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना चित्रपटात एका भोळ्या-भाबळ्या मुलीचा शोध होता. ग्रेसी या भूमिकेसाठी अगदी योग्य होती.२००३ मध्ये अजय देवगणसोबत ‘गंगाजल’मध्ये तिची वर्णी लागली. पण यात तिची भूमिका फार मोठी नव्हती. याचवर्षी अनिल कपूर आणि प्रीति झिंटासेबत ‘अरमान’ या चित्रपटात ग्रेसीला संधी मिळाली.२००४ मध्ये ग्रेसी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सुपरडुपर हिट चित्रपटातही दिसली.

Gracy singh
Gracy singh

पण यानंतर ग्रेसीच्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली. यानंतर काही बी आणि सी ग्रेडच्या चित्रपटांत काम करण्याची वेळ तिच्यावर आली. पण इथेही ग्रेसी टीकली नाही. मग तिने पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. ‘जय संतोषी मां’ या मालिकेत ती टायटल रोलमध्ये दिसली.

Gracy singh
Gracy singh

टीव्हीवर काम करत असतानाचं तिने २००९ मध्ये डान्स अ‍ॅकेडमी सुरु केली. गेल्या काही वर्षांत ग्रेसी बरीच बदलली आहे. या वर्षांत अध्यात्माकडे तिचा ओढा वाढला. यानंतर ग्लॅमरपासून ती पूर्णपणे दूर गेली आणि तिने ब्रह्मकुमारी ज्वॉईन केली. माझा स्वत:साठी काहीही प्लान नाही़ घरचे लोक मला लग्नासाठी आग्रह करतात. पण मी अद्याप याबद्दल काहीही विचार केलेला नाही, असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती.

Gracy and aamir
Gray and Aamir

Sudesh Berry ला शाहरुख आधी यायच्या फिल्म च्या ऑफर.

पुणे :Sudesh Berry ला शाहरुख आधी यायच्या फिल्म च्या ऑफर.

हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकारांकडे एकाहून एक बड्या बॅनर्सचे सिनेमा असतात. या कलाकारांकडे दिग्दर्शकांची रांग लागलेली असते. तर काही कलाकारांचा संघर्ष काही संपता संपत नाही.कामासाठी स्ट्रगल करावा लागणारे अनेक कलाकार पाहायला मिळतील. कलाकारांच्या या दोन प्रकारांसह आणखी एका विशेष आणि हटके स्टाईलचेही कलाकार असतात. जे कसला मागचा पुढचा विचार न करता सिनेमा नाकारतात. तत्त्वांशी कोणत्याही प्रकारची तडजोड या कलाकारांना मान्य नसते. अशाच मोजक्या आणि निवडक कलाकारांमध्ये अभिनेता सुदेश बेरीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.सुदेश बेरीने एक दोन नाही तर तब्बल २०० सिनेमांच्या ऑफर्स धुडकावून लावल्यात.

Sudesh Berry
Sudesh Berry

हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या ‘डर’ या सिनेमातील किंग खान शाहरुखची भूमिका सुदेशला ऑफर करण्यात आली होती. मात्र ही भूमिका सुदेशने नाकारली. गर्लफ्रेंड्स आणि काम केलेले सिनेमा यांची आकडेवारी ठेवण्यात काहीच रस नाही असे सुदेशने म्हटले आहे. आपल्या समकालीन कलाकारांनी २५ ते ३० वर्षांत ३०० सिनेमा केले असतील तर किमान तेवढेच सिनेमा आपण नाकारले असतील असं सुदेशने म्हटलंय. आजोबांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कधीही पैसा, मोह आणि माया या मागे लागलो नसल्याचंही स्पष्ट केलंय. सुदेश यांनी बॉक्सर बनावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र एका अपघातानंतर सुदेशला बॉक्सिंग सोडावी लागली. सुदेशने आपला लेक सूरजवर करिअरबाबत कधीच दबाव टाकला नाही. त्याला जीवनात काय करायचंय यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचं सांगितलंय.

Sudesh Berry
Sudesh Berry

Satyamev Jayate मध्ये दिसणार John Abraham

Pune : Parmanu नंतर आता Satyamev Jayate मध्ये दिसणार John Abraham.Parmanu या चित्रपटाच्या यशा नंतर जॉन अब्राहम आता पुढील चित्रपटामध्ये झळकणार आहे.तरण आदर्श यांनी काहि दिवसा पुर्वीच जॉन च्या Satyamev Jayate चे पोस्टर ट्वीटर वर टाकले.चित्रपटात मानोज वाजपेयी हे पोलीसाच्या भुमिकेत दिसणार आहेत.

सत्यमेव जयते
Satyamev Jayate

Tum Bin 2 ची अभिनेत्री नेहा शर्मा ची बहिण ऐशा हि जॉन च्या चित्रपटात अभिनेत्री म्हणुन दिसणार आहे. जॉन च्या टिम ने चित्रपटाच टायटल “सत्यमेव जयते” असच ठेवण्याच ठरवल. या आधी सत्यमेव जयते हा आमीर खानचा छोट्या पडद्यावर गाजलेल्या रिॲलिटी शो चा कार्यक्रम आपल्या लक्षात असेलच.

Johan abraham Manoj vajpeyi
Satyamev Jayate

•सत्यमेव जयते हा एक सस्पेंस थ्रिलर चित्रपट असणार आहे. 

• सत्यमेव जयते हा चित्रपट मिलाप जावेरी यांनी दिग्दर्शित केला आहें.

•१५ ऑगस्ट २०१८ ला चित्रपट प्रदर्शित होणार.याच दिवशी अक्षय कुमारचा गोल्ड हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.दोन्ही चित्रपटांची आमने सामने चांगलीच टक्कर होणार आहे अस म्हणायला हरकत नाही.

• चित्रपटात मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिची हि भुमिका दिसणार आहे. या आधी तीने ऱाझी या करण जोहर च्या धर्मा प्रोड्कशन खाली काम केल असुन या चित्रपटाने १०० कोटी च्या वर कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशा नंतर तीला Hungama Movies च्या वेब सिरीज मध्ये हि काम केल आणि आता ती satyamev Jayate मध्ये हि दिसणार आहे.

•दिग्दर्शक: मिलाप जावेरी
•जाणारा वेळ: १४२
•निर्माता कंपन्या: Emmay Entertainmentटी-सीरीज़

Sacred Games वादाच्या भोवऱ्यात Netflix वरील जबरदस्त Web Series

Sacred Games वादाच्या भोवऱ्यात Netflix वरील जबरदस्त Web Series

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह संवादांमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधील कलाकारांना दिल्ली उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. वेबसीरिजमधील आक्षेपार्ह संवादांसाठी त्यातील कलाकारांना दोषी धरता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय.

Sacred games
Sacred Games

‘सेक्रेड गेम’ या वेब सीरिजविरोधात एका काँग्रेस नेत्यानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सीरिजमधील काही दृश्यं व संवाद आक्षेपार्ह असून त्यात राजीव गांधी यांची बदनामी करण्यात आली आहे. हा आक्षेपार्ह संवाद व दृश्यं काढून टाकावीत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीलाही या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आलं होतं.
न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती चंदर शेखर यांच्या खंडपीठापुढं सोमवारी यावर सुनावणी झाली. खंडपीठानं यावेळी या याचिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मालिकेचे सर्व भाग ऑन एअर गेले असताना आता याचिका करून उपयोग काय, असा प्रश्न खंडपीठानं केला. तसंच, ‘कलाकार हे फक्त काम करतात. त्यांना मालिकेतील संवादांसाठी कलाकारांना दोषी धरता येणार नाही,’ असं स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे.

Sacred games
Sacred games

ठाकरे सिनेमा त महत्त्वाची भुमिका साकारणार : मोहनीराज खरे

नाटक,सिनेमा अभिनेता.
ठाकरे सिनेमा : कुरूक्षेञ,धाप,कुरूप,ठाकरे.या चिञपटांमध्ये भुमिका. 2010 पासुन नाट्य आणि चिञपट क्षेत्रात कार्यरत आहे. मोहनीराज खरे मुळचा पुणे शहरांतला.लहानपणापासून अभिनयाची आवड निर्माण झाली होती परंतु अभिनय क्षेत्राशी संबंधित काही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही आणि या क्षेत्राशी संबंधित काही माहीतीही न्हवती. शालेय जीवनात नाटकाशी काही सबंध आला नाही.जीवनात कधीही नोकरी करायची नाही असा निश्चय केला होता. तरीही गरजेखातर काही ठिकाणी नोकरी केली, परंतु मनाला पटत नाही तर का करायची नोकरी म्हणून व्यवसाय सुरू केला त्यात यश मिळत होते पण समाधान झाले नाही एका पठडीतील जीवन आपण नाही जगू शकत असे सतत वाटत होतं. अभिनय सतत खुणावत होता पण पुन्हा नवीन करिअरला सुरूवात करणे अवघड होते, लग्न झाले होते, एक मुलगी होती निर्णय घेणे अतिशय कठीण होते पण करायचे तर अभिनय क्षेत्रात काम करायचे असे आतला आवाज सांगत होता.

ठाकरे सिनेमा
ठाकरे सिनेमा

अभिनयाची आवड असुन काही होणार नाही अभिनयातील तांत्रिक बाबी हस्तगत करणे आवश्यक होते, भाषेचे योग्य ज्ञान प्राप्त करणे, भाषेचा लहेजा सुधारणे ,देहबोली अश्या अनेक बाबींवर काम करायचे होते.मग सुरू झाला एक अभिनेता होण्याचा प्रवास.वाचनाची आवड खूप होती,वाचन अजून वाढवले.नाटकांत काम कारणे अतिशय आवश्यक होते, नाटकांत काम मिळविण्यासाठी मग पुण्यात होणारी नाट्य शिबिरात भाग घेवू लागलो. जेवढे ज्ञान प्राप्त करता येईल तेवढ करू लागलो, खुप मेहनत घेतली, बरे वाईट अनुभव घेतले.

ठाकरे सिनेमा
ठाकरे सिनेमा

 

ठाकरे सिनेमा
ठाकरे सिनेमा

या सगळ्या प्रवासात परिपूर्ण होण्यासाठी पाच वर्षे गेली या पाच वर्षात उत्पन्न नाही मिळालं पण अनेक नाटकांत भूमिका करायला संधी मिळाली. एका चिञपटांमध्ये एका सिरीअल मध्ये छोटी भुमिका मिळाली. या सगळ्या प्रवासात पत्नीने खुप साथ दिली सतत प्रोत्साहन दिले.आजही सघंष॔ सुरूच आहे, अभिनेत्याचा संघर्ष कधीही संपत नाही असे मला वाटते.

ठाकरे सिनेमा
ठाकरे सिनेमा

आठ वर्षे संघर्ष केल्यावर आता ठाकरे चिञपटांमध्ये नवाजउद्दीन सिद्दिकी, अमृता राव, प्रविण तरडे या दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम करीत आहे.
The struggle is forever…!!

ठाकरे सिनेमा
ठाकरे सिनेमा