Marathi kavita
आयुष्य तिच्या शिवाय पूर्ण नाही💐
जन्मदाता आईला अमूल्य वाटते
तिच्या बाळाचे पाहिले हसू
किती अस्मरणीय क्षण
असतो तो नाही का…???
त्याच्या त्या खेळण्या बागडण्यात
जणू ती तीच बालपणच जगत असते
आणि त्याच्या पडण्याने इजा तिला होत असते
वेगळीच माया असते आईची नाही का…???
त्याचे ते बोबडे बोल किती गमतीदार असतात
आणि ही भाषा त्याची फक्त आईला कळते
अडचणीच्या वेळी तीच त्याला सावरते
किती प्रेमळ असते आई नाही का…???

त्याच ते धावत येऊन तिला बिलंघण
तिच्या हाती बोट ठेऊन फेरफटका मारणं
किती आगळा वेगळा अनुभव
असतो तो नाही का…???
पण आता या सगळ्या गोष्टींच
विस्मरण झालय त्याला
तिला मिळणार थोडसं सु:ख
पण पाहवत नाही त्याला,

त्याच्या समोर तो आणि
आहे त्याच आयुष्य
तो तिला दुःखी ठेऊन फक्त
स्वतःच सु:ख पाही
त्याला कोण समजवणार
आयुष्य तिच्या शिवाय पूर्ण नाही…
आयुष्य तिच्या शिवाय पूर्ण नाही…
✍देवेंद्र आंबेकर
(7350545939)
आमच्या इतर कविताही वाचा: