सौंदर्यामागे वासनेचा डाव

✒सौंदर्यामागे वासनेचा डाव

आज सकाळपासुन ती खुप खुष दिसत होती. चेहऱ्यावरचा आनंद लपविण्याचा तिचा प्रयत्न चालू होता.पण मैत्रिणीच्या नजरेने ते बरोबर हेरलं होत. आणि न राहूनच सई बोलली आज कुणीतरी खुप खुष दिसत. पोर्णिमाने लाजुनच आपला चेहरा लपविला.  सई पौर्णिमाजवळ गेली अन हळूच कानात पुटपुटली . ‘कोणी साहेब बरेच खुष करुन गेलेत वाटत रात्री’ पौर्णिमा तिच्या कडे बघुन लाजली.आणि गालातल्या गालात हसून रूममध्ये गेली.सौंदर्यामागे वासनेचा डाव

रुममधल्या आरश्यात आपला चेहरा न्याहळत  खुर्चीत बसली.गालावरची केसांची बट कानामागे करत पुन्हा आपला चेहरा आरश्यात बघत राहिली. परत कानामागची बट गालावर घेत रोज छातीवरून खाली येणारा पदर आज परत परत सावरत होती.आज हा देह कोणा एकाच्या मालकीचा होईल म्हणून पुर्ण शरीर झाकत होती.

बाळाच्या रडण्याने ती भानावर आली. आरश्यातील तिची नजर बाळाच्या झोळीवर गेली.गालावर सोडलेली केसांची बट कानामागे घेत ती बाळाच्या झोळी जवळ गेली. आणि बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे बघत झोळीला झोका दिला.झोक्याचा  हेलकवा लागताच बाळाने पुन्हा डोळे बंद केले. पुन्हा एकदा तिने बाळाकडे नजरेचा कटाक्ष टाकत जवळच्या भिंतीला टेकून बसली.

Saundrya mage vasnecha dav
Saundrya mage vasnecha dav

पौर्णिमा आज भुतकाळात गेली. कोठीवर येऊन पौर्णिमाला जवळ जवळ पाच वर्षे झाली होती. पण पौर्णिमाला कधी तिचा भुतकाळ आठवला नाही. आज तिचा 25 वर्षाचा भुतकाळ तिच्या बंद डोळ्यात नाचु लागला.

गावभर मजुरी करणारा तिचा बाप आणि पाटलाच्या वाड्यावर दिवसभर राबणारी तिची माय तिला आठवली.आठ वर्षे लग्नाला होऊन पण पोटाला मुल नसल्याने शेंदूर फासलेल्या दगडापासुन,तर लोकांनी सांगितलेल्या भगत बुवांकडे नवस केले होते.लग्नाला दहा वर्षे झाली नी गोड बातमी समजली. आणि पोर्णिमच्या रात्री लख्ख प्रकाशात जशी एखादी चांदणी,लख्ख चमकावी इतकी सुंदर मुलगी त्यांना झाली. सौंदर्याला  नजर लागेल इतकी रूपवान दिसणारी.तिच्या बापाने मुलीच नाव पौर्णिमा ठेवलं.

संसाराच्या वेलीवर आलेल्या फुलला जपण्यासाठी तिची माय घरातच राहत होती. आणि लेकीला डॉक्टर करायची म्हणून तिचा बाप गावभर मजुरीवर जायचा.. एक दिवस काळाचा महिमा पालटला आणि पौर्णिमेला वर्ष नाही होत तर तिचा बाप कामावर असतानाच काळाने त्यांच्यावर  घाला घातला. पोर्णिमच्या आईला तर आकाश पाताळावर कोळल्यासारखं झालं.. आज तिला तिची हंबरडा फोडणारी माय आठवली…

बापाच प्रेत घरात येताच ‘धनी’ म्हणुन गावाच्या बाहेर पर्यत आवाज जाईल इतक्या जोराने हंबरडा फोडलेली माय , पोरीला डॉक्टर करणार होता  ना धनी  त्याच्या प्रेताला  हलवून हलवून  ‘धनी परत या’ म्हणून रडणारी  माय ।। आज तिला दिसु लागली होती.

बापाला स्मशानात नेताना आणि भिरभिरत्या नजरेने तिची माय पौर्णिमेला जवळ घेऊन रडत होती. बापाच्या चितेला आग लावली गेली. चितेचा वानवा पेटला.. आणि थेट त्याचा धूर आकाशापर्यंत पोहचला.. आणि तिथुनच सुरू झाला तिच्या माईचा आणि तिच्या ‘जीवनाचा  संघर्षमय प्रवास’

तिची माय आता परत पाटलाच्या वाड्यावर कामावर जाऊ लागली. पाटलाची मुलगी पौर्णिमा पेक्क्षा थोडी लहानच होती. आईच्या बरोबर पाटलाच्या वाड्यावर जाणारी पोर्णिमा आईच्या मागे मागे फिरत पाटलाच्या पोरीचे होणारे लाड बघायची. तीच उरलं सुरलेलं दुध बिस्कीट ती खायची..पाटलाच्या पोरींचे फेकायला दिलेले कपडे ती  घरी घेऊन घालून फुटलेल्या आरश्यात परत परत बघत  आईला विचारायची ‘ आई मी पण दिसते का ग पाटलाच्या पोरीसारखी परी’ तिची आई तीला जवळ घेत सांगायची पोर्णिमा तु तर कोणत्या परी पेक्ष्या कमी नाय..तुला शिकुन मोठं डाक्टर व्हायच आहे.. मग तुला कोणी पण राजकुमार भेटल ..तेव्हा पौर्णिमेला राजकुमार कोण असतो माहीत नव्हतं. मग ती आईला विचारायाची आई राजकुमार कोण असतो ग ? आणि आई एकच सांगायची की आता तुला माहीत नाही मोठी झालीस की,माहीत होईल. आता झोप सकाळी लवकर उठाव लागेल..(सौंदर्यामागे वासनेचा डाव)

राजकुमार नक्की असतो तरी कोण? हा विचार करत पौर्णिमा झोपी  जायची.

एक दिवस अशीच तिची माय कामावर गेली असता पाटलाची बायको आणि मुलगी बाहेर गेली होती.. पाटील एकटाच घरात असताना पाटलाची वासनी नजर तिच्या मायवर जात होती.. त्याची ती नजर चुकवत तिची माय काम करत होती. काहींना काही तिच्याजवळ मागुन,पाटील तिच्या आईच्या शारीरावरून नजर फिरवत होता..खुप दिवसाने पाटलाची  मुलगी घरात नसल्याने पौर्णिमा तिच्या खेळण्याशी खेळत होती.  तिची आई किचन कडे गेली तोच पाटील ही आईच्या मागे गेला.. किचन मधुन तिच्या आईचा परत परत आवाज होता , सोडा मला नाही तर मी मालकिण बाईला सांगन. पण कधी खेळण्यातील घोड्यावर  न बसलेली पौर्णिमा तिकडे लक्ष न देता घोड्यावर बसुन खेळत होती.. आणि थोड्याच वेळात आईच्या किंकाळण्याचा आवाज आला म्हणुन पौर्णिमा किचन कडे धावली.. तिच्या आईच्या साडीला आग लागली होती. पाटील बाजूला उभाच राहून हे पाहत होता.. पौर्णिमा एकदम आईजवळ जाऊ लागली तोच पाटलांनी तिला हात पकडून लांब केलं.. ‘तुझी आई गेली’ तिची आई जिवाच्या आकांताने पौर्णिमा कडे  बघून ह्याने मला पेटवली सांगत होती.. आणि रडणाऱ्या पौर्णिमा कडे बघत मी नाही, मी नाही सांगत होता..

आई पुर्ण पेटली होती आणि पाटलांनी पोर्णिमाला सांगितलं तु कोणाला सांगितलंस तर तुला पण असच करेन .घाबरलेल्या पोर्णिमाने आज पर्यंत कोणालाच सांगितल नव्हतं.. आईबापाला पोरकी झालेली पौर्णिमा पाटलाकडेच राहू लागली..

त्याच्या मुलीची लहानसहान कामे करू लागली.. आता पौर्णिमा जशी जशी मोठी होऊ लागली तशी सगळीच काम करू लागली..पाटलाची मुलगी शाळेतून आली की तीच दप्तर ठेवण, जेवण देणं तिची सगळीच काम पौर्णिमा करु लागली..

आता पौर्णिमेला विसाव वर्ष पूर्ण झालं होतं.. ती दिवसेंदिवस रूपवान दिसत होती.. पाटलाच्या मुलीला कधी कधी तिच्या सौंदर्याचा राग ह्यायचा ..

बापासमान असलेल्या पाटलाची नजर तिच्यावर जायची .. तिला सगळ्याचा कंटाळा येत होता.. अशातच एक दिवस कोणी तरी पाटलाच्या वाड्यावर कोणी पाहुणा आला होता.. त्याची नजर पौर्णिमावर गेली आणि पाटला कडून तिची माहिती काढली… जाता जाता पाटलाला सांगुण गेला की 20हजार देईन सौदा पक्का का?

पाटलांनी मानेनेच हो केलं. आणि तो पाहुणा निघून गेला. बायकोला ही पाटलांनी समजावलं की पौर्णिमाला देऊन.. वीस हजार मिळतील पोर्णिमाने हे ऐकलं होत पण ती काही विचारू शकत नव्हती..

नक्की कसला सौदा झाला हा विचार करत पौर्णिमा झोपी गेली..

सकाळ होताच तो पाहुणा परत आला नी पाटलाच्या हातावर  वीस हजार रुपये देऊन कुठे आहे ती विचारू लागला. पाटलाची बायको पोर्णिमेचे कपडे पिशवीत भरत सांगत होती की आज पासुन तु  ह्यांच्याकडे राहायचं.. पौर्णिमाने  विचारलं का? पाटलीन बाई म्हणाली, आम्ही तरी किती पोसु तुला आणि तिची पिशवी हातात देत ती तिला बाहेर घेऊन आली.. पौर्णिमा गोधलेली होती. नक्की काय होत तिला कळत नव्हतं ती त्यांच्यासोबत जात नसतानाही ही जबरदस्ती तिला पाठवल जात होतं.. पाटलांनी तिच्याकडे पाहत एकच सांगितलं तुझ्या आईच काय झालं होतं आठवत का तुला? की आज तुला आठवण करून देऊ. शेवटी तो भयाण प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला नी गाडीत बसली.

आज पाहिल्यादा ती इतक्या चांगल्या गाडीत बसली होती. गाडी चालु झाली.

वाऱ्याची एक झुळुक तिच्या अंगाला स्पर्शून गेली.

गाडी चालवणाऱ्या पाहुण्यांची नजर आरश्यातून तिच्यावर पडत होती.. ती अजूनच अंग चोरून बसत होती.. आपण कुठे चाललोय हे विचारण्याची पोर्णिमाची हिम्मत नव्हती..

मग पाहुण्यांनीच आरश्यात बघुन सांगितलं की, घाबरु नकोस तुला आता चंदेरी दुनियेत घेऊन जातोय.. तरी पौर्णिमा गप्पच।।।

आणि गाडी वळण घेत घेत एका गल्लीतुन आत गेली. आणि एका अस्तव्यस्त चारपाच रूमच्या समोर उभी राहिली.

खुप सुंदर सुंदर मुली तिथे फिरत होत्या . कोणाचा पदर खाली येत होता तर कोणाची साडी नको तितकी वर खोचलेली. पाहुण्यानी  गाडीचा दरवाजा उघडला आणि पोर्णिमाला बाहेर येणास सांगितलं..

पौर्णिमा बाहेर येताच कोणीतरी बाई बाहेर आली.. ती  पौर्णिमेला केसापासुन पायापर्यंत न्याहळत बोलली ” वा क्या माल हें”

आणि पौर्णिमेला आत नेत तिच्या समोर पाण्याचा ग्लास पकडत म्हणाली “खुप सुंदर दिसतेस पोरी” !

संध्याकाळ होत चालली होती तरी पौर्णिमा एक शब्द ही बोलली नव्हती.. कोणी साहेबी पोशाकात,तर कोणी पिउन तर कोणी सिगारेटचे धुर सोडत पुरुष येत होते.. एक नटूनथटून येणाऱ्या मुलीकडे बघत पौर्णिमाने तिला विचारलं इथे कोण कोण राहत हे सगळेच का? ती मुलगी न बघताच म्हणाली,तु तयार हो सगळं समजेल तुला हळुहळु..

आणि ती निघून गेली.. पौर्णिमा बसूनच होती तोच ती पाणी देणारी बाई आत आली आणि पटपट तयार हो सांगत होती.. कुठे जायच आहे का?अस विचारून पौर्णिमा जागेवर  बसुन होती ..

त्या बाईचा पारा चढला तशी पौर्णिमा उठली आणि लगबगीने आरश्याजवळ जाऊन विस्कटलेले केस नीट करू लागली.. तिला बाहेर नेल..बाहेर खुप पुरुषयांचा घोळका होता..

सगळ्याच नजरा प्रत्येक नटलेल्या मुलींकडे जात होत्या..

पण प्रत्येकाच्या नजरेत फक्त पौर्णिमा भरली 100,200,500, तिच्यावर अशी बोलणी होत 1000 आली.

आणि तिला घेऊन येणारा पाहुणा त्या बाईला सांगत होता की,. आजची पहिली रात्र मला दे ना अक्का हिच्या सोबत आणि त्या बाईची चवतलेली नजर त्या पाहुण्यांवर पडली . तसा तो मागे झाला.. आणि 1000 ची बोलणी लावणाऱ्या माणसाबरोबर पौर्णिमेला आत जायला सांगितलं.. पौर्णिमा अजून गोधळून जात होती.

पण विचारण्याची हिम्मत नव्हती होत .आणि ती आत गेली  दरवाज्याची कडी लावली गेली… आणि तिच्या सौंदर्याची कळी आज एका वासनी मर्दानगीने कुचकरली.. शांत होऊन उठलेला तो माणूस तिच्या उगड्या शरीराकडे बघत आज1000 रुपये सार्थकी लागले सांगून निघुन गेला.. आणि बाहेर येणाची हिंमत नसलेली पौर्णिमा खाटेवरच रडत रडत अंग टाकून राहिली.. रात्रीच्या थकव्याने सकाळी तिला कधी झोप लागली समजलच नाही.. आणि कोणी तरी हात लावुन तिला उठवत होत तशी जागी होऊन पहाते तर एक मुलगी तिला उठायला सांगत होती.. तशी ती उठून बसली.

ती मुलगी बोलली माझं नाव सई . पौर्णिमा अस्ताव्यस्त कपडे नीट करत तीला विचारते हे रात्री आलेले परत आज ही येतील का ? सई पटकन उठून बोलली हो.. ‘रोज नवीन नवीन’येतील.

आणि आवरून घे सांगून निघुन गेली. दुखणाऱ्या अंगाला खाटेवर झटका देत ती उठून बसली.. आणि आवरून घेतल..जवळ जवळ तीन वर्षे लोटली.. पौर्णिमा आई झाली.. कोणाचं आहे, कोण असेल ह्याचा बाप अस रोज तिला तीच मन विचारायचं त्यात रडणाऱ्या बाळाला बघत अक्का राग राग करायची..तिला ओरडून ओरडून सांगायची कोणाजवळ करून ह्याला जन्म दिलास? हे ऐकून ऐकून आणि रोज येणाऱ गिहृइक आणि बाळाच्या रडण्याचा त्रास तिला असह्य होत होता..

रात्रीच असच एक गिहृइक साहेबी कापडात आणि सुटाबुटात आलं होत. पहिल्यादीच आलेलं दिसत होतं..पौर्णिमाच्या मादक आदेकडे  बघत रात्रीचे वाटतील तितके देईन..

पौर्णिमा त्यांच्या बरोबर आत गेली .. तोच बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर आला .. तीच मन त्या आवजाने बेचैन झालं.. ती पटकन आवरा साहेब बाळ रडत सांगुन खाटेकडे गेली.. तिच्या मनाची  अवस्था त्यांनी ओळखली . तिच्या हाताला पकडून ते म्हणाले तु खुप रूपवान आहेस बाळाला घे जा ..उद्या परत येईन,तेव्हा तुला नी तुझ्या बाळाला कायम घेऊन जाईन..

ती साहेबांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली ‘खरच साहेब’आणि साहेब  मानेनेच हो करत निघून गेला..”हाच असेल का माझा राजकुमार आईने सांगितलेला”  हा हाच असणार ती पटकन हसत बाळाच्या रडण्याने भूतकाळातुन बाहेर आली.. आज बाळाने रडू नये म्हणुन त्याला पटकन झोळीतून काडून घेतलं त्याला दुध पाजत कधी रात्र होते वाट पाहत होती.

जशी जशी रात्र होत होती तशी ती लाजरीमुजरी होत होती परत परत आरश्याजवळ जाऊन पदर नीट करत होती. आज साडी जास्तच जमिनीवर लोळेल इतकी खाली नेसली होती.. बाळाकडे बघत पुन्हा पाजू का म्हणजे  रडणार नाही हा विचार करत होती.. गिर्हाईकांची येण सुरू झालं होतं..  बाळाला झोका देत बाहेर नजर टाकत होती.. साहेब म्हणजे आईने सांगितलेला राजकुमार कधी येईल म्हणून परत परत खिडकीतून बाहेर नजर टाकत होती.. परत परत तिला अक्का आवाज देत होती पण पौर्णिमा बाळ जाग आहे म्हणून खोट बोलत होती.. अक्काचा पारा चढत होता पण साहेब येतील की नाही म्हणुन तिचा जीव कासावीस होत होता.. तोच कोणी तरी आलं..  या साहेब  अक्काचा आवाज पौर्णिमाच्या कानावर पडताच ती खिडकीतून आधाश्यासारखी बघु लागली.. माझ्या  आईने सांगितलेला राजकुमारच आहे म्हणुन बाळाच्या अंगावरच नीट करत . बाळाच्या गालावर गोड पापी देत .आपल्याला राजकुमार घेऊन जाईल.. साडी सारखी  करत ती बाहेर गेली साहेबाची नजर तिच्यावर पडताच ती लाजली..पोर्णिमाकडे पाहतच तो अक्काला पाहिजेत तितके पैसे सांगून आत येऊ लागला.. पौर्णिमा मनात विचार करत होती,आज का बोलणी केली. आज तर मला नि माझ्या बाळाला घेऊन जाणार आहेत ना?? पण काही न बोलता ती आत गेली.. ती आज कालच्यापेक्ष्या सुंदर दिसते .. सांगुन साहेब तिला लाजवत होते. आणि अजुन अजुन तिच्या चेहऱ्यावरची लाली चढत होती..आणि आज जणु काही पाहिल्या रात्रीचा आनंद घेत हाच तो राजकुमार मनात विचार करत होती..

वासना
सौंदर्या मागे वासनेचा डाव

शांत झालेला त्याचा तो मर्दानी देह तिच्यापासून दुर झाला . अंगावरचे कपडे घालत खुप खुष केलस सांगत होता.. तु खरच पोर्णिमेच्या रात्री चमकणारी चांदणी आहेस.. तशी ती लाजुनच उठली आणि बाजुला पडलेली साडी घालत साहेबांच्या समोर जाऊन उभी राहिली.. त्याच्याकडे   लाजरा कटाक्ष टाकत साहेब तुम्ही माझे राजकुमार.. लहानपणी माझ्या आईने सांगितलेला राजकुमार मोठी झाल्यावर समजला कोण असत ते. त्याचा तिने घेतलेला हात त्यांनी जोरात हिसकावून टाकला आणि रागाने म्हणाला ,कोण राजकुमार?????  पौर्णिमाच मन भरून आल आणि ती म्हणाली,तुम्ही ।। तुम्ही आज मला नी बाळाला घेऊन जाणार ना..

तोच तो लांब होऊन म्हणाला,रात्री सांगितलेलं विसर..कोठीवर काम करणारी बाई तु .. तुझा कोणी राजकुमार नसेलच.. इथे येणारे फक्त आपली वासना शांत करण्यासाठी येतात.. तु कितीही सुंदर असली तरी घरी नेणारा कोणी राजकुमार येणार नाही इथे ही कोठी आहे कोठी,कोण्या राजकुमारिचा राजवाडा नाही की, कोणी तुला घेऊन जाणारा राजकुमार येणार इथे…. तु सुंदर आहेस पण वासनेने भरलेल्या शरीराची आग विझवणारी तु कोठेवाली आहेस…तिने त्याचा  हात हातात घेत ला,साहेब हे तुम्ही खोटं बोलता ना ?? त्यांनी तिच्या हाताला जोरात हिसका देत दरवाज्याकडे जात सांगितलं ‘तुझा कोणी राजकुमार नाही’ आणि  दरवाज्या नको तितक्या जोरात बंद करून निघून गेला..त्याच्या पाटमोऱ्या जाणाऱ्या शरीराकडे बघत ती म्हणाली ‘नसेल कधी माझा राजकुमार’  खांद्यावरून खाली आलेल्या पदराला तिला नीट करावासा वाटला नव्हता .. तिला एकच आठवत राहील वासनेने भरलेल्या शरीराची आग शांत करणारी तु, तुझा कोणी राजकुमार नसेल ।।।।।

विस्कटलेली साडी घेऊनच ती बाळाकड निघून गेली।।

 

🌺✒अनामिक✒🌺

।।प्रशाली घरत।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *