एकटेपणा हा शाप की पाप प्रशाली घरत

एकटेपणा आज प्रेक्षकांनी अफाट गर्दी केली होती नाटकहॉल मध्ये. नाटक पाहणारे प्रेक्षक वेळेअगोदरच हॉलमध्ये पोहचलेले.. नाटकाचा पडदा केव्हा एकदा वर जातो ही आतुरता प्रेक्षकांच्या नजरेत जाणवत होती..प्रत्येकजण आपल्याला जागा मिळेल तिथे बसत होत.. नाटकाचं नाव होतं

एकटेपणा हा शाप की पाप

त्यातील कलाकार राकेश हा कलाकारांचं असा होता की, बॉडीगार्ड ते शिवरायांचीभूमिके पर्यंत तो कोणतीही भुमिका रंगमंच्यावर अफळातुन पणे सादर करणारा कलाकार होता।। आणि आजच्या नाटकाचा कलाकार राकेश असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी त्यांच्या नावावरुनच झाली होती.

आज राकेश नाटकाच्या मुडमध्ये नव्हताच.त्याला आज खुपच एकटेपणा जाणवत होता..पण नाही बोलुन चालणार ही नव्हतं..प्रेक्षकांच मन दुखावान त्याला कधी जमलंच नाही.. आणि नाटक आताच सुरू झालं होतं तो नाटकाच्या शेवटी फक्त एक गाणं बोलणार होता..बाकीचे पात्र करणारे कलाकार रंगमच्यावर आपली पात्र सादर करत होते..राकेशला आज तितकं काही नाटकात काम नसल्यामुळे तो जरा साध्या पोषकात होता..तिकडे नाटक सुरु ही झालं होतं. राकेश आज खुपच आठवणींच्या गर्दीत हरवला होता.. कारण आज त्यांची एकुलती एक लेक भुमी नाताळच्या सुट्टीला घरी आली होती ती होस्टेलवर परत जाणार होती..त्याचं पुर्ण लक्ष घराकडेच लागलं होतं. राकेश आरश्यात स्वतःला पाहत आरश्याला म्हणाला।।
आज आरसा पुन्हा माझ्याशी खोटा वागतो मनात असह्य वेदना असुनही चेहऱ्यावर आनंद दाखवतो.

नक्की आरसा खोटा की, माझं मन खोटं ह्या विचाराने तो खुर्चीत बसतो..आणि त्यांच्या डोळ्यात भुतकाळ दिसु लागतो.
तो भुतकाळात हरवतो. तोही दिवस त्याला आठवतो ज्या दिवशी त्याच्या आणि सेविकाच्या झालेल्या प्रेमाच्या आणाभाका आज सप्तपदीत जोडल्या गेल्या..त्यांचा प्रेम आज जिंकलं ह्यांचा आनंदच राकेशला खुप झाला होता..दोघेही राजाराणीसारखं संसार करु लागले..आणि त्यांच्या संसाररूपी वेलीवर एक गोंडस कन्यारत्न आलं..त्या परीच नाव भुमी..भुमी खेळायला, बागडायला लागली. घराच गोकुळ झालं..आणि एक दिवस अचानक बाबा ह्या जगातुन निघुन गेले..नियतीच्या नियमानुसार जो जन्माला आलाय तो जाणारच.. असं समजुन दुःख पचवत सगळे पुन्हा सावरण्याचा मार्गावर लागले.

आणि एक दिवस…नियतीचा फेरा उलटा पडला की,काय नि सेविकाच्या छातीत दुखून आलं.राकेश तिला घेऊन हॉस्पिटला गेला. तिच्या चेकअप नंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली..
कारण तिच्या रिपोर्ट मध्ये तिच्या काळजाला होल होता..हे ऐकून राकेशच्या डोळ्यासमोर अंधेरी आली..पुन्हा पुन्हा तो डॉक्टरांना विचारत होता. माझ्या सेविका काही झालेलं नाही.. ती बरी आहे..डॉक्टर त्याला सावरत म्हणाले आता तुला तिच्यासाठी का होईना सावरायला हवं राकेश.. जे सत्य आहे ते तुला स्वीकारायलाच हवं.. राकेशला आता त्यांची ही पावलं जड वाटु लागली..तो जड अंतकरनाने सेविकाजवळ गेला. तिला पाहुन खोटं हसु ओठावर आणत म्हणाला सेविका my darling तु oke आहेस..घरी चल भुमी आपली वाट पाहत असेल..माझ्या परिराणीला आज खुप खाऊ घेऊन जायचं..माझं पिल्लु ही तुझ्यासारखच लबाड झालाय..अस सांगत राकेशने सेविकाच्या हात पकडत तिला उठवलं.

सेविका आजपासून राकेशला ओळखत नव्हती.. त्याचे डोळेच तिला सांगुन गेले की, तरी माझ्याबाबतीत घडलंय.. पण तिला राकेशला विचारून त्याला त्रास आणखी त्रास दयायचा नव्हता..ती समजुन ही न समजल्यासारखी करत राकेशला बोलली चल लवकर आपलं पिल्लु वाट पाहत असेल..ते दोघेही गाडीवरुन घरी जायला निघाले.. राकेश तिला समजावत होता सेविका तु एकदम oke आहेस ग।। पण तुला रोज झोपताना गोळ्या घ्याव्या लागतील। सेविका त्याला सांगते ,का राकेश अस???

एकटेपणा
एकटेपणा

तु तर सांगतो मी ठीक आहे ना।।राकेश तिला गाडीच्या आरश्यातुन बघत सांगतो.. अरे सेविका तु बरीच आहेस माझ्या राणी,, पण परत माझ्या सेविकाच्या छातीतीत दुखायला नको म्हणुन ग गोळ्या घेत जा.. सेविका सगळं समजुन होती.. ती बोललीहो का राकेश।। इतकं प्रेम करतो तु माझ्यावर.. ये वेडा हा प्रश्न झाला का ग सेविका तु माझी होण्यासाठी मी किती काय केलं ग..आणि आज तुला हा प्रश्न पडावा.. अरे राकेश सहज विचारलं.पण राकेश मी कधी गोळी विसरली खायची तर..।।राकेश मधेच बोलतो ये वेडाबाई मी कसं विसरू देईन तुला.. मी रोज माझ्या हाताने देईन तुला गोळी.असं बोलता बोलता ते कधी घराजवळ आले समजलं ही नाही..भुमी धावतच गाडीजवळ आली दोघेही तिच्या हाताला पकडून आत घेऊन गेले..राकेश रोज सेविकाला न विसरता गोळी दयायचा.

सेविका रोज सांगायची बस कर राकेश मला काही होत नाही..।।का रोज रोज गोळी देतो.. राकेश तिचा हात हातात घेऊन सांगायचं ही गोळी तुला काही झालं म्हणुन नाही तर काही होऊच नाही म्हणुन देतो ग।। सेविका आता समजुन गेलीच होती की, तिला काहीतरी झालंय।। तिने एक दिवस राकेश नसताना रिपोर्ट शोधुन काढले।। ते रिपोर्ट बघुन ती हादरली कारण तिच्या हृदयाला होल होता.. आता तिचे जास्त दिवस राहिले नव्हते. जे दिवस काढले तेही गोळ्याच्या जीवावरच होत्या.. संध्याकाळी राकेश घरी आला आज ती मस्त जेवण बनुन बसली होती..राकेशला पाणी देत ती म्हणाली राकेश उद्या माझं काही झालं तर तु दुसरं लग्न करशील का???? राकेश पाण्याचा ग्लास ठेवत म्हणाला “सेविका”।।।। गप्प बस।। काहीही बोलते..अरे सहज विचारलं।। तुला समजत का तु काय विचारते?? तुझ्याशिवाय राहणं हे शक्य तरी आहे का?? असं म्हणत तिला जवळ घेत तो म्हणाला तुला कधीच काही होणार नाही.. सेविका त्यांच्या आणखी जवळ जात म्हणाली राकेश मला माहित झालंय माझ्या हृदयाला होल आहे.. मी रिपोर्ट बघितलेत.. राकेश गांगुरुन गेला की, हे रिपोर्ट हिला सापडले कसे??

एकटेपणा
एकटेपणा

तरी तो स्वतःला सावरत म्हणाला अग वेडे तो होल होता पण आता तु oke झालेस।। राकेश तुझ्या डोळ्यात मी रोज पाहते तु माझ्याशी खोटं बोलतो.आता राकेश समजुन चुकला हिला सगळं खरं माहीत झालंय.तिला जवळ घेत तो म्हणाला सेविका तुला काहीही होणार नाही.आणि त्याच विचारात ते रात्री न जेवताच झोपी गेले.दिवसा मागुन दिवस गेले सेविकाच शरीर आता गोळ्यांना स्वीकारत नव्हतं.इतकी ती थकली.आणि एक दिवस सेविकाने ह्या जगाचा निरोप घेतला.भुमीसारख्या पिल्लाला सोडुन ती आता निघुन गेली होती.राकेशला तर जगणं नको वाटायचं पण आई आणि भुमीसाठी तो खोटं अवसान आणुन जगायचा.आणि एक दिवस नियती पुन्हा त्याच्याच घराजवळ आली नि उलट्या पावलांनी चालत गेली की काय, नि त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आला.आता राकेशला आकाशपातळ एक झालं. सगळं संपलं होतं.भुमिकडे बघत तो सावरू पहात होतो.पण आज तो पुरता पुरता हरला होता.नशिबापुढे रडावं की,हसावं ह्या विचारात तो पडला.

एकटा एकटा भुमीला काय सांभाळणार म्हणुन राकेशने भुमीला होस्टेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला त्यात भुमीला बोलता ही येत नव्हतं.आईबाबा होऊ पाहणारा राकेश भुमीच्या बाबा हा शब्द ऐकण्यास तरसत होता.भुमीच्या थेरपी खर्च आणि तीच बाकी आयुष्य सुखात राहावं म्हणून राकेशने स्वतःच्या सुखांचा परिपुर्ण त्याग केला होता.तिच्यासाठी तिला जॉब आणि नाटक करणचं होत.

भुमीला होस्टेलवर जड अंतकरणाने ठेऊन तो आपल्या नाटकाच्या कामात व्यस्त राहत होतो..
भुमी नाताळच्या सुट्टीला घरी आली होती ती उद्या जाणार म्हणुन त्याच लक्ष रंगमंचाकडे नव्हतं.. तो फक्त भुमी जाणार ह्या विचारातच होता तोच रंगमंच्यावरून राकेशला कोणी तरी आवाज दिला।। राकेश स्वतःला सावरत पुन्हा आरश्यात बघत रंगमच्यावर गेला.. तोच एकच आवाज दुमदुमला

राकेश। राकेश। राकेश।।
राकेश ने माईक हातात घेतला।।
तो आज स्टेजवर गोंधळला होता.
तो गाणं विसरला की, काय असं सगळ्याना वाटत होतं..
पण आलेला आवंढा गिळत राकेश बोलला..
एकटेपणा शाप की पाप

देवा तु असा कसा रे
माझेच नशीब लिहिण्यास गेलास।।
कलमात शाई भरण्यास विसरलास।।।

हजारोंच्या गर्दीतला माणुस मी आहे एकटा रे।।
रंगमांच्यावरची कला संपली की, लोक एकमेका सांगतात..
वाजवा टाळ्या रे।।

ह्या टाक्यांच्या कडकडाटात
माझ्या हृदयाचा आक्रोश नाही
ऐकायला येत का रे।।
हजारोंच्या गर्दीत असूनही
देवा मी एकटा रे।।

देवा।। देवा।। देवा।।
तुच सांग हा
एकटेपणा शाप की पाप
कधी संपेल हा वनवास..

समजुन तर मी ही आहे
चित्तेवरचं ह्याचा शेवट..
तरीही आज
मी हजारोंच्या गर्दीत असुनही
जगतो एकटं…
देवा सांग ना
एकटेपणा शाप की,पाप

नाटकाचा पडदा पडला।। टाळ्यांच्या कडकडात राकेश भानावर येत। डोळे पुसतच त्यांनी घरची वाट धरली…

ही सत्य घटना आहे।।
ह्यातील पात्र ही सत्य घटनेतील नावानेच मांडलेत।।।
🖋 प्रशाली घरत🖋

Other Articles : 

सौंदर्या मागे वासनेचा डाव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *