जालीम झाल्या राती प्रिये : मराठी कविता

0
804
Loading...

जालीम झाल्या राती प्रिये,
हल्ली झोप कुठे लागते आहे,
डोळ्यांवर चित्र तुझे
ओठांवर नाव खेळते आहे ….!!१!!

जालीम झाल्या राती प्रिये,
हल्ली झोप कुठे लागते आहे,
काजवा होऊनी डोळ्यांचा
रातराणी तू फुलण्याची,मी वाट पाहतो आहे….!!२!!

जालीम झाल्या राती प्रिये,
हल्ली झोप कुठे लागते आहे,
बघ वळून भूतकाळाकडे जरा
सुटलेला हाथ अजूनही मोकळाच फिरतो आहे….!!३!!

जालीम झाल्या राती प्रिये,
हल्ली झोप कुठे लागते आहे,
एकटाच राहील म्हणतो
पण जीव अजूनही तुझ्या साठी झुरतो आहे….!!४!!

– ©® योगेश बबन गाडगे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here