स्वप्नांच्या पलीकडे एक काटेरी वाट : कॉलेज डेज

हे सगळ काही कॉलेज लाईफ मध्ये होत.आता कॉलेज संपल कुणी एम.एस.सी तर कुणी एम.बी.ए करत.मी मात्र माझ्या ध्येयपुर्ती साठी अजून धडपडतोय.लहान असताना कुणीही आपल्याला विचारत बाळा तुला मोठ झाल्यावर काय व्हायचंय ? माझ उत्तर ठरलेलं असायचं मला मोठा अभिनेता व्हायचयं.

0
754
College days
College days
Loading...

!! स्वप्नांच्या पलीकडे _एक काटेरी वाट ..!!

कॉलेज के वो दिन याद आते है
कमीने दोस्तो कि याद,
अकेले में बोहोत रुलाती हे,
काश आ जाते वो दिन वापस,
साला दोस्तो से जादा,
उस बेवफा कि याद बोह्त सताती है !”
“कॉलेज…!” असं एकदा बोललं तरी डोळ्या समोरून भर भर पुस्तकाची पान उलटावी तसे ते सोनेरी क्षण उलटायला सुरुवात होते.कट्ट्यावर मित्रांसोबत चहा घेण,लेक्चर ला लास्ट बेंच वर बसणं,आणि जिच्यावर जीवापाड प्रेम करूनहि जी भाव देत नाही तिच्याकडे सोंबडित पाहणं हे सगळ काही नवीन नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असे चढ उतार येतच राहतात.मग अशा एकतर्फी प्रेमासाठी एकच गाणं सुचतं “पत्थर के सनम मैने तुझको मोह्ब्ब्त का खुदा माना”.

College days
College days

हे सगळ काही कॉलेज लाईफ मध्ये होत.आता कॉलेज संपल कुणी एम.एस.सी तर कुणी एम.बी.ए करत.मी मात्र माझ्या ध्येयपुर्ती साठी अजून धडपडतोय.लहान असताना कुणीही आपल्याला विचारत बाळा तुला मोठ झाल्यावर काय व्हायचंय ? माझ उत्तर ठरलेलं असायचं मला मोठा अभिनेता व्हायचयं.असं उत्तर ऐकल्यावर साहजिकच आहे कि समोरचा हसून निघून जाणार किंवा आपल्याला वेडा ठरवणार.अशा वेळी खूप वाईट वाटायचं.गावी बारावी झाल्यावर बी.एस.सी करण्यासाठी मी पुण्यात आलो.पुण्यात माझ कुणीच नव्हत.हळू हळू मित्र झाले.आणि आमच नात सख्या भावांसारख घट्ट झाल.पुण्यात आलो तेव्हा रहायची सोय नवती,भाड द्यायला पैसे हि नव्हते तेजस,अमर,कुलदीप आणि मी आमची मैत्री इतकी घट्ट झाली होती कि कॉलेज मध्ये आम्हाला सगळेच ओळखायचे.पुण्यात आलो तेव्हा तेजस सोबत त्याच्या रूम वर मी एक वर्ष फुकटच राहिलो.आणि तोच माझ्या साठी मोठा आधार होता.बी.एस.सी.झाल्यावर मी मुंबईला गेलो कारण अभिनयासाठी तिकडेच जाव लागत असं मी ऐकल होत,तिथ गेल्यावर समजल इथे पावलो पावली आपल्याला फसवणारी आणि लुबाडणारी माणस खूप आहेत,मी दीड महिन्यातच परत आलो.जॉब सुरु केला,त्याच बरोबर लघुपट तयार करण्यास सुरुवात केली,आणि नाटकांमध्ये हि काम चालूच असत,पण Struggle मात्र संपल नाही,

“Struggle करून करून डोळ्यात पाणी येत,
मग कुणीतरी अलगत मैत्रीचा हाथ पुढे करत,
अपेक्षा दुसरी काहीच नसते,
फक्त शेवटपर्यंत आधाराची गरज असते.”

College days
College days

कधी कधी एक वेळ खायचीही भ्रांत पडते.अशा कठीण परिस्थितीतही मला साथ आहे ती माझ्या आईची ती गावीच असते,पण तिच फक्त एकच वाक्य मला या परिस्थीशि झुंज देण्यास ताकद देतो.“तूला जे आवडत तेच कर “आयुष्यात यशाच शिखर गाठायचं असेल तर पैशाच्या भांडवला पेक्षा आपल्या माणसांनी दिलेलं शब्दांच भांडवल खूप मोठ असत”.कविता,चारोळ्या,अभिनय आणि चित्रपट कथा लिहीण हा माझा छंद.कुणी एका बिस्नेसमन ला मी भेटलो मी तयार केलेला लघुपट त्याला दाखवला आणि मी एक कॉलेज लाईफ वर लिहिलेली स्क्रिप्ट त्याला ऐकवली.त्याला माझा अभिनय आणि कथा हि आवडली सगळ तयार झाल.पण त्याच नशीब खराब म्हणव कि माझ हेच समजेना त्याला त्याच्या बिसनेस मध्ये कोटींचा लॉस झाला.आणि हाती आलेल काम अजून लांबणीवर गेल. बर या आशेवर मी जॉब हि सोडला.सगळीच पंचायत झाली.तरी हि मी हरणारा नाही हे क्षेत्रच असं आहे,ज्यांना कुणाला या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्याने हि तयारी ठेवावीच याच काय कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी वारंवार अपयश पचवण्याची शक्ती ठेवा एक दिवस यश नक्कीच मिळेल.जाता जाता सगळ्या वाचकांसाठी एक छानशी चारोळी,

“डोळ्यांसमोरून जरी तू आज दूर असलीस ,
तरी हृदयात तुझी जागा अजून तशीच आहे ,
स्वप्नात जरी फक्त तू असलीस तरी आता ,
स्वप्नांच्या पलीकडे एक काटेरी वाट आहे “

College days
College days

©® योगेश बबन गाडगे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here