Sacred Games वादाच्या भोवऱ्यात Netflix वरील जबरदस्त Web Series
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह संवादांमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधील कलाकारांना दिल्ली उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. वेबसीरिजमधील आक्षेपार्ह संवादांसाठी त्यातील कलाकारांना दोषी धरता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय.

‘सेक्रेड गेम’ या वेब सीरिजविरोधात एका काँग्रेस नेत्यानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सीरिजमधील काही दृश्यं व संवाद आक्षेपार्ह असून त्यात राजीव गांधी यांची बदनामी करण्यात आली आहे. हा आक्षेपार्ह संवाद व दृश्यं काढून टाकावीत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीलाही या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आलं होतं.
न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती चंदर शेखर यांच्या खंडपीठापुढं सोमवारी यावर सुनावणी झाली. खंडपीठानं यावेळी या याचिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मालिकेचे सर्व भाग ऑन एअर गेले असताना आता याचिका करून उपयोग काय, असा प्रश्न खंडपीठानं केला. तसंच, ‘कलाकार हे फक्त काम करतात. त्यांना मालिकेतील संवादांसाठी कलाकारांना दोषी धरता येणार नाही,’ असं स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे.

[…] […]