घरीच बनवा : पार्ले_जी बिस्किट केक

पार्ले_जी बिस्किट केक

साहित्य :

• दोन १० रुपये चे पार्ले बिस्किट पुडे
• दोन चमचे तूप
• एक इनो पॅकेट ७ रुं.
• दुध आवश्यकतेनुसार

 

biscuit cake
biscuit cake

• कृती :
•प्रथम बिस्किट मिक्सरमधून बारीक करून घ्या.
•मग एका भांड्यात काढून दूध टाकून एकाच दिशेने फेटून घ्या.
•मग इनो पूर्ण पॅकेट टाकून परत फेटून घ्या.
•एका भांड्याला तूप लावून घेऊन मिश्रण टाकले.
•कुकरची शिट्टी काढून पाच मिनिटं मोठा गॅस व वीस मिनिटं मिडीयम
गॅस वर केक बेक करा .
•थंड झाल्यावर भांडे एका ताटात पालथे करून केक काढून घ्या.
•पार्ले जी बिस्किट चा हा चविष्ट केक आता खाण्यासाठी तयार आहे.

biscuit cake
biscuit cake

टिप : हा पदार्थ एकदा बनवुन त्याची चव तुम्हांला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हीं हि छान सुगरण असाल तर आम्हांला ९६६५३७३७३९ या नंबर वर वरील प्रमाणे कृती पाठवा. व तुमचा फोटो पाठवा. आम्ही आमच्या वेबसाईट वर तुमचा लेख नक्की प्रदर्शित करु.

Menu : Pinal Dukare

मक्या पासुन घरीच बनवा हा चट पटित मेनु.

मक्या पासुन घरीच बनवा हा चट पटित मेनु.

साहित्य :
एक मक्याच कणीस
एक टोमॅटो
जीर
एक चमचा मीठ
अर्धा चमचा चाट मसाला
अर्धा चमचा लाल तिखट
२ चमचे तेल
एक लिंबु
कोथिंबिर

masala corn
masala corn

 

 

 

 

 

 

 

 

कृती : 

बाजारातुन एक स्वीट कॉर्न घ्या.
•ते व्यवस्थित सोलुन त्याचे दाणे एका भांड्यात काढुन घ्या
• गॅस वर कढई गरम करायला ठेवा.
• तापलेल्या कढई मध्ये दोन चमचे तेल टाका.
• टोमॅटो बारीक चिरुन घ्या.
• तापलेल्या तेलात थोड जीर टाका
• आता चिरलेला टोमॅटो तेलात परतुन घ्या.
• अर्धा चमचा लाल तिखट टाका
• अर्धा चमचा चाट मसाला टाका
• सगळ मिश्रण मंद आचेवर परतुन घ्या.
• आता स्वीट कॉर्न टाका
• व्यवस्थित मिश्रण हालवुन घ्या
• कढई वर थोडा वेळ झाकण ठेवा
• आता चवी नुसार मीठ घाला.
• नंतर झाकण काढुन चमचा ने एकदा
कढई मधील मिश्रण हलवुन घ्या.
• आता शिजलेल्या स्वीट कॉर्न वर एक
लिंबु पिळुन व्यवस्थित हलवुन घ्या.
• थोडीशी कोथिंबीर बारीक कापुन त्यावरटाका
• आता तुमचा पदार्थ खाण्यासाठी तयार आहे.

masala corn
masala corn

 

 

 

 

 

 

टिप : हा पदार्थ एकदा बनवुन त्याची चव तुम्हांला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हीं हि छान सुगरण असाल तर आम्हांला ९६६५३७३७३९ या नंबर वर वरील प्रमाणे कृती पाठवा. व तुमचा फोटो पाठवा. आम्ही आमच्या वेबसाईट वर तुमचा लेख नक्की प्रदर्शित करु.

©® Yogiraj Film Creations.