सुशांतसिंह प्रकरण: सीबीआय येताच ईडी ‘बॅकफूटवर’

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने ईडी मनी लॉन्डरिंग'प्रकरणी होत असलेली संबंधितांची चौकशी थांबवली आहे.सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने शुक्रवारपासून तपास सुरू केला.

0
300
Sushant Singh
Sushant Singh Rajput
Loading...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने ईडी मनी लॉन्डरिंग’प्रकरणी होत असलेली संबंधितांची चौकशी थांबवली आहे.सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने शुक्रवारपासून तपास सुरू केला. शनिवारी व रविवारी सुशांतच्या घराच्या सखोल तपासणीसह त्याच्या सहकाऱ्यांची कसून चौकशी केली. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांचेही जबाब नोंदविण्यात आले. परंतु अद्याप मुख्य संशयित असलेल्या रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलेला नाही.

सुशांतसिंह
सुशांतसिंह

रिया व तिचा भाऊ शौविक यांना समन्स पाठविणार असल्याची चर्चा दोनबदिवसांपासून आहे. त्यातच ईडीने सीबीआय येण्याआधी रिया व तिच्या कुटुंबीयांची २०-२० तास चौकशी केली. परंतु सीबीआय येताच ईडीने संबंधितांची चौकशी थांबवली आहे. यामुळेच संभ्रम निर्माण झाला आहे. सीबीआयकडून रिया व तिचे वडील इंद्रजित यांना कुठल्याही क्षणी समन्स पाठवला जाईल, असे सांगितले जात आहे. सीबीआयच्या विशेष पथकाने अंधेरीतील वॉटरस्टोन रीसॉर्टलाही भेट दिली. मृत्यूपूर्वी दोन महिने सुशांत या रीसॉर्टमध्ये थांबला होता. तेथे त्याने आध्यात्मिक धडे घेतले होते, असे सांगितले जाते. या रीसॉर्टमधील कर्मचाऱ्यांची पथकाने चौकशी केली. शवविच्छेदनावर वेळेची नोंद नाही सुशांतसिंह राजपूतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन त्याच्या घरापासून दूर असलेल्या कूपर रुग्णालयात झाले होते. त्यामध्ये सुशांतचा गुदमरून मृत्यू झाल्याचे नमूद आहे. परंतु या शवविच्छेदनावर मृत्यूच्या वेळेची नोंद नाही. तसेच शवविच्छेदनाआधी कोरोना चाचणीही करण्यात आली नाही. याबाबत सीबीआयच्या पथकाने डॉक्टरांची चौकशी केली आहे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here