व्हाटस अप वर गृप व्हिडीओ कॉल कसा करायचा

मित्रांनो, व्हॉटसअँपवर आता ग्रुप व्हिडीओ कॉल करता येणार आहे. बऱ्याच दिवसापासून या फिचरची चर्चा सुरु होती. यासंदर्भात काही फेक मेसेजसुद्धा फिरत होते. पण आता शेवटी अधिकृतरीत्या व्हॉट्सॲपने या फिचरची घोषणा केली आहे. अॅन्ड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही मोबाईल्समध्ये हे फिचर असणार आहे.

पण बऱ्याच जणांना माहित नाहि हे फिचर वापरायच कस.चला जणुन घेउयात या फिचर बद्दल.

१. सर्वात आधी व्हॉट्सॲपचं नवीन व्हर्जन अपडेट करून घ्या!! अॅन्ड्रॉइडवाल्यांनी प्ले स्टोरमध्ये जा आणि iOS वाल्यांनी iOS अॅप स्टोरमध्ये जा.

Whats app video call
Whatsapp video call

२. ग्रुप व्हिडीओ कॉल करणं अगदी सोप्पं आहे. आपण जसं नेहमी व्हिडीओ कॉल करतो तसाच हा कॉल करायचा असतो. फक्त फरक एवढाच की नवीन अपडेटप्रमाणे  आणखी एक नवीन ऑप्शन दिला जातो.

३. व्हिडीओ कॉल केल्यावर उजव्या बाजूला ‘add participant’ हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाल. या लिस्टमधून ज्याला कॉल करायचा आहे त्याची निवड करा. निवड झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर २ व्यक्ती दिसू लागतील. अशाचप्रकारे आणखी एका व्यक्तीला व्हिडीओ कॉलमध्ये समाविष्ट करून घेता येईल.

४. जास्तीतजास्त ३ लोकांसोबत व्हिडीओ कॉल करता येईल. म्हणजे एका स्क्रीनवर ४ जण दिसू शकतात.

५. तुमचे सर्व ग्रुप व्हिडीओ कॉल्स end-to-end encrypted असतील. त्यामुळे तुमचे Video Call सुरक्षित राहणार आहेत.

६. याच प्रकारे तुम्ही व्हॉट्सॲपच्या iOS व्हर्जनवर Video Call करू शकता.

तर मंडळी, भरमसाठ मेसेजेसच्या युगात Video चॅटने बराच डेटा आणि टायपिंग करण्याची मेहनत वाचणार आहे. याबद्दल व्हॉट्सॲपचे आभार मानले पाहिजेत. चला तर, पटापट हे फिचर ट्राय करून बघा !!

वाचा इतर माहिती :

वेब सिरीज चाहत्यांनो, ‘या’ 6 टीव्ही सिरीज नक्की बघाच

मराठा क्रांती मोर्चातील तडफदार तरुणी पुजा मोरे

पुजा मोरे

मराठा क्रांती मोर्चात भाषण केलेल्या बीडच्या या तरुणीबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

*बीड*-
पुजा नाव तिचं.तलवाड्याजवळच असलेल्या मीरगावची रहीवाशी ती. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढले त्या वर्षी तिचा जन्म झाला. अशोक सखाराम मोरे असे तिच्या वडीलांचे नाव. दात घासयलाही घरची माती नाही एवढी हालाखीची परिस्थिती. त्यामुळे तिच्या जन्माच्याही आधी वडील कामाधंद्यानिमित्त औरंगाबादला रहायला गेले. तिथं मिळेल ते काम केलं. पुढे त्यांचे बंधू राजाराम मोरे हेही त्यांच्याकडे गेले.या दोघांनी तिथं खूप कष्ट उपसली. एखाद्या हिन्दी पिक्चरचीच जणू त्यांची स्टोरी. त्या कष्टातून त्यांनी गावाकडं 30 एकर जमीन खरेदी केली. लोकांची अडली-नडली कामं केली. त्यांच्या या कामाची दखल म्हणून औरंगाबाच्या लोकांनी मोरे कुटुंबांना ऐवढं प्रेम दिलं की, महानगर पालिकेच्या विद्यमान महापौरांनाही(2015) मग राजाराम मोरे यांच्या पत्नी ज्योती यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर चितपट केलं. आता मोरे कुटुंबिय गारखेडा परिसराचे नगरसेवक म्हणून ओळखले जातात. अशी त्यांच्या घराण्याची राजकीय ओळख. स्वकर्तृत्वाची. मोरे कुटुंबातली पुजा सर्वांची लाडकी. लाडकी म्हणून खूप काही लाडावून ठेवली अशातला भाग नाही. पुजाचं शिक्षण औरंगाबादच्याच सभु विद्यालयात झालं.

मराठा
मराठा

12 वी नंतर तिनं सिव्हिल इंजिनिअरिंग ही फिल्ड निवडली. औरंगाबादच्याच पीईएस कॉलेजात तिचं शेवटचं वर्ष सुरुयं. बालवाडीत घातल्यापासून ती स्टेजवर भाषणाला उभी राहते. त्यामुळे सहाजिकच वर्क्तृत्वावर तिची भारी पकड. आपल्याकडच्या अनेक आमदारांना दहावीत जेवढे एकूण गूण होते तितकी तिला बक्षीसं मिळालीत. राजकारण, समाजकारण कशावरही सांगा ती फाड्फाड् बोलते. चळवळीत सक्रीय असणं हा तिचा पिंड. एकदा तर ‘तंबाखू मुक्त महाराष्ट्र’ या कॅम्पेनसाठी ती औरंगाबादच्या संत तुकाराम नाट्यगृहात भाषणासाठी उभी राहीली. तिनं असं काही भाषण केलं की सभागृहात टाळ्याच टाळ्या. तिचं भाषण ऐकून कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्याने पुजाच्या घरचा संपूर्ण पत्ताच काढला. पत्ता काढणारं दुसरं-तिसरं कोणी नाही तर खुद्द महाराष्ट्रात ताई म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सुप्रीयाताई होत्या. पुजाच्या काकी जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या त्यावेळी सहाजिकच मीरगावच्या लोकांनी त्यांच्या सत्काराचं आयोजन केलं. त्यावेळी पुजा त्यांच्याच सोबत होती. माजी मंत्री बदामराव पंडितांच्या उपस्थितीत हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. इथे पुजाला भाषण करण्याची संधी मिळाली. वर्क्तृत्वाची दैवी देणगी लाभलेली पुजा भाषणामुळं अख्ख्या गावाच्या कौतुकाचा विषय झाली. त्यावेळी कुणीतरी तिला म्हटलं निवडणूक लढविती का? तिच्या वडीलांनी क्षणाचाही विलंब न करता हो म्हणून सांगितलं. गावच्या सरपंच भाऊसाहेब माखले यांनी लागलीच बदामराव पंडित मित्र मंडळाची संभाव्य उमेदवार म्हणून परिचय द्यायला सुरुवात केली. जेव्हा उमेदवाराच्या परिचय बैठकीचा कार्यक्रम झाला त्याहीवेळी पुजा असं फाडफाड बोलली की, ती बोलत असताना एकाचाही मोबाईल वाजला नाही. म्हणजे इतकी शांतता होती. (अलिकडे टाचणी पडेल एवढी शांतता म्हणायचं झालं तरी मोबाईचा आवाज वगळूनच बोलावं लागतं.) तिथंच बदामराव पंडितांनी पुजाची उमेदवारी फायनल केली. अंतरवली गणातून तीने ‘धनुष्य बाण’ या निशाणीवर निवडणूक लढविली. त्यात ती निवडूनही आली. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची पंचायत समीती सदस्य म्हणून तिचं नाव पुढे आलंय.

मराठा
मराठा

*आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चासाठी महाराष्ट्रातून कोट्यावधी मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या मराठा बांधवांसमोर बोलण्यासाठी आयोजकांच्यावतीने पाच मुली संबोधीत करणार आहेत. त्यात पुजा हीची निवड करण्यात आलीये. कालापासूनच ती विविध वाहीन्यांवर मराठा समाजाची महत्वाची बाजू मांडत आहे. महत्वाचं म्हणजे मोर्चा कव्हर करण्यासाठी देश-विदेशातील संपूर्ण मीडिया मुंबईत दाखल झालेला आहे. मुळात इंग्लिशवर प्रभूत्व असल्याने पुजाने मराठा समाजाची बाजू देश-विदेशातील बांधवांपर्यंत पोहोचवलीयं.*

*तिची संपूर्ण माहिती यासाठी की आज क्रांती दिन. या क्रांती दिना दिवशी मराठ्यांनी मुंबई काबीज केली. मुंबई काबीज करण्यासाठी लीड करण्याची संधी बीडच्या भगिनीला मिळाली.

जाणुन घ्या रासायनिक शेती व त्याचे दुष्परीणाम !

chemical farming

रासायनिक शेती व त्याचे दुष्परीणाम

chemical farming
chemical farming

1) जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) या त्रिसूत्रीचा शोध लावला.
2) सन 1905 मध्ये फ्रिट्‌झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील नायट्रोजनपासून अमोनिया वायू तयार केला.
2) 1915 मध्ये कार्ल बॉश या शास्त्रज्ञाने कृत्रिम अमोनिया तयार केला. त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात कैसरच्या लढाईमध्ये सुमारे आठ लाख लोकांचा बळी घेतला. युद्ध संपल्यावर मग पिकाची वाढ करण्यासाठी तो शेतकऱ्यांना पुरवायला सुरवात झाली. नंतर पुन्हा आय. जी. फ्राबेन या कंपनीने दुसऱ्या महायुद्धात लोकांना मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अमोनियाची निर्मिती केली.
3) महायुद्धाच्या शेवटी या वायूची निर्मिती करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांचा हा अमोनिया, तसेच युद्धभूमीवर डास, माश्‍या, चिलटे मारण्यासाठी तयार केलेली डी.डी.टी. शेतीकडेच वळविण्यात आली. रासायनिक खतांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या पिकांवर नवनवीन किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला. या किडींच्या नियंत्रणासाठी क्‍लोरडेन, डेल्ड्रीन, एन्ड्रीन, पॅराथिऑन, मॅलेथिऑन यांसारख्या कीडनाशकांची निर्मिती झाली.
खते, कीडनाशके, बियाणे, अवजारे, तणनाशके ही आधुनिक शेतीची तंत्रे होती. ही तंत्रे शेतकऱ्याने स्वीकारण्यासाठी अधिक उत्पादनाचे आमिष दाखविण्यात आले. सुरवातीला या तंत्राचे परिणामही तसेच होते. त्यामुळे शेतकरी ते स्वीकारू लागले. त्यासाठी शेतकरी बॅंका व या तंत्रांचे उत्पादक यांच्याकडून कर्जही स्वीकारू लागले.

अनुदान,कर्जामध्ये गुंतली रासायनिक शेती –
आधुनिक तंत्रे, अनुदान, कर्ज यांनी अमेरिकन शेतकरी, सरकार यांच्यावर जणू ताबा मिळविला. त्यानंतर कंपन्यांची दृष्टी अधिक फायद्यासाठी तिसऱ्या जगाकडे वळली. जागतिक बॅंक व अमेरिकी सरकारने ही तंत्रे स्वीकारण्यासाठी भारतावर दडपण आणले. त्यासाठी प्रचंड पैसा पुरविण्यात आला. त्याच सुमारास भारतात दुष्काळाने थैमान घातल्याने भारत सरकारने जनतेचे पोट भरण्यासाठी या सर्वांचा स्वीकार केला.
1) अनुदान, कर्ज या आकर्षक वेष्टनांतून आलेल्या कीडनाशकांचा भारतातील वापर झपाट्याने वाढू लागला. 1966 पासून 1978 पर्यंतच्या अवघ्या 12 वर्षांत रासायनिक खतांचा वापर एक दशलक्ष टनांपासून 50 दशलक्ष टनांपर्यंत वाढला.
2) हेक्‍टरी खतांचे प्रमाण 3.5 किलोपासून 50 किलोपर्यंत वाढले. नंतर 1950 पासून 2001-02 मध्ये हे प्रमाण 170 पटींनी वाढले.
3) रासायनिक शेती मध्ये कीडनाशकांच्या वापराचे प्रमाण 1971 ते 1994-95 पर्यंत 100 टक्‍क्‍यांनी वाढले. या वाढत्या खर्चाबरोबर दुर्दैवाने शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये तेवढी वाढ झाली नाही. अतिप्रमाणात वापरलेली रासायनिक खते, कीडनाशकांनी नापीक झालेली जमी न आणि शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा ही मुख्य कारणे यामागे आहेत.
4) 1977 मध्ये कर्नाटकमधील मालनाड येथे घडलेली घटना “हंडी सिंड्रोम’ या नावाने प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात भातासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशके वापरली जात. पिकावर फवारलेली कीडनाशके पाण्याबरोबर खालच्या शेतांमध्ये जात होती. या शेतांमधील खेकडे खाल्ल्याने सुमारे 200 मजुरांना पॅरालिसीस दिसून आला. खेकड्यांच्या शरीरात भातासाठी वापरलेल्या कीडनाशकांचे अंश सापडले. असे खेकडे या मजुरांनी खाल्ल्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम झाला होता.
5) जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे रासायनिक शेती मुळे माणसाच्या शरीरात जास्तीत जास्त 1.25 पीपीएम एवढ्या प्रमाणात डी.डी.टी.चे अंश सापडले, तर फारसा त्रास होत नाही. पण दिल्लीमध्ये केलेल्या चाचणीत या शहरातील नागरिकांच्या चरबीमध्ये सुमारे 20 पीपीएम एवढे डी.डी.टी.चे अंश सापडल्याचा अहवाल “डाऊन टू अर्थ’ या मासिकात प्रसिद्ध झाला.
6) पंजाबमध्ये हरितक्रांतीचा उच्चांक साधला गेला. आज पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातून गंगानगर येथील कर्करोगावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कर्करोगाने आजारी रुग्ण रोज एक रेल्वेगाडी भरून जातात. दुर्दैवी गाडीचे नावच लोकांनी “कॅन्सर एक्‍स्प्रेस’ असे ठेवले आहे.हे आहेत रासायनिक शेतीचे दुष्परीणाम.
तर माझ्या शेतकरी बांधवानो आज आपणां सर्वाना गरज आहे ती फक्त नैसर्गिक शेती ची व नैसर्गिक खतांचीच….

नक्की वाचा –

आता स्वप्न कृषी प्रधान भारताचे : पिकांचे हमीभाव वाढले.