Gele Te Divas Rahilya Fakta Aathavani

लहान पण तस मामाच्या गावातच गेल,कौलारू घर चुल्हिच्या बाजुला सरपणाची मोळी,एक स्टोव्ह तो हि शाळेत किंवा आईला शेतात कामावर जायला उशीर झाला तरच पेटवला जायचा गॅस चा तर दुर दुर पर्यंत संबध नसायचा कारण आमच्याकडे ऱेशनिंग कार्ड नव्हतच.संक्रात आली कि मरी आई वाला यायचा..! आठवड्यातल्या सात दिवसांपैकी वैदु वाडीतील गंगु आजी सकाळी सकाळी शिळी भाकरी मागायला यायची तेव्हा मी खाकि चड्डी आणि सफेद शर्ट घालून शाळेत निघालेलो असायचो. आणि कानावर आवाज पडायचा पप्या ची आई वाढ गं…!!
शिळी भाकरी असेल तर ती त्या आजीला द्यायची आणि त्या बद्ल्याद बिबवा,सुई,किंवा कान कोरण ( लाचकिंड ) घ्यायच.
या बालपणातल्या दिवसांमध्ये ऐतवार ( रविवार ) स्पेशिअल असायचा. या दिवशी एक आजोबा साधारण वय ५६ – ५७ त्यावेळी सकाळी यायचे तेव्हा नेमकी आईला आम्ही बहिण भाउ कळशीने पाणी भरायला मदत करत असायचो.घरांच्या कौलातुन बाहेर पांढरा धुर पडताना दिसायचा,चुल्हिवरची गरम कडक भाकरी,बटाट्याची लाल तिखट टाकुन तव्यावर केलेली भाजी याची चव निराळी च असायची. ते बाबा आले कि देवा समोर जायचे आणि डमरु वाजवुन खंडेरायाची आरती करायचे. १२ वी नंतर मी पुण्यात आलो आणि या सगळ्या धका धकिच्या आयुष्यात ते सार काहि मागे सोडल.
या सगळ्या गोष्टी मला नेहमी आठवायच्या.

काल नारायण गाव मध्ये च प्रमोशन होत रात्री मामाच्या घरी विसावा घेतला सकाळी उठुन खोडद रोडने मी घरी निमगांव ला निघालो. जाता जाता नजर अचानक एका आजोबांवर पडली चेहरा ओळखिचा वाटला पुढे गेलेली गाडी मी पुन्हा मागे वळवली आणि बाबांना विचारल,बाबा ओळखलत का..? मी पांडूरंग बाबा चा नातु,तुम्ही आमच्या घरी यायचे आरती करायचे. उत्तर होकारात होत. तुझे आजोबा आणि मी चांगले मित्र होतो. मी सांगितल ते आता आपल्यात नाहित. थोडस मन पुन्हा नाराज झाल. मी १०० ची नोट काढून बाबांना दिली. एक फोटो काढला. हेल्मेट घातल आणि काहिशा जुण्या आठवणी मध्ये माझ्या गाडीवर टांग मारुन घरी पोचलो.
लेखक : ©® योगेश बबन गाडगे.
( प्रवासातल्या गोष्टी )
(शेवटी चार खांद्यावरच जाणारा एक माणुस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *