वेड्या मना : मराठी कविता

0
1004
Loading...

सांग तुच आता या वेड्या मना,
का तुझी ओढ लागली मला पुन्हा.
हरवले होते शब्द माझे,
तुझ्यासाठी शोधले पुन्हा..!!

भेटशील काय ग एकदा
डोळे भरुन तुला पहायला,
अर्धेच ठेवशील काय ग स्वप्न माझे,
किती काळ घेशील अजुन मिठीत यायला…!!

सांग ना तुच या वेड्या मना.
का तुझी ओढ लागली मला पुन्हा.

©® योगेश बबन गाडगे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here