धाप,शेतकऱ्याच्या मुलाच्या चित्रपटाला दिल्ली मध्ये पुरस्कार.

धाप : शेतकऱ्याच्या मुलाच्या चित्रपटाला दिल्ली मध्ये पुरस्कार…..!!

धाप : जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही,अर्थात इथे प्रत्येकाला कष्ट करावेच लागतात.आणि प्रामाणिक कष्ट केले तर त्याच फळ हि नक्कीच मिळत,याचच उदाहरण म्हणजे जुन्नर तालुक्यातील,निमगाव सावा येथील शेतकरी कुटुंबात वाढलेला कु.योगेश बबन गाडगे हा तरुण.लहान पणा पासूनच एक मोठा अभिनेता व्हायचं असा ठरवलेल्या योगेश ने त्याच स्वप्न फक्त पाहिलच नाही तर ते सत्यात हि उतरवल. मॉडर्ण कॉलेज,पुणे.येथे त्याने आपलं बी.एस.सी.रसायन शास्त्र घेऊन पूर्ण केल.नंतर त्याने अनेक प्रयत्न केले,स्क्रीन टेस्ट दिल्या,मुंबईला गेला पण सगळीकडे केवळ फसवणूक झाल्याने तो पुन्हा पुण्यात आला.पण त्याने हार न मानता एका कंपनीत नोकरी शोधली आणि नोकरी करता करता चित्रपटाची कथा लिहिली.

धाप
धाप
धाप
धाप

आपण स्वत:च चित्रपट करावा अस त्याला वाटू लागल.पण घरची परिस्थिती गरिबीची असल्याने चित्रपटाला लागणारा खर्च तो करू शकत नव्हता.अनेक लोकाना भेटल्यावर मा.चंद्रकांत मोरे या एका मोठ्या उद्योजकांनी त्याला काही आर्थिक मदत केली,पण ती अपुरी पडल्याने चित्रपट अर्ध्यावर थांबला,पुन्हा धावपळ आणि शेकडो लोकांना भेटण योगेश च चालू होत,नोकरी हि चालू होती,शेवटी नशिबाला कांटाळलेला योगेश ऑफिस च्या कॅन्टीन मध्ये निराश होऊन बसला होता,अचानक कुणी ओफिस मधला व्यक्ती त्याच्या जवळ आला आणि त्यानी योगेश च्या शोर्टफिल्म्स पहिल्याच सांगितल आणि ते हि योगेश च्या कंपनी मध्ये नोकरी करत होते त्याच बरोबर त्यांचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय हि होता,तुला काही मदत लागली तर सांग अस म्हटल्यावर योगेश ने त्यांच्या समोर चित्रपटाचा प्रस्ताव मांडला,आणि ते तयार झाले मा.अतुल जगताप याचे सहकार्य मोलाचे ठरते .चित्रपट पूर्ण झाला पण आता विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला पैसे नव्हते नातेवाइकानकडून पैसे जमा करून चित्रपट स्पर्धेत सहभागी झाला,आणि चित्रपटाला ‘७ वा दादा साहेब फाळके” पुरस्कार मिळाला,त्याच बरोबर चित्रपटाची “Nashik International film festival 2017 ” Calcutta international cult film festival 2017″ मध्ये हि निवड झाली आहे.दिल्ली ला जायला हि पैसे नसलेल्या योगेश ला त्याच्या शाळेतल्या मित्रांनी पैसे जमा करून दिले,योगेश ने आपण त्या सर्व मनाने श्रीमंत असलेल्या मित्रांचे ऋणी आहोत असहि म्हटलं,केवळ त्यांच्याच सहकार्यामुळे आपण हा सुखद सोहळा अनुभवु शकलो असहि तो म्हणाल

One Reply to “धाप,शेतकऱ्याच्या मुलाच्या चित्रपटाला दिल्ली मध्ये पुरस्कार.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *