ऊसाचे पाचट जाळणे तारक की मारक

0
745
Loading...

✍🔵 रहस्य निसर्ग शेतीचे🔵✍

⚫ ऊसाचे पाचट जाळणे ♨ तारक की मारक ? ?⚫

उसाचे पाचट
उसाचे पाचट

निश्चितच उसाचे पाचट जाळणं महापाप आहे.पाचट जाळणारे स्वतःचे घर व भविष्य जाळत असतात.तसेच निसर्गाचेही घर जाळत असतात.एकरी ५ टन जेव्हा पाचट तुम्ही जाळता तेव्हा त्याच जमिनीवर पुढील ऊसाला जगवणारे सर्व तत्वं त्या पाचटजाळण्यांतून नष्ट करीत असता.तसेच जमिनीत जमीन पहेलवान बनविणाऱ्या अनंत कोटी जीव जंतूंचं राहतं घर तुम्ही नष्ट करीत असता.

➕ ऊसाच्या पाचटात असे आहे काय ?

उसाचे पाचट
उसाचे पाचट

ऊस पिक जमिनीतून जी अन्नद्रव्ये उचलतात ती सगळीच असतात .
म्हणजे आपण जो ऊस पिकवितो, तो ऊस आपल्या जमिनीतून जे जे काही उचलतं, ते सगळं चिपांड, पाचट व वाढयांत असतं व खोडकीतही असतं हे सगळं (ऊसातील रस सोडून ) जरी जमिनीला आच्छादन म्हणून परत केलं , तरी तेवढा ऊस जगण्यालाजे जमिनीतून पाहीजे ते मिळून जातं वरून टाकण्याची गरज राहत नाही . हे पक्के लक्षात घ्यावे .
➕➕ एक हेक्टर उसापासून हे पाचट किती मिळते व त्यात काय असते ? ? ?.

उसाचे पाचट
उसाचे पाचट

८ ते १० टन पाचट मिळते. ते जर ऊसात / द्राक्ष /केळी /डाळींब / नारळ / सुपारी / आंबा / संत्रा उभ्या फळपिकात आच्छादन म्हणून वापरले व कुजविले तर त्यापासून ४ / ५ टन खत मिळते हया खतात त्याच्या एकुण वजनाच्या ०.४८ % नत्र , ०.१९ %
स्फूरद, ०.९२% पालाश, ०.९४ % कॅल्शिअम , ०.७४ % मॅग्नेशियम , ०.१२% सोडिअम, o.१७ % लोह,
०.००९ % मॅग्नीज, ०.००४ %
जस्त,० .०००३ % तांबे .इत्यादी अन्नघटक असतात. ते वरील सर्व फळपिकांत आच्छादन म्हणून टाकले तर पिकाला सहज उपलब्ध होतातच.. !
शिवाय _जीवजंतूची आच्छादनाखाली व परिसरात प्रंचड वाढ होते व आच्छादनाचे इतर सर्व फायदे मिळून येतातच .
त्यासाठी.
ऊसाचे पाचट न जाळून स्वतःवर कृपा करून जीवजंतूचे पर्यायाने निसर्ग सजीवसृष्टीचे रक्षण करुन
नैसर्गिक शेतीत यशस्वी वाटचाल करुया .

Article By : Abhijit Pawar

©® Yogiraj Film Creations.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here