वशाट,फड,भैरु ची १२ व्या प्रतिबिंब नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये बाजी

1
936
Phad maharashtrian folk art
Phad maharashtrian folk art
Loading...

12 Th Pratibimb National Short Film Festival,Ahmednagar.
“Best Director- Yogesh Baban Gadage.”

“Best Film – Vashat-The Cannibal.”

Vashat
Vashat-The Cannibal

गेली सहा वर्ष चित्रपट सृष्टी मध्ये धडपडतोय,या स्पर्धेच्या युगात स्वत:ला अपडेट हि करतोय जस जमेल तस आणि जे येइल ते काम प्रामाणिक पणे करायच. हा एक फंडा माझ्या टिम चा आहे.
आम्ही नक्कीच कुठे काहि शिकलेलो नाही पण अनुभवाने आणि संघर्षाने आम्हाला खुप काही शिकवल आहे.अनुभव,चुक आणि झालेल्या चुका सुधरवणे हाच खरा आमचा गुरु आहे.
याच फळ हि आम्हाला मिळाल.१२ व्या प्रतिबिंब नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हल मध्ये “वशाट” या दिग्दर्शन केलेल्या फिल्म ला “बेस्ट फिल्म” आणि “बेस्ट डायरेक्टर” हे पुरस्कार मिळाले.

Phad maharashtrian folk art
Phad maharashtrian folk art

खर सांगायच तर तेच तेच विषय पुन्हा रंगवून आपली मराठी चित्रपट सृष्टी काळी पडली आहे. मराठी सिनेमा हा जगात गाजावा हि प्रामाणिक इच्छा पण ” वशाट ” आपल्या भारतीय मराठी सिने सृष्टीला पचेल अस वाटत नाही. अजुन किती दिवस आपण तेच तेच घासणार आहोत माहित नाहि.
प्रतिबिंब ची सर्व टिम तिथला स्टाफ फारच अप्रतिम आणि मेहनती आहेत.वशाट चे निर्माते अनुप ढेकणे आणि डॉ.संतोष पोटे यांचे हि अभिनंदन.डॉ.संतोष पोटे सारखे हौशी,उत्साही,आणि सिनेमा सृष्टी मधील अभ्यास असलेले निर्माते मराठी सृष्टीला लाभले तर खुप प्रयोगशील काम करता येइल.
परिक्षक म्हणून “६३ वा राष्ट्रीय पुरस्कार विजेते “औषध” या लघुपटाचे दिग्दर्शक अमोल देशमुख आणि “फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ” मधुन सिनेमेटोग्राफि केलेले व भारती विद्यापीठ मध्ये असिस्टंट सिनेमेटोग्राफी प्रोफेसर म्हणुन कार्यरत असणारे सचिन सोनवणे,लाभले. खऱ्या अर्थाने ” वशाट ” परिक्षकाना पचल कारण हे फक्त अभ्यासु आणि मराठी सिनेमाकडे वेगळे पणाने बघणाऱ्यानाच पचु शकत.त्यांनी आमच्या मेहनतीला न्याय मिळवुन दिला त्या बद्दल त्यांचे आभार.
वशाट व्यतिरीक्त स्पर्धे मध्ये अनेक चांगले चांगले लघुपट आणि माहितीपट पहायला मिळाले.
*माहिती पटा मध्ये धनंजय खैरनार दिग्दर्शित “फड” ला उत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला.
त्याच बरोबर,पॅंप्लेट,मांजा,मौन,ताजमहाल,
पिपाण्या,प्रॉंन्स,अलर्टबा,द- ड्रेनेज, विकल,असे लघुपट पहाण्यासारखे होते.

स्टुडंट्स कॅटेगरी मध्येमानसी देवधर दिग्दर्शित “भैरु”या लघुपटाला बेस्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला.

हे झाल महोत्सवा विषयी आता मला माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानलेच पाहिजेत. दिग्दर्शक म्हणून सिनेमाची सांगड घालताना सिनेमेटोग्राफर हा तितकाच हुशार असावा लागतो आणि श्रीनिवास गायकवाड च्या रुपात तो मला मिळालेला आहे.इतक्यात काय आम्हि माना टाकणार नाहि. मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा लख लख चंदेरी दुनिया बनवायच आमच स्वप्न आहे आणि ते आम्ही सगळे मिळुन पूर्ण करु.
वशाट मधील सर्व टेक्निकल टिम चे व कलाकारांचे मनापासुन खुप खुप आभार.

©® योगेश बबन गाडगे.

लेखक – दिग्दर्शक – अभिनेता.

Loading...

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here