marathi poem paus

marathi poem paus latest marathi poem

आला आला पाऊस आला

पाऊस आला मला भेटण्याला

आला आला पाऊस आला

मला भेटण्याला….

मेघ गरजले धाय मोकळून

आभाळातल्या दगडी लोटून

हिरवे डोंगर आले अंगणी

सुसाट वारा फिरे रिंगणी

दाही दिशांना लोटून आला

मला भेटण्याला….||१||.

आला आला पाऊस आला मला भेटण्याला

Marathi poem paus
Marathi poem paus

हे तुम्हाला आवडेल : स्वप्नाच्या पलीकडे एक काटेरी वाट

          आठमाहीची प्रतीक्षा संपली

          आज देहाने कस्तुरी सांडली

          इथे तिथे मी चिर फाटलेली

          स्पर्शाने तुझ्या आज सांधली

          सुवास माझा घेऊन आला

          मला भेटण्याला…..||२|| आला आला…पाऊस आला मला भेटण्याला

हि कविता तुम्हाला आवडेल : बघ ना 

येण्याने तप्त श्र्वास उडवले

तृप्तीने अमृत आत जिरवले

कुजबुज बीजांची पडली कानी

आनंदाने सारे गाती गाणी

हिरवे जन्म देण्या आला

मला भेटण्याला…….||३||आला आला…पाऊस आला मला भेटण्याला

दर्द भरी कविता : मोहब्बत का जनाजा

या विश्वाला ओढ तयाची

तुझ्या न् माझ्या मिलनाची

तुझ्या विना ही सृष्टी अपुरी

अर्धांगिनी मी तुझी अधूरी

सर्वाआनंद जुळवून आला

मला भेटण्याला…..||४||

आला आला पाऊस आला

मला भेटण्याला…….

दुसरी कविता  : नावाची शेती 

नावाची शेती

भुमी फाडीतं फोडीतं

चाले नांगर वाडीतं

दाणा जन्मघ्याया पुन्हा

गाडी मातीच्या ओटीतं

 

कूस उजवी उजवी

हळू उसवून माती

दिसे हिरवेगार मनं

हसे डुलणारी पाती

 

रोपे टोचिता टोचिता

हाती चिखल मातीत

खत घाली भावनांचे

येई पालवी जोमात

 

पीकं निंदता कापता

ताठ लक्ष्मीच्या ठायी

उभ्या जगाचा पोशिंदा

लवे दहावेळा पायी

 

जरी हरी घरभरी

बारमाही गाळी घाम

तरी मिळे पोटापुरी

उरे काहीनाही दाम

 

असे शेती त्याचे नाम

असे शेती त्याचे नाम

कवी : भालचंद्र पाटील 

जर तुमच्याकडे स्वता: लिहिलेल्या कविता असतील तर आम्हाला नक्की पाठवा आपण त्या आपल्या वेबसाईट वर आणि युटूब वर ऑडीओ  स्वरूपात त्याचबरोबर लेखी स्वरूपात प्रदर्शित करू.कविता या स्वरचित असाव्यात पुढील नंबर वर आपण कविता पाठवू शकता त्याच बरोबर आपला युटूब च्यानेल सब्स्क्राइब करा सर्व कविता ऐकण्यासाठी  ९६६५३७३७३९

नवीन मराठी वेब सिरीज साठी आम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छे प्रमाणे पैसे पाठवून आम्हाला मदत करू शकता.वेबसाईट वरील सर्व कविता,चित्रपट ,मनोरंजन,देश विदेशातील घडामोडी जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा आणि मिळवा सगळ्यात आधी नोटिफिकेशन.

you will like to read,because our containt is unique,however people are trying to read best containt,but they dont findon web portal,because its not possible to get it on website.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *